Tuesday, August 4, 2026
Home Blog Page 601

Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारठा अन् दुपारी उकाडा! ‘या’ आठवड्यात कसे असेल हवामान ? IMD चा अलर्ट

0
Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारठा अन् दुपारी उकाडा! ‘या’ आठवड्यात कसे असेल हवामान ? IMD चा अलर्ट


Maharashtra IMD Weather Update : राज्यात तापमानात मोठा बदल दिसून येत आहे. कुठे थंडी तर कुठे उष्णता असे चित्र आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीसह तापमानात देखील वाढ होणार आहे. तर ढगाळ हवामान देखील राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमानात घट झाली आहे. तर कोकण, मराठवाड्यात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली आहे. उत्तरेत थंडीचा प्रकोप सुरूच आहे. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर देखील होत आहे. हवेत गारठा आहे. पुढील काही दिवसांत हा गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



Source link

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदाच्या अटी पाळल्याशिवाय मिळणार नाही अतिरिक्त पाणी

0
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदाच्या अटी पाळल्याशिवाय मिळणार नाही अतिरिक्त पाणी


Pune Water Issue : पुणेकरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी सातत्याने होत असते. मात्र, यावर आता जलसंपदा विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. शहराच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी महापालिकेने पाण्याच्या पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया व धरणांमधील पाण्याचे आरक्षण बिगर सिंचनासाठी वाढविण्यास लागणारा भुर्दंड सोसावा तसेच अर्टीची पूर्तता केल्याशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देणार नक्षी अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे पुणेकरांना वाढीव पाणी मिळणार की नाही हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.



Source link

Maharashtra Election News LIVE January 19, 2025: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

0
Maharashtra Election News LIVE January 19, 2025: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू


Maharashtra Election 2024 News LIVE: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

Maharashtra Election 2024 News LIVE: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 19 Jan 202507:56 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

  • Goa Paragliding Accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करतांना दरीत कोसळल्याने पुण्यातील पर्यटक तरुणीचा व पॅराग्लायडरचा दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर रायजादा यांच्याविरोधात मांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Read the full story here

Sun, 19 Jan 202507:40 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला

  • Raigad Guardian Minister Issue: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी रात्री मुंबई-गोवा महामार्ग रोखला.


Read the full story here

Sun, 19 Jan 202507:04 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Bird Flu in Maharashtra: उदगीरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव! शासनाने केली अलर्ट झोनची घोषणा

  • Bird Flu in Maharashtra: लातूरमधील उदगीर तालुक्यात अचानक कावळे व काही पक्षी मरून पाडल्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.


Read the full story here

Sun, 19 Jan 202505:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पोलिस भरतीचं स्वप्न भंगलं! भरधाव एसटीने भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुणांना चिरडलं; बीड-परळी महामार्गावरील घटना

  • Beed Accident : बीड पळळी मार्गावर भीषण अपघात झाला आहे. पोलिस भरतीची तयारी करत असतांना तीन तरुणांना भरधाव एसटीने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


Read the full story here

Sun, 19 Jan 202504:49 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: विजय दास कसा सापडला तावडीत! एक कॉल ठरला महत्वाचा; कांदळवनाच्या जंगलातून अटकेचा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

  • Saif Ali Khan Case Update : सेफ अली खानच्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोर हा कांदळवनाच्या जंगलात लपून बसला होता. त्याच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला.


Read the full story here

Sun, 19 Jan 202504:12 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे हादरले! सावकाराच्या जाच्याला कंटाळून १० वर्षांच्या मुलाची केली हत्या, नंतर पत्नी पत्नीने घेतला गळफास, पती बचावला

  • Pune Pimpri Chinchwad Crime News: पुण्यात सावकारी जाच्याला कंटाळून एकाने आपल्या मुलाला ठार मारले. त्यानंतर पत्नीसह गळफास घेतला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.


Read the full story here

Sun, 19 Jan 202502:48 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: कोण आहे सैफ अली खानवर हल्ला करणारा विजय दास? १०० पोलिसांच्या पथकानं असं केलं जेरबंद; आरोपीचं बांग्लादेश कनेक्शन?

  • Saif Ali Khan: सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आढळला होता. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  


Read the full story here

Sun, 19 Jan 202502:27 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारठा अन् दुपारी उकाडा! ‘या’ आठवड्यात कसे असेल हवामान ? IMD चा अलर्ट

  • Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडी आणि उष्णता असा दोन्हींचा अनुभव नागरिक घेत आहेत. पुढील काही दिवस राज्यात थंडी, उकाडा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.


