काश्मीर खोऱ्यात यंदाही होणार थाटात गणेशोत्सव साजरा! तीन ठिकाणी होणार स्थापना; पुनीत बालन यांचा पुढाकार

0
13
काश्मीर खोऱ्यात यंदाही होणार थाटात गणेशोत्सव साजरा! तीन ठिकाणी होणार स्थापना; पुनीत बालन यांचा पुढाकार


Ganeshotsav In Kashmir Valley : काश्मीर खोऱ्यात या वर्षीही मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी व सर्वधर्मीय एकोप्याने रहावे या हेतूने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून पुण्यातील सात गणपती मंडळांच्या सहकार्याने काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या वर्षी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या साठी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या बाप्पाच्या मुर्ती विधीवत पूजा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आल्या आहेत.



Source link