Wednesday, August 5, 2026
Home Blog Page 608

Kho Kho World Cup : भारतीय पुरुष आणि महिला खो-खो संघांचे कर्णधार कोण आहेत? कोणत्या खात्यात नोकरी करतात? पाहा

0
Kho Kho World Cup : भारतीय पुरुष आणि महिला खो-खो संघांचे कर्णधार कोण आहेत? कोणत्या खात्यात नोकरी करतात? पाहा


Kho Kho Captian Pratik Waikar Priyanka Ingle : प्रतीक वायकर आणि प्रियांका इंगळे ही दोन नावे सध्या चर्चेत आहेत. कारण भारताला खो खोचा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याची सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. १३ जानेवारीपासून भारतात पुरुष आणि महिलांचा खो खो विश्वचषक खेळवला जात आहे. 



Source link

स्तुती की छळ? महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीसोबत रील्स काढण्यासाठी जमली गर्दी, Video Viral

0
स्तुती की छळ? महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या तरुणीसोबत रील्स काढण्यासाठी जमली गर्दी, Video Viral


Mahakumbh 2025 Blue Eyes Dusky Skin Garland Seller Girl Goes Viral: 144 वर्षांनंतर प्रयागराज शहरात महाकुंभ मेळा 2025 होत आहे. भव्य कार्यक्रम विविध विधी, परंपरा, आणि चालीरीतीसह हा कुंभमेळा सुरु आहे. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात आपला माल विकण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. वेगेवगेळ्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ही मोठी संधी आहे. या मेळ्यातील अनेक व्हिडीओ, फोटो रोज सोशल मीडियावर येत आहेत. अनेक लोक यामुळे व्हायरल झाले आहेत. अशीच एक इंदूरमधील मोनालिसा नावाची १६ वर्षीय तरुणीही महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आली आहे. या माळा विकणाऱ्या मुलीच्या सौंदर्याची सगळीकडेच चर्चा आहे. त्यामुळे तिच्यावर अनेक रिल्स बनवले जात आहेत. या रीलवरही यूजर्स खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

स्तुती की छळ? 

काजळ घातलेले सुंदर डोळे आणि डस्की त्वचा  असलेल्या मुलीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, परंतु हा व्हिडीओ चुकीच्या कारणास्तव व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की त्या मुलीचे सौंदर्य टिपण्यासाठी इंस्टाग्राम रील्ससाठी कॅप्चर करण्यासाठी पुरुष युट्युबर कॅमेरासह रांगेत उभे आहेत. ती निघत जात आहे तरी तेव्हा फोन आणि कॅमेरे घेऊन उभे असलेले तरुण तिच्या मागे जात आहेत. यामुळे नेटकरी ही तिची स्तुती आहे की हा तिचा छळ आहे? असा प्रश्न करत आहेत. 

हे ही वाचा: Photo: 22 बायका, 100 मुलं… जगाला सर्वात श्रीमंत देश देणारा राजा कोण होता?

 

बघा व्हिडीओ 

 

मोनालिसाचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती तिचे नाव आणि पत्ता सांगण्यासोबतच तिला विचारलेल्या लग्नाच्या प्रश्नांची उत्तरेही देताना दिसत आहे. या कथेमध्ये तुम्हाला माळा  विकणाऱ्या मुलीची संपूर्ण माहिती मिळेल.

हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

 

तुझे डोळे खूप सुंदर आहेत…

शिवम लखारा या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस माळा विकणाऱ्या मुलीशी बोलताना दिसत आहे. तो तिला म्हणती की,  तुमच्या सुंदर डोळ्यांमुळेच लोक तुमचे फोटो काढतात. ज्याच्या उत्तरात ती म्हणते की ती आता व्हायरल झाली आहे. हातात माळा घेऊन जत्रा परिसरात व्यवसाय करणाऱ्या या मुलीसोबत फोटो काढण्यासाठी लोक मागे उभे असलेलेही दिसतात.

हे ही वाचा: Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर

लग्नाबद्दल तुमचे काय विचार आहेत?