Read the full story here

Sun, 19 Jan 202501:44 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदाच्या अटी पाळल्याशिवाय मिळणार नाही अतिरिक्त पाणी

  • Pune water issue : पुण्यात अतिरिक्त पाणी देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्टीच्या पूर्ततेशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देता येणार नाही, अशी भूमिका जलसंपदा मंत्र्यांनी घेतली आहे.


Read the full story here

Sun, 19 Jan 202501:21 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक

  • Saif Ali Khan attacker arrested : अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. या व्यक्तीने हल्ल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मजूर छावणीतून आरोपीला अटक केली. 


Read the full story here





Source link

मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक

0
मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक


सैफ अली खान हल्ला प्रकरणी मध्य प्रदेशात शनिवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर अधिकाऱ्यांनी ही अटक आणखी वेगळ्या  प्रकरणात झाल्याचे सांगितले. सैफ अली खानच्या वांद्रे येथील राहत्या घरी घुसून एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याच्या मणक्याजवळ अडकलेला चाकूचा तुकडा काढला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सैफ अली खानचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीत घुसला होता.



Source link

रसिक स्पेशल: महानगरांतील महिलांच्या संघर्षावर प्रकाशझोत – Chhatrapati Sambhajinagar News

0
रसिक स्पेशल:  महानगरांतील महिलांच्या संघर्षावर प्रकाशझोत – Chhatrapati Sambhajinagar News




