Wednesday, August 5, 2026
Home Blog Page 607

कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत! बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क

0
कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत! बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क


Onion News: बांगलादेश सरकारने कांदा आयातीवर दहा टक्के आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बांगलादेशच्या निर्णयामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी सर्वाधिक कांदा निर्यात बांगलादेशमध्ये होत असते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क

बांगलादेशमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. बांगलादेशनं भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर 10 टक्के आयात शुल्क आकारणीला सुरुवात केलीये. निर्यात शुल्क वाढल्यानं कांद्याच्या भावावर परिणार झालाय. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यासह कांदा निर्यातदार आर्थिक अडचणीत सापडलाय. 

बांगलादेशनं लावलेल्या आयात शुल्काचा सर्वाधिक फटका हा नाशिक जिल्ह्याला बसणार आहे. आधीच देशात कांद्यावर 20 टक्के निर्यातशुल्क असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता बांगलादेशनं आजपासून कांद्यावर 10 टक्के आयातशुल्क आकारायला सुरूवात केलीय. त्यामुळे एकाच दिवसात कांद्याच्या दरात तीनशे ते पाचशे रुपयांची घसरण झालीय. 

बांगलादेशच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका राज्याला

भारत जगातील सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे. कांद्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये होत असते. देशातील 48 टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादित होतो. महाराष्ट्रातील 90 टक्के कांद्याचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं. नाशिक जिल्ह्याची 60 टक्के अर्थव्यवस्था कांद्याच्या दरावर अवलंबून आहे. 2022 च्या आकडेवारीनुसार भारतानं 139 दशलक्ष यूएस डॉलर्सची निर्यात बांगलादेशमध्ये केली आहे. 2023-24 मध्ये 43 टन कांदा बांगलादेशमध्ये निर्यात करण्यात आला. बांगलादेशनं लावलेल्या शुल्काचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसणार आहे.

कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवण्याची शक्यता

देशात कांद्याची दरवाढ झाली की नियंत्रण आणून केंद्र सरकार कांद्याच्या भावाला नियंत्रित करत असते. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, बांगलादेशसह अनेक देशांमध्ये आयात शुल्क वाढवून कांद्याच्या कृषी मालावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये सातत्यानं मरण होते ते शेतकरी उत्पादकाचं. त्यामुळे आता केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. 





Source link

IIT बाबांनी स्मशानात खाल्ली होती हाडे; अघोरी गुरुने काय-काय करायला लावले, अभय सिंह यांनी उघड केली अनेक रहस्ये

0
IIT बाबांनी स्मशानात खाल्ली होती हाडे; अघोरी गुरुने काय-काय करायला लावले, अभय सिंह यांनी उघड केली अनेक रहस्ये


Mahakumbh 2025 : आयआयटी बाबा अभय सिंह महाकुंभ मेळ्यात सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. आता अभय सिंहशी संबंधित एक गुपित समोर आले आहे, जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. आयआयटी बाबा (Iit baba ) म्हणाले की, त्यांनी अघोर साधना केली आहे. या अघोरी साधनेदरम्यान अघोरीने त्यांना एक विशेष नावही दिले. भविष्यात त्यांचे काय होणार, याबाबतही त्यांनी सांगितले. याशिवाय अघोरी यांनी आयआयटी बाबांना अस्थीही खायला घातली. आयआयटी बाबा अभय सिंह महाकुंभ २०२५ मध्ये जुना आखाड्याच्या शिबिरात आहेत. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच इतर भाविकही त्यांच्या दर्शनासाठी येथे दाखल होत आहेत.



Source link

Satara Crime : साताऱ्यात अंधश्रद्धेचा कळस, ऊसाच्या शेतात नेऊन महिलेचं शीर धडा वेगळं केलं

0


Satara Crime : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वीडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. उसाच्या शेतात या महिलेचा शीर धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आलाय. मृतदेहाजवळ लिंबू, मिरची आणि हळदी कुंकु आढळून आलंय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचलेत.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या विडणी गावामध्ये पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला आहे. शेतात कपड्यावर साडी, हळदी, कुंकू, काळी बाहुली, महिलेचे केस, सुरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगळे केलेला मृतदेह देखील आढळून आल्यामुळे परिसरात अघोरी कृत्य करून महिलेची हत्या असल्याची चर्चा आहे. कंबरे खालचा भाग त्यांच्या शेतात आढळून आला आहे. घटना स्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.  खून प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. प्रदीप जाधव हे त्यांच्या उसाच्या शेतात पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळवले. 

