Wednesday, August 5, 2026
Home Blog Page 604

शॉर्ट नोटीसवर महाकुंभचा प्लॅन करताय? जाणून घ्या A to Z माहिती; खर्च, प्रवास…

0
शॉर्ट नोटीसवर महाकुंभचा प्लॅन करताय? जाणून घ्या A to Z माहिती; खर्च, प्रवास…



Maha Kumbh Mela 2025: आयत्या वेळी महाकुंभ मेळ्याला जायचंय? कसे जाल, कुठे राहाल, किती खर्च येईल? जाणून घ्या 
 



Source link

आजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा ट्रेलर पाहिला का?

0
आजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा ट्रेलर पाहिला का?


कोणते कलाकार दिसणार?

“मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.



Source link

आम्हालाही ८वा वेतन आयोग लागू करा! केंद्र सरकारनं निर्णय घेताच महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी सरसावले!

0
आम्हालाही ८वा वेतन आयोग लागू करा! केंद्र सरकारनं निर्णय घेताच महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी सरसावले!


Maharashtra govt employees on 8th Pay Commission : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आनंदात आहे. त्यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. 



Source link

Viral News : वेगवेगळ्या देशात ‘हा’ व्यक्ती आहे तब्बल ८७ मुलांचा ‘बाप’! यावर्षी शतक पूर्ण करण्याचं ठेवलं टार्गेट

0
Viral News : वेगवेगळ्या देशात ‘हा’ व्यक्ती आहे तब्बल ८७ मुलांचा ‘बाप’! यावर्षी शतक पूर्ण करण्याचं ठेवलं टार्गेट


Viral News : अमेरिकेतील कॅलिफोर्नियायेथील एक व्यक्ती सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. जगातील सर्वात जास्त शुक्राणूदान करणारी व्यक्ती म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.  काइल गॉर्डीला (वय ३२) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या या  कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळाली आहे. सध्या तो जगातील विविध देशांमध्ये असलेल्या ८७ मुलांचा बाप आहे. तर   एका अंदाजानुसार गोर्डी या वर्षाच्या अखेरपर्यंत १०० मुलांचा बाप होणार आहे.  



Source link

Viral Video : हॉटेलमध्ये टेबलावर उरलेल्या कांदा, चटणीचं पुढे काय होतं? तुमची पाठ फिरताच…

0
Viral Video : हॉटेलमध्ये टेबलावर उरलेल्या कांदा, चटणीचं पुढे काय होतं? तुमची पाठ फिरताच…


Viral Video : हॉटेलमध्ये जाऊन आयत्या जेवणावर ताव मारणं हे अनेकांच्याच आवडीचं काम. तुम्हाला हवा तो पदार्थ, हव्या त्या चवीमध्ये तुमच्यापुढं आणून देणारी कैक पद्धतींची हॉटेलं मागील काही वर्षांमध्ये सुरू झाली असावीत. खास प्रसंग किंवा अगदी काहीच खास नसलं तरीही काही मंडळी हॉटेलची वाट धरतात. 

हॉटेलमध्ये गेलं असता तिथं काही गोष्टी अगदी सवयीप्रमाणं टेबलावर आणून ठेवल्या जातात. यामध्ये सुरुवातीला दिलं जाणारं पाणी असो किंवा जेवणासोबत दिला जाणारा लालसर रंगाचा व्हिनेगर मध्ये डुंबलेला, किंवा कधी चिरून दिलेला कांदा, सॅलड, लोणची आणि चटण्या असो. 

महत्वाची बाब म्हणजे सहसा ऑर्डर केलेल्य़ा प्रत्येक पदार्थाचा खवैय्यांकडून फडशा पाडला जातो. पण, टेबलावर इथून तिथं घुटमळणारा कांदा आणि चटण्या, लोणची मात्र तिथंच रेंगाळत राहतात. कधीकधी त्यांच्याकडे पाहिलंही जात नाही. मग या गोष्टींचं पुढे काय होतं? याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, ‘अमृतसर हवेली’ या लोकप्रिय हॉटेल चेनमधील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. हॉटेलच्या हैदराबाद शाखेतील या व्हिडीओमध्ये एका ग्राहकाला देण्यात आलेलं कांदा आणि लोणचं तसंच पुढे दुसऱ्या ग्राहकाच्या टेबलवर दिलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. 

आम्ही फक्त व्हिनेगर असणारे कांदेच इतरांना पुन्हापुन्हा देतो, कोणी म्हणे आम्ही असं करत नाही अशी अजिबातच साधर्म्य नसणारी उत्तरं मिळाल्यानं इथं ग्राहकांचाही संताप अनावर होताना दिसत आहे. महागड्या आणि नामांकित हॉटेलांमध्ये अनेकदा जेवणासाठी मोठी रक्कम मोजली जाते. पण, याच हॉटेलांमध्ये मिळणारं जेवण आणि तिथं असणारे पदार्थ खरंच किती स्वच्छ आणि खाण्यायोग्य असतात हाच प्रश्न आता पुन्हापुन्हा उपस्थित होत आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी हा व्हिडीओ पाहून विचित्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर, ‘आता हॉटेलमध्ये जातानाही दोनदा विचार करावा लागणार’ अशा प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं? 