मोठे शहर नोकरी देते, म्हणून अनेक गावा – शहरांतून लोक मुंबईत येतात. अशा मोठ्या शहराचा आणखी एक गुण म्हणजे रोजच्या घाई – गडबडीत तुमचा शेजारी काय करतो/ करते, त्यांचे खासगी जीवन कसे आहे, याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नसतो. मुंबईत सगळे काही मिळेल, पण जागा मिळणे महाकठीण! ही मुंबई २४ तास जागी असते, कारण तिच्या कानाकोपऱ्यात कोणी ना कोणी काम करत असतात. अशा शहरात रात्रंदिन काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न, त्यांची घुसमट आणखी वेगळी. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजलेल्या आणि आता डिस्ने हॉटस्टारवर आलेल्या ‘All We Imagine as Light’ या सिनेमाने मुंबईतील अशा झगडणाऱ्या स्त्रियांचा संघर्ष समोर आणला आहे. आपल्याला दिसणाऱ्या या शहराच्या वरवरच्या लखलखाटामागे दडलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यांवर हा सिनेमा प्रकाशझोत टाकतो.सिनेमाच्या सुरूवातीला अशीच रात्रभर जागणारी मुंबई दिसते. कोणी आपल्या कुटुंबाशी भांडण करून घर सोडून मुंबईत आलेला असतो, कोणी गरोदर असल्यामुळे तिथे आलेली असते, पण तिला इथे आल्यावर राहण्यासाठी जागा आणि नोकरी मिळालेली आहे. कोणी केरळवरून आलेली आहे, तर कोणी गुजरातमधून, कोणी महाराष्ट्रातल्या गावाकडून आला आहे. त्यामुळे या सिनेमातील अनेक पात्रे वेगवेगळ्या भाषेत संवाद करताना दिसतात. हीच खरी मुंबई. मुंबईत काम आहे, पैसा आहे. काम मिळाल्यावर आपली पाळेमुळे विसरायला लावणारी मुंबई इथे दिसते. रात्रीच्या मुंबईतील अनेक सर्वसामान्य लोकांच्या खडतर आयुष्यातील प्रसंगांचा कोलाज बघता बघता प्रेक्षक या शहरात हरवून जातो आणि त्याचवेळी रात्र-प्रहरी लोकलमधून प्रवास करणारी प्रभा (कनी कुश्रुती) दिसते.प्रभा हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करते. ती स्वतःच्या जगात मश्गुल आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या अन्य नर्सबरोबर मौजमजा करायला ती कुठे जात नाही. काम झाल्यावर घरी येते. तिची रूम पार्टनर अनु (दिव्या प्रभा) या महिन्यातही घरभाडे द्यायला असमर्थ आहे. तरीही प्रभा तिच्या वतीने भाडे भरण्यास तयार आहे. प्रभा काम करते त्या हॉस्पिटलमधील पार्वती मावशी (छाया कदम) आपल्या व्यक्तिगत प्रश्नांशी झुंज देत आहेत. प्रभा त्यांनाही मदत करायला तयार आहे. प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न आहेत, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. एकेका प्रसंगांतून ते उलगडत जातात.सिनेमा हे दृक-श्राव्य माध्यम. त्यामुळे तिथे कॅमेरा बोलका आणि संवाद मोजके असणे अपेक्षित असते. या सिनेमात कॅमेरा सतत काहीतरी सांगत असतो. त्यामुळे कमीत कमी संवादात कथेचा आशय प्रेक्षकांच्या लक्षात येतो, त्यातूनच तो त्यात गुंतून जातो, हेच या सिनेमाचे वैशिष्ट्य! शहरात काम मिळवण्यासाठी गाव सोडणाऱ्या प्रत्येकासाठी आणि शहरात गेल्यावरच आपल्या मुलामुलीचे कल्याण होणार आहे, या आशेवर गावात राहणाऱ्या सर्व पालकांसाठी हा सिनेमा आहे. ही कथा तीन नायिकांची आहे, पण त्यांच्यात आणखी एक नायिका आहे – मुंबई. कथेमध्ये पुढे काय घडणार आहे, हे सांगणारा हा सिनेमा नव्हे. व्यग्र असलेल्या अनेक स्त्रियांचे अनेक प्रश्न त्यांच्या दृष्टिकोनातून आणि मोजक्या संवादातून शांत चित्ताने अनुभवणे, हीच त्याच्या कथानकाची खासियत आहे.या सिनेमातील अनेक प्रसंग सूचक आहेत, त्यामधून ज्याचे त्याने अर्थ काढावेत. हॉस्पिटलमध्ये आलेल्या २५ वर्षे वयाच्या स्त्रीला तीन मुले आहेत. एका स्त्रीला संततिनियमनाबद्दल जाणून घ्यायचे आहे. पण ती सांगते, असे ऑपरेशन पुरुषांनी केल्यामुळे त्यांच्यातली ताकद कमी होते, असे तिच्या नवऱ्याचे म्हणणे आहे. या प्रसंगातून पुरुषी मानसिकता आणि स्त्रियांची फरपटही दिसते. हॉस्पिटलच्या काउंटरवर असलेली अनु हे ऐकत असते, परंतु तिचा प्रियकर तिला भेटतो, तेव्हा तीसुद्धा अशीच असहाय्य होते. तिलाही त्याच्याकडून पुरुषी मनोवृत्तीचा अनुभव येतो. हे सर्व प्रसंग इतके सहजगत्या घडतात, पण त्यावरून काय अनुमान काढायचे हा निर्णय लेखिका – दिग्दर्शिका पायल कपाडियांनी प्रेक्षकांवर सोडला आहे. ‘एक होता राजा, एक होती राणी’ या पद्धतीची साचेबद्ध गोष्ट न सांगता, प्रेक्षक हुशार आहे हे समजून घेत काही प्रसंगांची मालिका तुकड्या तुकड्यामध्ये दाखवून त्याचे जिगसॉ कोडे सोडवण्याचे काम त्यांनी प्रेक्षकांवर सोपवले आहे.सर्वसामान्य स्त्रियांची व्यथा अतिशय तरलतेने दाखवताना भावविवश होण्याचे प्रसंग दिग्दर्शिकेने टाळले आहेत. रोजच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आजूबाजूला बघतो, तितक्या सहजतेने हा सिनेमा घडतो. मध्यंतरानंतर अचानक यातील तीन स्त्रिया समुद्रकिनारी वसलेल्या गावी जातात आणि कथानक वेगळे वळण घेते. हा भाग पटकथा लेखनामध्ये सहजतेने आला असता, तर सिनेमाने आणखी उंची गाठली असती. कनी कुश्रुतीचा संयमित अभिनय दाद देण्यासारखा आहे. दिव्या प्रभाने काही प्रसंग उठावदारपणे साकारले आहेत. छाया कदम यांनी मनात ठसठसणारा राग आणि उफाळून येणारी बंडखोर वृत्ती कमीत कमी संवादातून अतिशय प्रभावीपणे दाखवली आहे. ‘लापता लेडीज’, ‘अंधाधुन’, ‘न्यूड’, ‘सैराट’च्या तुलनेत या सिनेमात त्यांना कमी संवाद आहेत, तरीही ‘छाया कदम छा गई,’ असे म्हणावे लागते.शहरापासून गावापर्यंत स्त्रियांच्या अस्तित्वाचा झगडा कसा सुरू आहे, याचे प्रत्यंतर तिघींच्या वेगवेगळ्या कथांतून समोर येते. अशा अर्थपूर्ण सिनेमांना ‘एनएफडीसी’सारख्या संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळाले, तर प्रेक्षकांना सुजाण करणाऱ्या अशा अनेक उत्तम कथा पडद्यावर येऊ शकतील. suhass.kirloskar@gmail.com