तंत्रमंत्राचा धाक दाखवून आरे कॉलनीत महिलेसह तिच्या दोन मुलींवर अत्याचार 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर साताऱ्यातही अंधश्रद्धेतून महिलेला संपवण्यात आलं आहे. आरे कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी तंत्रमंत्राच्या साहाय्याने पतीचा आजार बरा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने 37 वर्षीय महिलेचा बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आरोपीने पीडित महिलेच्या 14 व 16 वर्षांच्या मुलींचाही विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. भोंदूबाबाच्या अत्याचाराला विरोध  केल्यास कुटुंबियांना जादुटोनाच्या मदतीने जिवे मारण्याची धमकी भोंदूबाबने महिलेला दिली होती.
याप्रकरणी आरे पोलिसांनी जादुटोणा विरोधी कायदा व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या अंतर्गत भोंदूबाबावर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात भोंदूबाबा राजाराम यादव (वय 43) याला पोलिसांनी अटक केली होती.

बीड जिल्हा पुन्हा हादरला, दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या

आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे… तर एकजण गंभीर जखमी झाला आहे…पूर्व वैमनस्यातून घडलेल्या या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे…दरम्यान पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे…बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या वाहिरा या गावात आदिवासी समाजातील नातेवाईकात असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे… या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे… तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे…. खून झालेले दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत, तर खून झालेले आणि ज्यांनी हल्ला केला या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे… दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुन्ह्यातील हवे असलेले इतर गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

बारामती तालुक्यातील होळ येथे अभ्यासाच्या कारणावरून मुलाचा खून; पोलिसांची तातडीने कारवाई, तीन जणांना अटक

0
बारामती तालुक्यातील होळ येथे अभ्यासाच्या कारणावरून मुलाचा खून; पोलिसांची तातडीने कारवाई, तीन जणांना अटक

बारामती :- बारामती तालुक्यातील होळ येथे वडिलांनी रागाच्या भरात नऊ वर्षांच्या मुलाचा भिंतीवर डोके आपटून आणि गळा दाबून खून केला. हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडील, आजी आणि चुलत चुलत्याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी १२ तासांत अटक केली.

घटनेचा तपशील

दि. १४ जानेवारी रोजी पीयूष भंडलकर घरात असताना वडील विजय भंडलकर यांनी अभ्यास न केल्यामुळे त्याला जाब विचारला. “तू अभ्यास करत नाहीस, माझी इज्जत घालवत आहेस,” असे म्हणत त्यांनी रागाच्या भरात त्याचे भिंतीवर डोके आपटले आणि गळा दाबला. यानंतर पीयूषची हालचाल बंद झाल्यावर संतोष भंडलकर यांच्या मदतीने त्याला नीरा येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले.

डॉ. भट्टड यांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. मात्र, पीयूषचा मृत्यू चक्कर आल्यामुळे झाला असे गावकऱ्यांना सांगत अंत्यविधीची तयारी सुरू केली.

पोलिसांची तातडीने कारवाई

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थ आणि नातेवाईकांशी चर्चा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले.

शवविच्छेदन अहवालात पीयूषचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेतले.

अटक व गुन्हा दाखल

वडील विजय भंडलकर, आजी शालन भंडलकर आणि चुलत चुलता संतोष भंडलकर (सर्व रा. होळ) या तिघांना अटक करण्यात आली. भारतीय दंड संहिता कलम १०३ (१), २३८, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचा सक्रिय सहभाग

या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, फौजदार बाळासाहेब कारंडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. या पथकात महेश पन्हाळे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, नागनाथ परगे, प्राजक्ता जगताप, रजनी कांबळे यांच्यासह अनेक पोलिसांचा सहभाग होता.

गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी अधिक जागरूक होण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

केजची कन्या भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणार? खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे आहे? पाहा

0
केजची कन्या भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणार? खो-खो संघाची कर्णधार प्रियांका इंगळे आहे? पाहा


Who Is Priyanka Ingle Kho Kho India Cpatain : प्रियांका इंगळे हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण भारताच्या महिला संघाला खो खोचा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर आहे. १३ जानेवारीपासून भारतात पुरुष आणि महिलांचा खो खो विश्वचषक खेळवला जात आहे.



