Sunday, August 23, 2026
HomeसाताराSatara Crime News: कराडात चाकूने वार करत युवकाचा खून; हल्लेखोर पसार |...

Satara Crime News: कराडात चाकूने वार करत युवकाचा खून; हल्लेखोर पसार | पुढारी

Satara Crime News: कराडात चाकूने वार करत युवकाचा खून; हल्लेखोर पसार | पुढारी

[ad_1]








कराड; पुढारी वृत्तसेवा: कराड (जि- सातारा) येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर चाकूने वार करून खून करण्यात आला. शनिवारी (दि.२) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली असून, संशयित हल्लेखोर फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Satara Crime News)

शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील कार्वे नाका येथे शनिवारी दुपारी तीन च्या सुमारास शुभम चव्हाण याच्यावर अज्ञाताने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. यानंतर संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. यावेळी परिसरातील नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  (Satara Crime News)

घटनेची माहिती मिळताच  पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस उपरिक्षक राजू डांगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. संशयित हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, असेही पोलिसांनी देदिलेल्या माहितीत सांगितले आहे. (Satara Crime News)









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments