Ladki Bahin Yojana: महिलांच्या सक्षमिकरणासाठी महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज केले. मात्र, निकषात बसत नसतांना देखील काही महिलांनी या साठी अर्ज केले. आता अशा अर्जदारांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकार फेरतापासणी करण्याच्या विचारात आहे. त्यापूर्वी अशा अर्जदारांना लाभ सोडण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कारवाई होण्याच्या भीतीने आता स्वत:हून महिला अर्ज करून या योजनेचा लाभ सोडत आहेत. राज्यात आतापर्यंत ४ हजार महिलांनी अर्ज करून या जोजनेचा लाभ सोडून दिला आहे.
ISRO Space Docking: अंतराळ क्षेत्रात रशिया, चीन, अमेरिका यांसारख्या राष्ट्रांचा दबदबा असतानाच भारतही या शर्यतीत मागे राहिलेला नाही. मागील काही वर्षांमध्ये भारतातूनही अनेक अशा मोहिमा राबवण्यात आल्या आहेत जिथं अंतराळातील मोहिमांना यश देत देशातील अंतराळ संशोधन संस्थेनं नवनवी यशशिखरं सर केली आहेत. गुरुवारीसुद्धा देशातील अतीव महत्वाच्या संस्थेनं असाच एक क्षण अनुभवला.
ISRO नं गुरुवारी स्पेडेक्सच्या मदतीनं (Space Docking) स्पेस डॉकिंग या प्रयोगाअंतर्गत यशस्वीरित्या दोन उपग्रहांना डॉक केलं अर्थात जोडलं. अवकाळाता यशस्वीरित्या दोन उपग्रह जोडणारा भारत हा आता जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी ही कमाल केली आहे. इस्रोनं एका व्हिडीओच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली.
इस्रोनं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार ‘चेजर’ आणि ‘टार्गेट’ हे उपग्रह एकमेकांशी जोडले जात असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. डॉकिंग केल्यानंतर दोन्ही उपग्रहांवर नियंत्रण स्थापित करण्यात आलं. खुद्द इस्रो प्रमुख वी. नारायणन यांनी या मोहिमेत यश मिळाल्याची माहिती देत संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या.
पाहा डॉकिंग प्रक्रियेचा भारावणारा व्हिडीओ…
ISRO successfully completed docking of two SPADEX satellites (SDX-01 & SDX-02) in the early hours of 16 January, 2025.#SPADEX#ISROpic.twitter.com/UJrWpMLxmh
इस्रोच्या या डॉकिंगमुळं भविष्यातील विविध अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचा टप्पा सर करण्यात आला आहे. चंद्रयान 4, गगनयान, स्पेस स्टेशनची स्खथापना आणि थेट चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्यासाठीचे इस्रोचे प्रयत्न आणि भविष्यातील या मोहिमांसाठी सध्याची मोहिम मोठा हातभार लावताना दिसेल.
2035 पर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं देशाचं Space Station स्थापित करण्याची मोहिम हाती घेण्यात आली असून, त्या दृष्टीकोनातून तयारीही सुरु करमअयात आली आहे. याच मार्गावर स्पेडेक्ससारख्या मोहिमांमध्ये मिळणारं यश देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यास आणखी हातभार लावताना दिसेल.
Parliament Budget Session 2025 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Actor Aman Jaiswal Death : टीव्ही इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही सीरियल ‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अभिनेता अमन जयस्वालचा रस्ते अपघातात मुंबईत मृत्यू झाला आहे. २३ वर्षीय अमन बाईकवरून ऑडिशनसाठी जात असताना मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याला उडवले. या अपघातात जखमी झालेल्या अमनला रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
Swapnil Kusale News : मराठमोळ्या स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदक पदक जिंकले. पण आता या ऑलिम्पिक पदकाचा रंग उडून जात असून त्याची चमक फिकी पडत आहे. यामुळे नेमबाज स्वप्नील कुसळेने शुक्रवारी पदक बदलून देण्याची विनंती केली आहे.