Source link

Murlikant Petkar: अखेर ‘चंदू चॅम्पियन’ला मिळाला अर्जुन पुरस्कार! मुरलीकांत पेटकर यांनी मानले साजिद नाडियाडवालांचे आभार

0
Murlikant Petkar: अखेर ‘चंदू चॅम्पियन’ला मिळाला अर्जुन पुरस्कार! मुरलीकांत पेटकर यांनी मानले साजिद नाडियाडवालांचे आभार


Murlikant Petkar Arjuna Award : ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक विजेती मनु भाकर, विश्व बुद्धीबळ चॅम्पियन गुकेश डोमराजू, भारतीय पुरुष हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅराअ‍ॅथलीट प्रवीण कुमार यांना आज (शुक्रवार) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ३२ खेळाडूंना अर्जुन अवॉर्ड देण्यात आले. यामध्ये दोन जणांना लाइफटाइम कॅटेगरीत अर्जुन अवॉर्ड मिळाला.



Source link

महिला नागा साधू कशा बनतात? मासिक पाळीच्या काळात गंगा स्नानासाठी अवलंबतात ‘ही’ अनोखी पध्दत

0
महिला नागा साधू कशा बनतात? मासिक पाळीच्या काळात गंगा स्नानासाठी अवलंबतात ‘ही’ अनोखी पध्दत


Mahakumbh 2025 : नागा साध्वींचे गूढ जीवन आणि त्यांच्या साधनेचा खडतर प्रवास महाकुंभ २०२५ मधील लाखो भाविकांच्या गर्दीत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.



Source link

High Court : ‘पत्नीचे दारू पिणे पतीसाठी क्रूरता ठरत नाही, जोपर्यंत..’ हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण

0
High Court : ‘पत्नीचे दारू पिणे पतीसाठी क्रूरता ठरत नाही, जोपर्यंत..’ हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण


वैवाहिक वादाची सूक्ष्म व्याख्या करताना अलाहाबाद हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे.पत्नीचे दारू पिणे हिंदू विवाह अधिनियम, १९५५ नुसार क्रूरता नाही. जोपर्यंत वैवाहिक संबंधांना नुकसान पोहचवणारी कृती होत नाही.न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ति ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने ८ जानेवारी २०२५ रोजी याचिकाकर्ते पतीची याचिका स्वीकार करताना हा महत्वपूर्ण निर्णय दिला.



Source link

लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्राला दलित पँथरशिवाय दुसरा पर्याय नाही

0
लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्राला दलित पँथरशिवाय दुसरा पर्याय नाही

शासनाने सोमनाथ सुर्यवंशी, लोकनेते विजयराव वाकोडो,संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आणि कुटुंबातील १सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनःश्याम भोसले