शिवम लखाराने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये तो मुलीला प्रश्न विचारताना दिसत आहे. प्रथम तो तिच्याशी मोनालिसाला तिच्या माळा   विक्रीच्या व्यवसायाबद्दल विचारतो. मग पुढे तो तिला विचारतो की लग्न? तर ती म्हणते की मी लहान आहे, फक्त 16 वर्षांची आहे. ज्यानंतर तो विचारतो की तिला कोणाला आवडले आहे का, इतके युटूबर्स तुला फॉलो करत आहेत त्यापैकी?

 

हे ही वाचा: Maha Kumbh 2025: कोण असतात ‘तंगटोडा साधू’? ज्याची मुलाखत IAS पेक्षाही असते अवघड, जाणून घ्या प्रोसेस

 

या प्रश्नाच्या उत्तरात मुलगी म्हणते, “नाही, कोणी नाही. प्रत्येकजण माझ्या भावासारखा आहे. आमच्यामध्ये जेवढ्या माळा विकणाऱ्या मुली आहेत ना त्या आपल्या पालकांच्या इच्छेनुसारच लग्न करतात.” ही ७४ सेकंदाची क्लिप या संभाषणाने संपते.





Source link

RPF हेड कॉन्स्टेबलची रेल्वेत गुंडगिरी! महिला प्रवाशाला लगावली थप्पड, VIDEO व्हायरल होताच नोकरीतून सस्पेंड

0
RPF हेड कॉन्स्टेबलची रेल्वेत गुंडगिरी! महिला प्रवाशाला लगावली थप्पड, VIDEO व्हायरल होताच नोकरीतून सस्पेंड


RPF Policeman Assault Woman : कधी-कधी आपल्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांपासूनच लोकांना असुरक्षित जाणवते. कुंपनच शेत खात असल्याचा असाच एक प्रकार राजस्थानमधील सवाई माधोपूर येथून समोर आला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या वर्दीच्या मग्रुरीत कुणाचेच न ऐकता एका महिला प्रवाशावर होत उचलला. सवाई माधोपूर RPF ठाण्यात तैनात हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश य़ांचा एका महिला प्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, हेड कॉन्स्टेबल ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या कानशिलात मारतो तसेच महिलेला शिवीगाळ करतो.



Source link

तुमच्या आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचे कर्ज! 90 टक्के लोकांना नाही माहिती ही गोष्ट

0
तुमच्या आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचे कर्ज! 90 टक्के लोकांना नाही माहिती ही गोष्ट


Emergency loan on Aadhaar: आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला अचानक पैशांची गरज लागते. अशावेळी काय करायचं हे समजत नाही. मुलांचं शिक्षण असो, आरोग्याच्या समस्या अशावेळी तातडीने पैशांची गरज लागते. जर तुम्हीही अशाच परिस्थितीत असाल आणि पैशांच्या कमतरतेशी झुंजत असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्या आधार कार्डद्वारे 2 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज तुम्ही सहजपणे मिळवू शकता. अनेकांना याबद्दल माहिती नसते. 

भारत सरकारने जारी केलेले आधार हे आता केवळ ओळख आणि पत्त्याचा पुरावा राहिलेले नाही. त्याच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकता. आपत्कालीन परिस्थितीत पैशांची आवश्यकता असलेल्यांना याचा फायदा होऊ शकतो. 

आधार कार्डवर कर्ज कसे मिळवायचे?

आधारवर कर्ज मिळवणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही लांबलचक प्रक्रिया करावी लागणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वात आधी योग्य प्लॅटफॉर्म निवडा. आधार कार्डवर कर्ज देणारी बँक, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी किंवा डिजिटल लोन अॅप निवडा. त्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट किंवा अॅपला भेट देऊन ऑनलाइन अर्ज कराव. अर्ज करताना तुमची वैयक्तिक माहिती आणि कर्जाची रक्कम भरा. अर्ज प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. यामुळे तुमची ओळख आणि पत्ता यांचा पुरावा सहज पडताळता येईल. काही प्रकरणांमध्ये, बँक किंवा कर्ज देणारा तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी पॅन कार्ड, पगार स्लिप किंवा बँक स्टेटमेंट यांसारखी इतर कागदपत्रे देखील मागू शकतो.तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, कर्ज मंजूर केले जाईल आणि रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

आधारवर कर्ज घेण्याची प्रक्रिया करणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत असावा. त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा.

