Wednesday, August 5, 2026
Home Blog Page 609

Beed Double Murder: दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! रॉडने वार करत सख्ख्या भावांची काही जणांनी केली हत्या, तिसरा गंभीर

0
Beed Double Murder: दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! रॉडने वार करत सख्ख्या भावांची काही जणांनी केली हत्या, तिसरा गंभीर


Beed Double Murder: बीड जिल्ह्यात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नसून  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतांना आता दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना आष्टी तालुक्यात वाहिरा गावात घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. ही हत्या का करण्यात आली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.



Source link

Cinema Lovers Day: ‘सिनेमा लवर्स डे’साठी खास ऑफर, हे चित्रपट पाहा केवळ ९९ रूपयांमध्ये

0
Cinema Lovers Day: ‘सिनेमा लवर्स डे’साठी खास ऑफर, हे चित्रपट पाहा केवळ ९९ रूपयांमध्ये


सिनेरसिकांसाठी शुक्रवारचा दिवस खूप खास असणार आहे. खरं तर आज चार नवे सिनेमे थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. इतकंच नाही तर तीन जुने सिनेमे ‘सत्या’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘कहो ना प्यार है’ देखील थिएटरमध्ये लोकांचं मनोरंजन करत आहेत. आज ‘सिनेमा लवर्स डे’ आहे आणि हा दिवस प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. कारण आज सिनेरसिकांना ९९ रुपयांत या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. आता कोणते सिनेमे ९९ रूपयांमध्ये पाहायला मिळणार चला जाणून घेऊया…



Source link

Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! एका आरोपीला केली अटक

0
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई! एका आरोपीला केली अटक


रिपोर्ट्सनुसार, सैफवर हल्ला झाला तेव्हा सैफ, करिना, तिचा मुलगा जेह, तैमूर आणि घरातील पाच मदतनीस देखील घरात होते. जेहची आया इलियामा फिलिप हिने पोलिसांना जबाब दिला की, हल्लेखोराचा सामना सर्वप्रथम तिलाच करावा लागला. त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या फ्लॅटमध्ये घुसला होता. घरातून आरडाओरडा ऐकू आल्यावर सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला. यावेळी आरोपीने सैफवर चाकूने वार केले.



Source link

अरे बाप रे! जॉर्जिया मेलोनीसमोर ‘या’ देशाच्या पंतप्रधानांनी चक्क गुडघे टेकले, असं झालं तरी काय?

0
अरे बाप रे! जॉर्जिया मेलोनीसमोर ‘या’ देशाच्या पंतप्रधानांनी चक्क गुडघे टेकले, असं झालं तरी काय?


Giorgia Meloni Video: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना त्यांचे चाहते अतिशय उत्कृष्ठ नेता मानतात. मेलोनी यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. जॉर्जिया मेलोनी जेथे कुठे जातात तेथे त्या कायमच चर्चेत असतात. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण एका देशाच्या पंतप्रधानांनी 48 व्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे.

अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी त्यांच्यासाठी असे काही केले की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अबू धाबी येथे झालेल्या वर्ल्ड फ्यूचर एनर्जी समिट दरम्यान घडली जेव्हा तो मेलोनीसमोर चक्क गुडघे टेकले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

मेलोनीला पाहताच ते…. 

संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे झालेल्या वर्ल्ड फ्यूचर एनर्जी समिटमज्ये जगभरातील नेते एकत्र आले होते. दरम्यान, मेलोनी यांच्या वाढदिवसानिमित्त एडी रामा यांनी त्याला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. रामा यांनी मेलोनीला एक सुंदर स्कार्फ भेट दिला जो एका इटालियन डिझायनरने डिझाइन केला होता. यानंतर, रामा यांनी गुडघ्यावर बसून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या वाजवू लागले.

एडी रामा यांनी काय म्हटलं? कसा होता अंदाज 

भेटवस्तू देताना रामा यांनी सांगितले की, हा स्कार्फ दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंधांचे प्रतिबिंबित करतो. त्यांनी मेलोनीला दिलेली ही खास भेट स्वतःच्या हातांनी घातली. यादरम्यान, त्यांनी गमतीने म्हटले की, मी माझ्या उंचीचा वापर करून तुमच्यासमोर नतमस्तक झालो आहे. मेलोनी यांनीही ही अनोखी शैली हसतमुखाने स्वीकारली.

राजकारणातील उत्तम उदाहरण

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, या दोन्ही नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मजबूत भागीदारी दाखवली आहे. मेलोनी आणि रामा यांच्या नेतृत्वाखाली, इटली आणि अल्बेनियाने ऊर्जा आणि स्थलांतर यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्र काम केले आहे. अबू धाबी परिषदेत दोन्ही देशांनी संयुक्त अरब अमिरातीसह 1अब्ज युरोच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली, जो एड्रियाटिक समुद्र ओलांडून अक्षय ऊर्जेसाठी समुद्राखालील आंतरकनेक्शन स्थापित करेल.