सोलापूर,दि. १६ :- दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या ११व्या स्मृतीदिनानिमित्त सोलापूर येथे अभिवादन सभा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
       यावेळी भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी, संतोष देशमुख, लोकनेते विजयराव वाकोडे यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर कोंबिग ऑपरेशनमध्ये अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला.दलित पँथरच्या माध्यमातून पॅंथर विजय वाकोडे यांनी संघटनेत कामाला सुरुवात केली होती त्यांचे आंबेडकरी चळवळीशी अतुट नातेतर होतेच तसेच त्यांनी विविध ठिकाणी अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम त्यांनी आजपर्यंत केले होते अनेक आंदोलने त्यानी शांतपणे हाताळली आहेत. परभणी येथे झालेल्या संविधान प्रतिकृती अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग होता. भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारावेळी ते हजर होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवत असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यांतच त्याची प्राणज्योत मावळली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना तसेच बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तसेच भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी, संतोष देशमुख, लोकनेते विजयराव वाकोडो या कुटुंबांना १कोटी रुपये तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील सविधान प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्या भगवान पवाराची न्यायालयीन चौकशी करून नार्को टेस्ट करून त्याच्या पाठीमागील मास्टरमाइंड कोण याची चौकशी करावी व भगवान पवाराला फाशी फाशीची शिक्षा व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती रासो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा पाठीमागचा मास्टरमांचा शोध घ्यावा व तसेच परभणी मध्ये ऑपरेशन कोबिंगमध्ये ज्या 50 लोकांवरती गुन्हे दाखल झाली आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत तसेच परभणी येथील
पोलीस कर्मचारी आरोपी
    1) अशोक घोरबांड (पी आय. एलसीबी) 2) मरे (पी आय, नवा मोंढा पोलीस स्टेशन) 3) सरला गाडेकर (पीएसआय नवा मोंढा) 4) तुरणर (पीएसआय नवा मोंढा पोलीस स्टेशन) 5) अनिल कटारे (पोलीस हवालदार, नवा मोंढा पोलीस स्टेशन) यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले यांनी शासनाला केली असुन समाजातील अन्याय अत्याचाराविरोधात जनजागृतीसाठी दलित पँथरची भूमिका यावरही विचार व्यक्त करण्यात आला एकूणच आजची परिस्थितीत दलित पँथर महत्त्वाची भूमिका बजवायची असून यासाठी देशभरात गावागावांमध्ये दलित पँथरच्या घर तिथे भिमसैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण करून घराघरातून नवप्रशिक्षित भिमसैनिक घडवण्यात येणार असे आवाहन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.घन:शाम भोसले यांनी केले.
       याप्रसंगी विविध वक्त्यांनी दलित पँथरच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला बाबासाहेबांच्या पश्चात आंबेडकरी समाजाने शिक्षणाच्या आघाडीवर जरूर उल्लेखनीय प्रगती केली असली तरी आंबेडकरी समाज संघटित झाला नाही; आणि संघर्षाच्या बाबतीत बोलायचे झालेतर नामांतराचा लढा ऐतिहासिक लढा सोडला तर मागील तिन दशकांहून अधिक कालावधीत संघर्षाची धार बोथट झाली; ही वस्तुस्थिती कटू असली तरी मान्यच करावे लागेल.
       या पार्श्वभूमीवर डोक्याला कफन बांधून जी काही मोजकी कफल्लक माणसं आंबेडकरी चळवळीच्या रक्षणार्थ आणि ती प्रवाहित ठेवण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर आहेत ते अजूनही आहेत ते म्हणजे दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले असे परखड मत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी केले.
       या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पडवळ राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅंथर व तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून डॉ घनःश्याम भोसले यांनी काम पाहिले यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या पत्नी डॉक्टर रूपाली घनःश्याम भोसले उपस्थित होत्या तसेच याकार्यक्रमांमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे व पश्चिम महाराष्ट्र संघटक विश्वास गजभार व तसेच पश्चिम महाराष्ट्र कोषाध्यक्ष परशुराम शरणागत तसेच महाराष्ट्र महिला आघाडी कविताताई बोंडे व तसेच पुणे शहराध्यक्ष राधिका शरणागत सोलापूर जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे शिवसेना नेते महेश साठे, अंकुश आव्हाड पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड तसेच पॅंथर अतिष ससाने उपस्थित होते. या अभिवादन सभा संपल्यानंतर लगेच ज्या लोकांनी समाजासाठी नवरात्र काम केले आहे असे हिरे चांदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान तर्फे काही क्षेत्रांमध्ये चांगले काम करणाऱ्या गुणगौरव करून मानचिन्ह व सन्मानपत्र बहाल करण्यात आली. गडचिरोलीवरून आलेल्या डॉक्टर प्रणाली भजगवळी यांना समाजरत्न पुरस्कार व पुण्यावरून आलेल्या राधिका शरणागत यांना समाजभूषण पुरस्कार दिला यावेळी असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Explainer : मृत्यूनंतरही मेंदूतील आठवणी परत जतन केल्या जाऊ शकतात का? काय सांगतं विज्ञान? जाणून घ्या ५ मोठ्या गोष्टी

0
Explainer : मृत्यूनंतरही मेंदूतील आठवणी परत जतन केल्या जाऊ शकतात का? काय सांगतं विज्ञान? जाणून घ्या ५ मोठ्या गोष्टी


Science News in Marathi : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तो आपल्यासोबत काहीच नेत नाही. हेच जगातील शाश्‍वत सत्य आहे. अनेक धार्मिक ग्रंथात आणि आध्यात्मातही हेच तत्व सांगितले आहे. मात्र प्रश्न आहे की, व्यक्तीने जीवनभर जे अनुभव कमावले, आठवणी जपल्या त्या मृत्यूनंतरही जतन करून ठेवता येणे शक्य आहे का? या मौल्यवान आठवणी त्या व्यक्तीच्या  अस्तित्वाचा मुख्य असतात. मात्र व्यक्तिच्या मृत्यूसोबत त्याच्या आठवणीही त्याच्यासोबत मिटल्या जातात. जगातील वैज्ञानिक अनेक वर्षापासून या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी धडपडत आहेत. एखाद्या मृत व्यक्तिच्या मेंदूतून त्याच्या आठवणी पुन्हा जतन करून ठेवता येणे शक्य आहे का? हा प्रश्न भलेही एखाद्या Sci-Fi फिल्मचा प्लॉट वाटू शकेल, मात्र न्यूरो सायन्सने इतकी प्रगती केली आहे की, या दिशेने शक्यता वाटू लागल्या आहेत. समजून घेऊया असे करणे किती कठीण आहे. 



Source link