Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 602

राज्यातील नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर

0
राज्यातील नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर

फलटण :- राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी आज जाहीर करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जिल्हानिहाय पालकमंत्री यादी:

  • गडचिरोली: देवेंद्र फडणवीस
  • ठाणे: एकनाथ शिंदे
  • पुणे: अजित पवार
  • बीड: अजित पवार
  • नागपूर: चंद्रशेखर बावनकुळे
  • अमरावती: चंद्रशेखर बावनकुळे
  • अहिल्यानगर: राधाकृष्ण विखे पाटील
  • वाशिम: हसन मुश्रीफ
  • सांगली: चंद्रकांत पाटील
  • सातारा: शंभूराजे देसाई
  • छत्रपती संभाजीनगर: संजय शिरसाट
  • जळगाव: गुलाबराव पाटील
  • यवतमाळ: संजय राठोड
  • कोल्हापूर: प्रकाश आबिटकर (सह पालकमंत्री: माधुरी मिसाळ)
  • अकोला: आकाश फुंडकर
  • भंडारा: संजय सावकारे
  • बुलढाणा: मंकरंद जाधव
  • चंद्रपूर: अशोक ऊईके
  • धाराशीव: प्रताप सरनाईक
  • धुळे: जयकुमार रावल
  • गोंदिया: बाबासाहेब पाटील
  • हिंगोली: नरहरी झिरवळ
  • लातूर: शिवेंद्रसिंग भोसले
  • मुंबई शहर: एकनाथ शिंदे
  • मुंबई उपनगर: आशिष शेलार (सह पालकमंत्री: मंगलप्रभात लोढा)
  • नांदेड: अतुल सावे
  • नंदुरबार: मानिकराव कोकाटे
  • नाशिक: गिरीश महाजन
  • पालघर: गणेश नाईक
  • परभणी: मेघना बोर्डीकर
  • रायगड: अदिती तटकरे
  • सिंधुदुर्ग: नितेश राणे
  • रत्नागिरी: उदय सामंत
  • सोलापूर: जयकुमार गोरे
  • वर्धा: पंकज भोयर
  • जालना: पंकजा मुंडे

या यादीमुळे राज्याच्या प्रशासनाला गती मिळेल, तसेच जिल्ह्यातील विकासकामे अधिक वेगाने पार पडतील, अशी अपेक्षा आहे.

  महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती: सातारा जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा

0
  महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती: सातारा जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा

फलटण :-  महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील चार प्रमुख कॅबिनेट मंत्री आहेत: शंभूराज देसाई, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील.

शंभूराज देसाई हे पर्यटन, खणीकर्म व सैनिक कल्याण विभाग सांभाळत असून, त्यांनी यापूर्वीही सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माण मतदारसंघाचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात असल्याने, या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील विकास योजनांना नवी दिशा मिळेल. या नियुक्तीने फलटणच्या राजे गट व मोहिते-पाटील गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची त्यांच्याबाबत चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लातूर जिल्ह्याची जबाबदारी देऊन मोठा निर्णय घेतला.

मकरंद पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री, यांची बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यात मदत व पुनर्वसन कार्यक्रमांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे परिणाम:
सातारा जिल्ह्यात महायुतीच्या मंत्रिमंडळातील चार कॅबिनेट मंत्र्यांच्या नियुक्तीमुळे या जिल्ह्याचे राजकीय समीकरण अधिक मजबूत होणार आहे. तसेच या नेत्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित जिल्ह्यांमध्ये विविध विकास प्रकल्पांना गती मिळेल.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार: जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती; सातारा जिल्ह्यासाठी शंभूराज देसाई

0
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार: जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती; सातारा जिल्ह्यासाठी शंभूराज देसाई

फलटण – महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी देखील त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन, खणीकर्म, आणि सैनिक कल्याण विभागाचे कार्यही पार पाडले जाईल.

सातारा जिल्ह्यात महायुती सरकारचे चार कॅबिनेट मंत्री असून, त्यामध्ये शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा समावेश आहे.

इतर जिल्ह्यांसाठी पालकमंत्री नियुक्ती

  1. सोलापूर जिल्हा: जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा माण मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने सोलापूरच्या विकास प्रकल्पांना त्यांच्या नेतृत्वाखाली चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. यामुळे मोहिते-पाटील आणि राजे गटाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
  2. लातूर जिल्हा: श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नियुक्ती लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी करण्यात आली आहे. याआधी त्यांचे नाव सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी चर्चेत होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची लातूरसाठी निवड करून मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
  3. बुलढाणा जिल्हा: मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना बुलढाण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात मदत व पुनर्वसन कार्यक्रमांना प्राधान्य मिळणार आहे.