जलद प्रक्रिया 

आधार कार्डवर कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. कर्ज मंजुरी आणि रक्कम हस्तांतरण खूप कमी वेळेत होते. आधार कार्ड आणि काही मूलभूत कागदपत्रांसह कर्ज उपलब्ध आहे. कर्जाची परतफेड EMI द्वारे करण्याची सुविधा आहे.इतर पर्यायांच्या तुलनेत व्याजदर कमी असू शकतो.

या गोष्टी ठेवा लक्षात

कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा. फक्त विश्वसनीय बँकेकडून किंवा एनबीएफसीकडून कर्ज घ्या. तुमच्या परतफेडीची क्षमता किती आहे? याचे मूल्यांकन करा आणि तुम्ही वेळेवर ईएमआय भरू शकता याची खात्री करा.





Source link

GK : भारतीय आहेत आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानके! ‘या’ 7 ठिकाणांहून परदेशात जातात ट्रेन

0
GK : भारतीय आहेत आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानके! ‘या’ 7 ठिकाणांहून परदेशात जातात ट्रेन


Indian Train to Pakistan From Which Station : भारतात रेल्वेतून प्रवास करणे अनेकांना आवडतं. आरामदायी, जलद आणि कमी पैशांत आपण एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर सहज पोहोचू शकतो. भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरलंय. पण तुम्ही कधी विचार केला का की तुम्ही परदेशात रेल्वेने जाऊ शकता. परदेशात जायचं म्हटलं की, डोळ्यासमोर विमान प्रवास येतो. पण थांबा भारतात असे रेल्वे स्टेशन आहेत जे आंतरराष्ट्रीय असून या ठिकाणाहून तुम्हा परदेशात जाऊ शकता. 

भारतात प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आपला असा इतिहास आणि वैशिष्ट्ये आहेत. भारतात अनेक अद्वितीय रेल्वे स्थानके आहेत जी प्रवाशांना थेट शेजारील देशांशी जोडतात. आंतरराष्ट्रीय भेट देण्यासाठी एक सोयीस्कर आणि आकर्षक मार्ग प्रदान करतात. ही स्थानके सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापार आणि पर्यटन, देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे दुवा मानला जातो. चला जाणून घेऊया भारतातील अशा सात रेल्वे स्थानकांविषयी जे परदेशात थेट रेल्वे सेवा देतात.

भारतातील आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानके

आपल्यापैकी बरेच जण नवीन देश आणि त्यांची संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमानाने जाणे ही सर्वात सामान्य पद्धत असताना, तुम्ही रेल्वेनेही सीमा ओलांडू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? होय, भारतात अनेक रेल्वे स्थानके आहेत जी बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान या शेजारील देशांना जोडतात.

भारताला इतर देशांशी जोडणारी 7 रेल्वे स्थानके

बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान सारख्या शेजारील देशांना जोडणारी अनेक रेल्वे स्थानके आहेत. ही स्थानके सीमापार प्रवास सुलभ करतात आणि ट्रेनद्वारे आंतरराष्ट्रीय गंतव्ये पाहण्याची अनोखी संधी देतात.

 

हेसुद्धा वाचा GK: कोणता प्राणी तोंडाने पिल्लं जन्माला घालतो? आपल्या आजुबाजूलाच असूनही 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

 

भारतातील 7 आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानकं कोणती?