विडणी, फलटण: विडणी (ता. फलटण) येथील २५ फाटा परिसरातील ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली, सुरी, व कापलेले केस आढळून आल्याने आघोरी प्रथांमुळे नरबळी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
प्रकरणाचा तपशील:
प्रदीप जाधव यांच्या ऊसाच्या शेतात चार-पाच दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने या महिलेचा खून करून मृतदेह टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह अर्धवट सडलेल्या अवस्थेत सापडला. हिंस्र प्राण्यांनी मृतदेहाचे काही भाग शेतातून ओढून बाहेर आणल्यामुळे ही घटना उघडकीस आली.
महिलेचा कंबरखालचा भाग व कवटी शरीरापासून वेगळा सापडला. कवटी पाण्याच्या पाटात सापडली, तर मधला भाग अद्याप सापडलेला नाही. फलटण ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस तपास सुरू:
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहूल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, शिवाजी जायपजे व शिवानी नागवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. परिसरात पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
नरबळीची शक्यता:
घटनास्थळी महिलेच्या साडीच्या जवळ नारळ, गुलाल, कापलेले केस, तेलाचा दिवा व काळी बाहुली सापडल्यामुळे आघोरी प्रथा व नरबळी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तपास प्रगती:
पोलिस पाटील शीतल नेरकर यांनी घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना दिली. अधिक तपास पोलीस करत असून परिसरातील रहिवाशांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Delhi Assembly election 2025 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत आश्वासनांचा पाऊस पडत आहे. आम आदमी पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा मोफत योजनांचा आग्रह धरला असला तरी यावेळी भाजप आणि काँग्रेसनेही जोरदार टक्कर दिली आहे. तिन्ही पक्षांनी महिलांसाठी आर्थिक मदत आणि मोफत योजनांचे आश्वासन देऊन जनतेला आकर्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मात्र, आश्वासनांची फेरी अद्याप पूर्ण झालेली नाही. संकल्पपत्राचा हा पहिला भाग असल्याचे भाजपने म्हटले आहे. ‘आप’ने अधिकृतपणे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही, त्यामुळे काँग्रेसही एक-एक करून आश्वासने जाहीर करत आहे.
पुणे : अनैतिक संबंधातून एका वकील महिलेकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने तिच्यासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पत्नीला सोडून माझ्याबरोबर रहा, तुझ्या मुलाचे माझ्या मुलीशी लग्न करुन दे आणि ३० लाख रुपयांची परतफेड कर अथवा सुस येथील फ्लॅट नावावर कर असा तगादाच या वकील महिलेने लावला होता. या प्रकरणी बडंगार्डन पोलिसांनी माढा तालुक्यातील वकील महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
अंकुश डांगे (वय ४५, रा. बालेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश डांगे यांच्या पत्नीने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत माढा तालुक्यातील ४२ वर्षांच्या वकील महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी महिला वकिल व अंकुश डांगे यांची व्यवसायातून ओळख झाली. त्यातून मैत्री व प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
यातूनच डांगे यांनी या महिलेकडून स्वतःच्या बार आणि मंगल कार्यालयाच्या कामासाठी ३० लाख रुपये घेतले होते. हे पैसे माघारी दे नाहीतर पुण्यातील फ्लॅट नावावर कर असा तगादा या महिलेने लावला होता. एवढ्यावरच न थांबता या महिलेने पत्नीला सोडून माझ्यासोबत रहा, माझ्या मुलीचं तुझ्या मुलासोबत लग्न लावून दे असाही आग्रह लावून धरला होता. अशातच दि. ९ जानेवारी रोजी या महिलेने डांगे यांना पुणे स्टेशन येथील एका लॉजवर बोलावून घेतले.
त्या ठिकाणी तू पत्नीला सोडून देऊन माझ्यासोबत रहा, नाहीतर आत्महत्या कर असं म्हणत त्याच्याशी वाद घातला. त्यावेळी अंकुश डांगे यांनी या वकील महिलेसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद डांगे यांच्या पत्नीने दिली आहे. त्यानुसार बडंगार्डन पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या वकील महिलेचे पती न्यायाधीश असल्याची माहितीही आता समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.
Sharad pawar Vs Ajit Pawar NCP : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पहिलाच मोठा धक्का बसला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून उद्या (शनिवार) ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात य़ेत आहे.