महायुती सरकारची उपस्थिती मजबूत

या मंत्रिमंडळ विस्तारामुळे सातारा जिल्ह्याचे राजकीय समीकरण अधिक मजबूत होणार आहे. तसेच, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विकासाच्या प्रकल्पांना गती मिळेल. या नियुक्त्यांमुळे महायुती सरकारची जिल्हास्तरीय उपस्थिती अधिक भक्कम होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Sahas Times, Phaltan,Maharashtra Politics ,Cabinet Expansion ,Satara ,Development Projects,
Slug: maharashtra-cabinet-expansion-district-wise-guardian-ministers

365 राण्यांचा एकच राजा! भारतातील ‘या’ राजाच्या महालात फक्त विवस्त्र होऊनच मिळायची एंट्री

0
365 राण्यांचा एकच राजा! भारतातील ‘या’ राजाच्या महालात फक्त विवस्त्र होऊनच मिळायची एंट्री



Bhupinder Singh: भारतात असा एक राजा होता ज्याच्या 365 राण्या होत्या. या राजाच्या महालात फक्त विवस्त्र होऊनच एंट्री मिळायची. या राजाकडे 44 रोल्स रॉयस आणि प्रायव्हेट जेट होते. 



Source link

Dhananjay Munde: पालकमंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट होताच धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर लिहिली भलीमोठी पोस्ट

0
Dhananjay Munde: पालकमंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट होताच धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावर लिहिली भलीमोठी पोस्ट



Dhananjay Munde On Maharashtra Guardian Minister List: राज्याच्या पालकमंत्रीपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

राज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही घेतली!

0
राज्याचे पालकमंत्री जाहीर; धनंजय मुंडेंनी बीड गमावले, शिंदेंनी ठाणे राखले आणि मुंबईही घेतली!


Maharashtra Guardian Minister List: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. बीडमधील सरपंच संतोष देशमुख अपहरण हत्याप्रकरणामुळे चर्चेत असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना यादीतून वगळण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद संभाळतील. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबईचे पालकमंत्री असतील.



Source link

JEE Main Admit Card 2025 : जेईई मेन्स परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड आलं; हॉल तिकीट असं करा डाउनलोड!

0
JEE Main Admit Card 2025 : जेईई मेन्स परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड आलं; हॉल तिकीट असं करा डाउनलोड!


NTA Released JEE Main Admit Card 2025: नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने २२, २३ आणि २४ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड जारी केले आहे. तर, २८ जानेवारी- २९ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड नंतर जारी केले जारी केले जातील. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार एनटीएची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in येथे भेट देऊ शकतात. दरम्यान, या परीक्षेसाठी हॉल तिकीट कुठून आणि कसे डाऊनलोड करायचे? हे जाणून घेऊयात.



Source link

Priya Bapat: प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी गूडन्यूज, मुक्ता बर्वेसोबत ‘या’ चित्रपटात करणार काम

0
Priya Bapat: प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी गूडन्यूज, मुक्ता बर्वेसोबत ‘या’ चित्रपटात करणार काम


‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजच्या माध्यातून देशभरातली चाहत्यांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आता प्रिया मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या आगामी सिनेमाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. चला जाणून घेऊया या सिनेमाविषयी…



Source link

Valmik Karad: अमाप संपत्ती असलेल्या वाल्मिक कराडची शेती सांभाळणाऱ्यांवर अशी कशी आली वेळ!

0
Valmik Karad: अमाप संपत्ती असलेल्या वाल्मिक कराडची शेती सांभाळणाऱ्यांवर अशी कशी आली वेळ!


Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराडची अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचे उघड झाले. वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत. बीड, परळी, पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर सोलापुरातही वाल्मिक कराडची संपत्ती असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव कोट्यावधी संपत्तीची मालक असून तिच्या नावे बार्शीत जवळपास ३५ एकर शेती आहे. परंतु, या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या अनेक कुटुंबाला गेल्या तीन- चार महिन्यापासून पगार दिला जात नाही, अशी माहिती समोर आली आहे.



Source link

Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीने वाचवले एका महिलेचा जीव, तुरूंगातून बाहेर येताच तिने मानले आभार

0
Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीने वाचवले एका महिलेचा जीव, तुरूंगातून बाहेर येताच तिने मानले आभार


बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा कायमच सर्वांच्या आठवणीत राहिला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही देखील तेव्हापासून चर्चेत आहे. सुशांतच्या निधनानंतर रियावर अनेक आरोप करण्यात आले. आता रियाने पॉडकास्टच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पुनरागमन केले आहे. या पॉडकास्टमध्ये तिने तुरुंगात असतानाचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल.



Source link