1. हल्दीबारी रेल्वे स्टेशन (कूचबिहार, पश्चिम बंगाल), येथून ट्रेन बांगलादेशला जाते.
2. जयनगर रेल्वे स्टेशन (मधुबनी, बिहार), येथून ट्रेन नेपाळला जाते.
3. पेट्रापोल रेल्वे स्टेशन (उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल), येथून ट्रेन बांगलादेशला जाते.
4. सिंगाबाद रेल्वे स्टेशन (मालदा, पश्चिम बंगाल), येथून ट्रेन बांगलादेशला जाते.
5. जोगबनी रेल्वे स्टेशन (अररिया, बिहार), येथून ट्रेन नेपाळला जाते.
6. राधिकापूर रेल्वे स्टेशन (उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल), येथून ट्रेन बांगलादेशला जाते.
7. अटारी रेल्वे स्टेशन (अमृतसर, पंजाब), येथून ट्रेन पाकिस्तानला जाते.





Source link

‘ले खाsss…’ गुजरातमध्ये ‘भ्रष्ट’ अधिकाऱ्यावर नागरिकांनी फेकल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल

0
‘ले खाsss…’ गुजरातमध्ये ‘भ्रष्ट’ अधिकाऱ्यावर नागरिकांनी फेकल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल


गुजरातमध्ये सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. गुजरातमध्ये एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. कथित भ्रष्ट अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी नागरिक सरकारी कार्यालयात गेले. ‘लाच देणे आणि घेणे दोन्ही गोष्टी गुन्हा आहे’ अशा आशयाचे फलक लोकांनी गळ्यात लटकवले होते. या आशयाच्या घोषणा देत नागरिकांनी चक्क त्याच्या अंगावर नोटा फेकल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 



Source link

Khel Ratna : मनू भाकर आणि डी गुकेशसह ४ खेळाडूंना खेलरत्न, तर या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान

0
Khel Ratna : मनू भाकर आणि डी गुकेशसह ४ खेळाडूंना खेलरत्न, तर या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान


Manu Bhaker To D Gukesh Khel Ratna : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकर आणि विश्व बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांच्यासह चार भारतीय खेळाडूंना प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले.



Source link

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का! भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा, पक्षाचं काय होणार?

0
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का! भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा, पक्षाचं काय होणार?


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमराम खान यांना अल-कादिर ट्रस्टशी संबंधित जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात स्थानिक न्यायालयानं १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान यांना हा मोठा धक्का असून या निकालामुळं त्यांच्या पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.



Source link

पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात! ९ जण जागीच ठार; भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत मॅक्स ऑटो हवेत उडाली

0
पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात! ९ जण जागीच ठार; भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत मॅक्स ऑटो हवेत उडाली


Pune Accident News : पुणे जिल्ह्यात अपघात सत्र सुरूच आहे. गुरुवारी एका भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतांना आता पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जण ठार झाले आहे. एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला पाठीमागून धडक दिल्याने हा ऑटो चेंडू प्रमाणे हवेत उडाला. यातील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.



Source link

मोदी सरकारनं युद्धनौकेला ‘सुरत’ नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज

0
मोदी सरकारनं युद्धनौकेला ‘सुरत’ नाव का दिलं? ठाकरेंच्या शिवसेनेनं बांधला असा अंदाज


दिव्याखाली अंधार!

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांना कुलाब्यातील ‘आयएनएस आंग्रे सभागृहा’त मार्गदर्शन केलं. तिथं त्यांनी आमदारांबरोबर भोजनदेखील केलं. नौदलाच्या म्हणजे संरक्षण दलाच्या जागेत राजकीय मेळावे घेण्यास मान्यता आहे काय? जर ती असेल तर इतर राजकीय पक्षांनी त्यांचे मेळावे, बैठका, शिबिरे घेण्याची मुभा आयएनएस आंग्रे इथं आहे काय? या सभागृहात जे चहापान, भोजन वगैरे राजकीय कारणांसाठी झालं त्याचं बिल कोणी भरलं? मोदीसाहेबांनी प्रतिमा व नैतिकतेवर भाषण केलं म्हणून हे नैतिक प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले! मोदींनी त्यांच्या लोकांना ब्रह्मज्ञान दिलं, पण सत्य काय आहे? दिव्याखाली अंधारच आहे, असा बोचरा टोलाही अग्रलेखात हाणला आहे.



Source link