Tuesday, September 15, 2026
Homeसातारा  महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती: सातारा जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा

  महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती: सातारा जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा

फलटण :-  महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील चार प्रमुख कॅबिनेट मंत्री आहेत: शंभूराज देसाई, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील.

शंभूराज देसाई हे पर्यटन, खणीकर्म व सैनिक कल्याण विभाग सांभाळत असून, त्यांनी यापूर्वीही सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माण मतदारसंघाचा समावेश माढा लोकसभा मतदारसंघात असल्याने, या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील विकास योजनांना नवी दिशा मिळेल. या नियुक्तीने फलटणच्या राजे गट व मोहिते-पाटील गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची त्यांच्याबाबत चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लातूर जिल्ह्याची जबाबदारी देऊन मोठा निर्णय घेतला.

मकरंद पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री, यांची बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यात मदत व पुनर्वसन कार्यक्रमांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे परिणाम:
सातारा जिल्ह्यात महायुतीच्या मंत्रिमंडळातील चार कॅबिनेट मंत्र्यांच्या नियुक्तीमुळे या जिल्ह्याचे राजकीय समीकरण अधिक मजबूत होणार आहे. तसेच या नेत्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित जिल्ह्यांमध्ये विविध विकास प्रकल्पांना गती मिळेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments