Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 603

Digital Arrest: डिजिटल अरेस्ट होण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे? ‘या’ सोप्या टिप्समुळे राहाल सुरक्षित!

0
Digital Arrest: डिजिटल अरेस्ट होण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे? ‘या’ सोप्या टिप्समुळे राहाल सुरक्षित!


How to Protect Yourself from Digital Arrest: इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या असल्या आहेत, पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीचे जाळे वेगाने पसरत चालले असून ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून लोकांच्या मेहनतीचा पैसा एका झटक्यात लुबाडत आहेत.डिजिटल अरेस्ट हा आता त्यात एक नवीन प्रकार उदयाला आला आहे, यात लोकांना डिजिटल स्वरुपात अटक केली जाते. दरम्यान, डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमके काय, त्यापासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.



Source link

सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण

0
सुंदर डोळ्यांमुळे व्हायरल झालेल्या मोनालिसाला सोडावे लागले महाकुंभ, आता बहिणींनी सांगितले कारण


पुढील
बातमी

कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा संपूर्ण टाइमलाईन





Source link

रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!

0
रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!


Bollywood Nostalgia : सिनेसृष्टीत काही कलाकार त्यांच्या अभिनयासाठी तर काही त्यांच्या सिग्नेचर स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुपरस्टार रजनीकांत, ज्यांना मनोरंजन विश्वाचे थलायवा देखील म्हटले जाते. वयाच्या ७४व्या वर्षीही त्यांच्या आयकॉनिक शैलीशी कोणीही बरोबरी करू शकत नाही.



Source link

         ‘राजापूर शाळेचा जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा व हस्ताक्षर स्पर्धेत ‘दिमाखदार विजय’

0
         ‘राजापूर शाळेचा जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा व हस्ताक्षर स्पर्धेत ‘दिमाखदार विजय’

पुसेगाव  :- सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत खटाव तालुक्यातील राजापूर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेने उज्वल यश संपादन केले आहे. या शाळेने प्रश्नमंजुषा आणि हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यातील सर्वोच्च स्थान पटकावले.

प्रश्नमंजुषा स्पर्धेतील यश:

  • लहान गट (1ली ते 5वी):
    समर्थ तानाजी काळोखे, शंभूराजे अभय काटकर, जान्हवी अजित दिडके यांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला.
  • मोठा गट (6वी ते 8वी):
    अमेय विकास फडतरे, तनया दत्तात्रय घनवट, अर्णव दत्तात्रय फडतरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

हस्ताक्षर स्पर्धेत चमक:

इयत्ता 7वीच्या संस्कृती प्रवीण फडतरे हिने प्रथम क्रमांक मिळवत राजापूर शाळेचे नाव उज्ज्वल केले.

मुख्याध्यापकांचे मत:

शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाचे श्रेय दिले.

अभिनंदन व पाठिंबा:

गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, चंद्रकांत सुतार, केंद्रप्रमुख अजित निकाळजे, नितीन खोत, रमेश सूर्यवंशी, सरपंच वनिता पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश घनवट आणि सदस्यांनी अभिनंदन केले.

प्रश्नमंजुषा व हस्ताक्षर स्पर्धेसाठी शिक्षकांचे योगदान:

विनोद गोडसे, दीपक घनवट, अजित चव्हाण, सुवर्णा घनवट, वैशाखी साबळे, सपना राऊत, अमित भिसे, अमृता शेवते, तसेच तंत्रस्नेही शिक्षक आशिष डंगारे यांनी विशेष मेहनत घेतली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रमुख:

राजेंद्रबापू पाटील, दशरथ घनवट, हणमंत घनवट, ज्योतीराम घनवट, नारायण घनवट, रामदास डंगारे यांचाही मोलाचा सहभाग होता.

या यशामुळे राजापूर शाळेने जिल्ह्यात आपली ओळख प्रस्थापित केली असून, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Arjun Kapoor: अर्जुन कपूरच्या सिनेमाच्या सेटवर मोठा अपघात, शुटिंगदरम्यान कोसळले छत

0
Arjun Kapoor: अर्जुन कपूरच्या सिनेमाच्या सेटवर मोठा अपघात, शुटिंगदरम्यान कोसळले छत


अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी ‘मेरे हस्बैंड की बीवी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या सेटवर एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा अपघात झाला होता. खरं तर या गाण्याचं शूटिंग मुंबईतील इम्पीरियल पॅलेस ऑफ रॉयल पाम्समध्ये सुरू होतं. शुटिंग सुरू असताना अचानक छत कोसळले. या दुर्घटनेत अर्जुन कपूरसह अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.



Source link

कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा संपूर्ण टाइमलाईन

0
कोलकाता डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा संपूर्ण टाइमलाईन


RG Kar Rape Murder Case: 9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडीकल कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टर अर्धनग्न मृत अवस्थेत आढळली. यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले. आता या घटनेला 161 दिवस पूर्ण झाल्यानंतर कोलाकाताच्या सेशन कोर्टने निर्णय देत संजय रॉयला दोषी ठरवले आहे. याप्रकरणी आतापर्यंत काय काय झालं? जाणून घेऊया.   

आतापर्यंत काय झालं?

9 ऑगस्ट: कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. कॉलेजच्या सेमिनार हॉलच्या तिसऱ्या मजल्यावर मृतदेह आढळला.

10 ऑगस्ट: कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याच्यावर संशय आला आणि त्याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. या दिवसापासून पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचे निदर्शने सुरू झाले.

12 ऑगस्ट: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलिसांना हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी पोलिसांना 7 दिवसांची मुदत दिली. जर या वेळेत प्रकरण सोडवले नाही तर ती हे प्रकरण सीबीआयकडे सोपवेल, असेही त्यांनी सांगितले. त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात आला. आरजी कारचे प्राचार्य संदीप घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

13 ऑगस्ट: कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. हे प्रकरण अत्यंत भयानक असल्याचे म्हटले आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवले. न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना कामावर परतण्याची विनंतीही केली.

14 ऑगस्ट: सीबीआयने 25 सदस्यांची टीम तयार केली. एक फॉरेन्सिक टीमदेखील स्थापन करण्यात आली. दरम्यान शेकडो विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि सामान्य लोक रस्त्यावर उतरले आणि या घृणास्पद गुन्ह्याचा निषेध करण्यात आला.

15 ऑगस्ट: रात्रीच्या वेळी एका जमावाने रुग्णालयात घुसून आपत्कालीन विभाग आणि नर्सिंग स्टेशनची तोडफोड केली. याच्या निषेधार्थ, इंडियन मेडिकल असोसिएशनने 17 ऑगस्ट रोजी देशभरात 24 तास सेवा बंद ठेवण्याची हाक दिली आहे.

16 ऑगस्ट: पोलिसांनी तोडफोडीच्या आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली आणि दीड डझनहून अधिक लोकांना अटक केली.

18 ऑगस्ट: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण तोडफोडी प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि 20 ऑगस्ट ही सुनावणीची तारीख निश्चित केली.

19 ऑगस्ट: सीबीआयने संदीप घोष यांची चौकशी केली. सीबीआयला आरोपीची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मिळाली.

20 ऑगस्ट: सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने डॉक्टरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश दिले. याअंतर्गत, 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि कोलकाता पोलिसांना स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

21 ऑगस्ट: केंद्र सरकारने आरजी कर रुग्णालयाची सुरक्षा सांभाळण्यासाठी केंद्रीय सैन्य पाठवले. दरम्यान तोडफोडीच्या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले.

24 ऑगस्ट: लाय डिटेक्टर चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये मुख्य आरोपीसह इतर सहा जणांवर या चाचण्या करण्यात आल्या.

25 ऑगस्ट: आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष, माजी एमएसव्हीपी संजय वशिष्ठ आणि इतर 13 जणांच्या निवासस्थानी सीबीआयने छापे टाकले.

26 ऑगस्ट: पश्चिम बंगाल विद्यार्थी संघटनेने नबन्ना अभियान मार्चची घोषणा केली आणि ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

2 सप्टेंबर: संदीप घोषला अटक करण्यात आली. आरजी कर हॉस्पिटलमधील आर्थिक फसवणुकीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.

14 सप्टेंबर: सीबीआयने कोलकाता पोलीस अधिकारी अभिजित मंडल यांना अटक केली. संदीप घोष बलात्कार आणि खून प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास विलंब आणि पुरावे गायब केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

3 ऑक्टोबर: पीडितेला न्याय मिळण्यास विलंब झाल्यामुळे कोलकाता येथील WBJDF डॉक्टरांनी उपोषण केले.

7 ऑक्टोबर: सीबीआयने या बलात्कार-हत्येच्या प्रकरणात संजय रॉयला आरोपी बनवले आणि आरोपपत्र दाखल केले.

21 ऑक्टोबर: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी WBJDF डॉक्टरांना राजी केले आणि डॉक्टरांनी त्यांचे 17 दिवसांचे उपोषण संपवले.

11 नोव्हेंबर: आरजी कर बलात्कार-हत्येच्या खटल्याची सुनावणी सियालदाह न्यायालयात सुरू.

18 जानेवारी: आज सियालदाह न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले.





Source link

कोलकाता महिला डॉक्टरवर बलात्कार, हत्याप्रकरणात संजय रॉय दोषी; कोर्टाचा मोठा निर्णय!

0
कोलकाता महिला डॉक्टरवर बलात्कार, हत्याप्रकरणात संजय रॉय दोषी; कोर्टाचा मोठा निर्णय!



Kolkata court Decesion:  कोलकात्यातील आर.जी.मेडीकल कॉलेजमध्ये 31 वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. 



Source link

शॉर्ट नोटीसवर महाकुंभचा प्लॅन करताय? जाणून घ्या A to Z माहिती; खर्च, प्रवास…

0
शॉर्ट नोटीसवर महाकुंभचा प्लॅन करताय? जाणून घ्या A to Z माहिती; खर्च, प्रवास…



Maha Kumbh Mela 2025: आयत्या वेळी महाकुंभ मेळ्याला जायचंय? कसे जाल, कुठे राहाल, किती खर्च येईल? जाणून घ्या 
 



Source link

आजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा ट्रेलर पाहिला का?

0
आजी तू देवा घरी कधी जाणार?; निरागस मायराच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’चा ट्रेलर पाहिला का?


कोणते कलाकार दिसणार?

“मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटात मायरा वायकूळ, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर, उषा नाडकर्णी, माधवी जुवेकर, कमलेश सावंत, स्पृहा परब, रुक्मिणी सुतार यांच्या मध्यवर्ती भूमिका चित्रपटात पहायला मिळणार असून अभिनेत्री पूजा सावंत ही पाहूण्या कलाकारच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.



Source link

आम्हालाही ८वा वेतन आयोग लागू करा! केंद्र सरकारनं निर्णय घेताच महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी सरसावले!

0
आम्हालाही ८वा वेतन आयोग लागू करा! केंद्र सरकारनं निर्णय घेताच महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी सरसावले!


Maharashtra govt employees on 8th Pay Commission : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आनंदात आहे. त्यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग लागू करावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. 



Source link