Source link

Central Railway Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कर्जत यार्डसाठी आज व रविवारी मेगाब्लॉक! टाइमटेबल पाहून बाहेर पडा

0
Central Railway Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! कर्जत यार्डसाठी आज व रविवारी मेगाब्लॉक! टाइमटेबल पाहून बाहेर पडा


Central Railway Megablock : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज शुक्रवारी आणि रविवारी मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे यार्डच्या देखभाल दुरुस्तीसाठी व स्थानकातील पोर्टल्स काढण्यासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना हे वेळापत्रक पाहून घराबाहेर पाडण्याचे नियोजन करावे लागणार आहे. 



Source link

पत्नीला कारमध्ये बसवून फिरवत होता प्रेमी; रोखण्यासाठी नवरा चक्क बोनटवर लटकला, अनेक किमीपर्यंत…. VIDEO

0
पत्नीला कारमध्ये बसवून फिरवत होता प्रेमी; रोखण्यासाठी नवरा चक्क बोनटवर लटकला, अनेक किमीपर्यंत…. VIDEO


उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे एक हैराण करणारा प्रकार घडला आहे. आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहून नवरा भडकला. नाराज नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली. यासाठी नवरा चक्क पत्नी मित्रासोबत ज्या गाडीतून जात होती त्याच्या बोनेटवर चढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

आरोपी युवक म्हणजे पत्नीचा बॉयपफ्रेंड पतीला बोनटवर घेऊन काही किमीपर्यंत प्रवास करु लागला. ही सगळी घटना व्हिडीओत कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बॉयफ्रेंड पतीला बोनटवर घेऊन गाडी चालवत राहिल्याचं पाहून पत्नी हैराण झाली. त्याने गाडी थांबवण्याचा इशारा केला. तेव्हा तो थांबला नाही, उलट कार आणखी जोरात चालवू लागला. 

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

यावेळी एका ऑटोचालकाने हुशारी दाखवत कारसमोर आपली ऑटो थांबवली, तेव्हाच आरोपी तरुणाने कार थांबवली. गाडी थांबताच पीडित पती आणि तरुणामध्ये भांडण झाले. लोकांच्या हस्तक्षेपानंतर दोघेही तेथून निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला.

पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी तरुण आणि कार ताब्यात घेतली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पुढील कारवाई करत आहेत.

तरुणाला पत्नीसोबत पाहून नवऱ्याला राग आला

मुरादाबादचे एसपी सिटी कुमार रणविजय सिंह म्हणाले की, ही घटना मुरादाबादच्या कटघर पोलिस स्टेशन परिसरातील मुरादाबाद आग्रा महामार्गावर घडली. व्हायरल व्हिडिओची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कार आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याने सांगितले की, बिलारी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न त्याच परिसरातील एका मुलीशी झाले होते, ती मुलगी शिक्षामित्र आहे. पती-पत्नीमधील वादामुळे दोघेही वेगळे राहत आहेत.

एसपी सिटी कुमार रणविजय सिंह यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी पती-पत्नी मुरादाबादमध्ये दुसऱ्या तरुणासोबत दिसले. यानंतर, पतीने त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो गाडी घेऊन पळून जाऊ लागला. ज्यावर पीडिता गाडी थांबवण्यासाठी बोनेटवर झोपली, त्यानंतर आरोपी तरुणाने गाडी महामार्गावर चालवली.

पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

एसपी सिटीच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुणाला बोनेटवर पडून सुमारे 500 मीटरपर्यंत गाडी चालवत राहिला. या काळात कोणताही अपघात झाला नाही. गाडीच्या बोनेटवर एका व्यक्तीला लटकलेले पाहून रस्त्याने जाणाऱ्यांनी गाडी थांबवली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी कार चालकाविरुद्ध कटघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.





Source link

Kareena Kapoor: ‘आमच्यावर सतत ठेवलं जाणारं लक्ष..’, सैफ अली खानवरील हल्ल्यावर करीना कपूरने सोडले मौन

0
Kareena Kapoor: ‘आमच्यावर सतत ठेवलं जाणारं लक्ष..’, सैफ अली खानवरील हल्ल्यावर करीना कपूरने सोडले मौन


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. दरम्यान, चोराने सैफवर चाकून हल्ला केला. त्यानंतर मुलगा इब्राहिमने सैफला तातडीने रूग्णालयात दाखल केले. घडलेला प्रकार समोर येताच अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर आता करीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. तिने या पोस्टमध्ये आमच्यासाठी हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नका अशी देखील विनंती केली आहे.



Source link

नवी नोकरी हवीच! दर 5 पैकी 4 कर्मचारी नव्या Job च्या शोधात; तुम्हीही यातलेच?

0
नवी नोकरी हवीच! दर 5 पैकी 4 कर्मचारी नव्या Job च्या शोधात; तुम्हीही यातलेच?