Source link

फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह

0
फलटणमध्ये काळ्या जादूच्या संशयातून महिलेची हत्या! उसाच्या शेतात सापडला धड गायब असलेला मृतदेह


Phaltan Murder : अमरावती जिल्ह्यात एका वृद्ध महिलेची जादूटोण्याच्या संशयातून धिंड काढून तिला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता फलटणमध्ये देखील एका महिलेचा धड नसलेला मृतदेह सापडला असून त्याच्या शेजारी काळी बाहुली आणि अघोरीविद्येचे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची हत्या जादूटोण्याच्या संशयातून करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

वृद्ध महिलेला काळं फासलं, मूत्र पाजलं, मिरचीची धुरी देत हात बांधून काढली धिंड! अमरावतीच्या चिखलदारा येथील घटना

0
वृद्ध महिलेला काळं फासलं, मूत्र पाजलं, मिरचीची धुरी देत हात बांधून काढली धिंड! अमरावतीच्या चिखलदारा येथील घटना


काय आहे घटना ?

काळमी नंदुराम शेलूरकर (वय ७७) असे पीडित महिलेचे नाव आहे. काळमी सेलूकर ही वृद्धा रेट्घाखेडा येथे घरात एकटीच होती. मुलगा राजकुमार व सून शामू हे बाहेरगावी कामावर असतात, तर त्यांची दोन मुले शिक्षणाकरिता वसतिगृहात राहतात. ही महिला ३० डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता उठून प्रातर्विधीसाठी गेली होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या सायबू चतुर व त्याच्या पत्नीने या महिलेला पाहताच तिला पकडून ठेवले व पोलिस पाटील बाबू जामूनकर याला बोलावले. आमच्या घराच्या बाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप त्यांनी काळमीवर केला. बाबू जामूनकर याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायबू चतुर, साबूलाल चतुर, रामजी चतुर व इतरही ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी मरण केली. या महिलेला दोरखंडाने बांधत लोखंडी साखळीचे चटके दिले. एवढेच नाही तर त्यांनी या वृद्ध महिलेला मिरचीची धुरी दिली. तिच्या गळ्यात चप्पल बुटांचा हार घातला. तिला मानवी मूत्र पाजले. तिला मारहाण केली. व तिची धिंड पूर्ण गावातून काढली. हा सर्व प्रकार ग्रामस्त पाहत होते. मात्र, या महिलेच्या मदतीला कोणी आले नाही. गावातील पोलीस पाटील बाबुभाई नावाच्या व्यक्तिने हे क्रूरकर्म केलं. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Emergency Review : कंगनाचा ‘इमर्जन्सी’ बघायला जायचा विचार करताय? आधी हा रिव्ह्यू नक्की वाचा!

0
Emergency Review : कंगनाचा ‘इमर्जन्सी’ बघायला जायचा विचार करताय? आधी हा रिव्ह्यू नक्की वाचा!


Emergency Review In Marathi : कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगनाव्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाक नायर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



Source link

नगर परिषदा व नगर पंचायतीतील अनुकंपा नियुक्ती घोटाळा: सखोल चौकशीची मागणी

0
नगर परिषदा व नगर पंचायतीतील अनुकंपा नियुक्ती घोटाळा: सखोल चौकशीची मागणी

फलटण – सातारा जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये मयत कर्मचारी वारसांच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जयवंत राजकुमार राऊत यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जयवंत राऊत यांच्या निवेदनानुसार, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या नियुक्तीसाठी अनुकंपा प्रस्ताव मागवले जात असताना संबंधित कार्यालयातील अधिकारी गणेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमत करून लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाच घेतल्याचा आरोप आहे. त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येकी ₹50,000 ते ₹1,00,000 पर्यंतची रक्कम घेतल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

70 ते 80 लाखांचा गैरव्यवहार:
या लाचखोरीतून 70 ते 80 लाख रुपयांची रक्कम गोळा झाल्याचा आरोप असून, नियुक्ती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच, राऊत यांनी मागणी केली आहे की, चौकशी पूर्ण होईपर्यंत अनुकंपा धारकांच्या प्रतीक्षा यादीवर कोणताही निर्णय घेऊ नये आणि संबंधित अधिकारी गणेश चव्हाण यांच्याकडून सर्व फायली ताब्यात घ्याव्यात.

चौकशीची मागणी:
गणेश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना, अडकलेल्या पैशांची परतफेड होण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचा आग्रह करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक अधिकाऱ्यांचे गैरव्यवहार उघड होतील, अशी चर्चा होत आहे.

लोकांच्या अपेक्षा:
सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यावर काय कारवाई करणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी जिल्ह्यात खळबळ माजली असून, तातडीने कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Beed Crime : गर्लफ्रेंड बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडनं तरुणीच्या घरात जाऊन केला गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार

0
Beed Crime : गर्लफ्रेंड बोलत नसल्यानं संतापलेल्या बॉयफ्रेडनं तरुणीच्या घरात जाऊन केला गोळीबार! बीडमधील धक्कादायक प्रकार


Beed Crime : बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन सख्ख्या भावांची हत्या भवांची हत्या करण्यात आली होती. या घटना ताज्या असतांना आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीने बोलणे बंद केल्याच्या रागातून एका प्रियकराने तरुणीच्या घरी जात गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी वा जीवित हानी झालेली नाही. ही घटना आंबेजोगाई येथे शुक्रवारी घडली.



Source link