Job News : नोकरी… आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठीचं एक महत्त्वाचं माध्यम. मनाजोगी नोकरी, आपल्याला आवडेल तेच काम आणि अमुक एका क्षेत्रात प्रगतीच्या वाटांचे वाटसरु होण्यासाठी मिळणारी संधी या सर्व गोष्टी मागील काही वर्षांमध्ये केंद्रस्थानी आल्या आहेत. अर्थात प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांना कमीजास्त महत्त्वं दिलं जातं. याच नोकरीच्या क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइनच्या (Linkdin) च्या वतीनं एक निरीक्षणपर अहवाल सादर करण्यात आला. 

सदर अहवालानुसार भारतात दर 5 पैकी 4 जण म्हणजेच साधारण 80 टक्के नोकरदार व्यक्ती नव्या नोकरीच्या शोधात आहेत. नव्या संधी, नवा आणि वाढीव पगार या आणि अशा कैक कारणांनी नव्या नोकरीचा शोध घेण्यात येत आहे. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्येही या मंडळींना काही आव्हानांचा सामना करावा लागत असून, साधारण 55 टक्के इच्छुकांच्या मते नव्या नोकरीचा शोध घेण्याची प्रक्रिया तुलनेनं अधिक कठीण होत आहे. परिणामी ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुकर करत त्यात आवश्यक बदल करण्यात यावेत अशी मागणी नोकरदार वर्गानं केली आहे. 

कोणत्या निकषांवर सुरुय नव्या नोकरीचा शोध? 

रोबोट टेक्निशिअन, एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअर या आणि अशा पदांशी संबंधिक 50 टक्के मंडळी नोकरीच्या शोधात आहेत. तर, 60 टक्के नोकरदार असेही आहेत ज्यांना आता नव्या क्षेत्रात काही नव्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडाच्या आहेत. 39 टक्के नोकरदार मंडळी नव्या नोकरीच्या शोधार्थ स्वत:लाच अपग्रेड करण्याच्या हेतूनं नवी कौशल्य शिकण्याला प्राधान्य देत आहेत. 

2024 मध्ये जागतिक आर्थिक मंदीचा थेट परिणाम झाल्यामुळं नोकरीच्या क्षेत्रांवर याचा गंभीर परिणाम झाला. परिणामी 2025 च्या सुरुवातीपासूनच नव्या नोकरीचा शोध घेणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं लक्षात आलं. यामध्ये अहवालानुसार 58 टक्के नोकरदारांना अपेक्षित क्षेत्रात अपेक्षित संधी मिळतील असा विश्वासही आहे. 

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही आव्हानं असून, नोकरीसाठी एकाहून अधिक कंपन्यांमध्ये अर्ज करूनही अपेक्षित उत्तर न येणं ही महत्त्वाची बाब आहे. हे प्रमाण 49 टक्के असून, आश्चर्य म्हणजे कंपन्यांनाचसही प्रक्रिया अधिक आव्हानात्मक भासते. यामध्ये 27 टक्के HR विभागांकडून दर दिवसाला तीन ते 5 अर्जांची छाननी करत काही अर्ज अपेक्षित निकषांची पूर्तता करणारे नसल्याचं कारणही अधोरेखित करण्यात आलं आहे. 

थोडक्यात नोकरीची अपेक्षित संधी, अमुक एका पदासाठीच्या निकषांची पूर्तता आणि कर्मचारी म्हणून आस्थापनांशी असणारं विश्वासार्हतेचं नातं या सर्वच गोष्टींची योग्य सांगड घातली गेल्यासच नोकरदार वर्गाला याचा फायदा होणार आहे हेच इथं स्पष्ट होतंय. 





Source link

Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! ढगाळ वातावरणामुळं पिके संकटात, IMD ने काय दिला अलर्ट ?

0
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! ढगाळ वातावरणामुळं पिके संकटात, IMD ने काय दिला अलर्ट ?


Maharashtra IMD Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडी गायब झाली असून कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यात ढगाळ हवामान असल्याने उकाडा देखील वाढला आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. सकाळी थंडी तर दुपारी उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येत्या काही दिवस राज्यात वातावरण कोरडे व ढगाळ राहणार असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.



Source link

Bigg Boss: ‘हीरामंडी’मधील या अभिनेत्री आली होती बिग बॉसची ऑफर, स्पष्ट नकार देत म्हणाली….

0
Bigg Boss: ‘हीरामंडी’मधील या अभिनेत्री आली होती बिग बॉसची ऑफर, स्पष्ट नकार देत म्हणाली….


छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये जाण्याचे स्वप्न अनेक कलाकार पाहात असतात. शोमध्ये गेल्यानंतर सर्वांनाच विशेष लोकप्रियता मिळते, पण असे अनेक सेलेब्स आहेत जे या वादग्रस्त शोमध्ये जाण्यास स्पष्ट नकार देत आहेत. अशाच एका नामवंत अभिनेत्रीने बिग बॉसमध्ये जाण्यास थेट नकार दिला आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घेऊया…



Source link