Source link

डायरीची पाने: गूळ, गोडी अन् घोळणा

0
डायरीची पाने:  गूळ, गोडी अन् घोळणा




नुकतीच संक्रात झाली. घरात करून ठेवलेला तिळगुळ अजून संपलेला नाही. पाहुण्यारावळ्यांचा तिळगुळ येत आहे. आपण तिळगुळ खाण्याची संधी सोडत नाही. आता हळूहळू दिवस तिळातिळानं वाढत जाईल आणि उन्हाळा सुरू होईल. पण, तिळाच्या आठवणी जिभेवर आणि मनावर रेंगाळतच राहतील. संक्रात आली की मला माझ्या लहानपणीची संक्रात आठवू लागते. आज सर्वच गोष्टींचा सुकाळ आहे, तेव्हा सगळ्या गोष्टींचा दुष्काळ होता. पण, त्या दुष्काळातही जो गोडवा होता, तो आज आठवणींनाही खूप खूप गोड करतो आहे.तिळगुळातल्या गुळाची गोडी तेव्हा आमच्या लेखी फारच होती. साखर हा प्रकार तेव्हा माहीत नव्हता. मी ही साठ वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतोय. माझ्या त्या छोट्याशा खेड्यातील दुकानातही साखर कमीच असायची. कारण गावात कुणी फारसे साखर वापरतच नसे. गुळाची ढेप मात्र किराणा दुकानात असायची. सराट्याने किंवा एखाद्या मोठ्या गजाने ती ढेप टोकरून दुकानदार गुळ मोजून द्यायचा. छटाकभर किंवा दोन छटाक एवढ्याच मापात लोक गूळ घ्यायचे. कुणी किलोभर गूळ घेतलाय किंवा ढेपच विकत घेतली, असं कधी व्हायचं नाही. त्यामुळं गुळाचा खडा खायला लेकरं मिडकत असत. त्यांना खूप गूळ खावा वाटायचा, पण क्वचित लहानसा खडा त्यांच्या हातावर ठेवला जायचा. तो खडा चॉकलेट खाल्ल्यासारखा मुलं चघळून चघळून खायची. कुणी पाहुणेरावळे आले तर घरी चहासाठी आणलेल्या गुळाचा बारकासा खडा काढून लहान लेकराला दिला जायचा. पण, ते हात पुढे करत नसे. कारण त्या लेकराला गुळाच्या गोडीप्रमाणंच त्याची दुर्मिळताही माहीत असायची. त्यामुळं आमच्या लेखी गूळ ही खूप गोड; पण अत्यंत महागडी, दुर्मिळ अशी गोष्ट होती.आमच्या गावात १९७० च्या दरम्यान कॅनॉलचं पाणी आलं आणि १९७५ पासून ऊस लावायला सुरूवात झाली. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षापर्यंत आम्हाला ऊसही खायला मिळायचा नाही. पाहुण्यांच्या गावी, आमच्या आजोळी ऊस असायचा. आमचं आजोळच वहिनींचं गाव होतं. त्यांच्या वडिलांच्या शेतातही ऊस होता. थळ लागलं की ऊस खाण्याचं, रस पिण्याचं निमंत्रण असायचं. तिथून कधी तरी पाक आणि थोडासा गूळ भेट म्हणून यायचा. कधी कधी एखादी ढेपही यायची. ही ढेप आई वर्षभर पुरवायची. ती पोत्याच्या कापडात बांधून ठेवली जायची. ढेप संपल्यावर तो कपडा धुवून त्याच्या गोड पाण्यात भात शिजवला जायचा. तो गोड भात सगळं घर खायचा. हा गोड पदार्थही आमच्यासाठी दुर्मिळच होता.पुढे आमच्या शेतातही ऊस लावला जाऊ लागला. तो गुऱ्हाळावर नेला जाऊ लागला. गावातही एक गुऱ्हाळ सुरू झालं. मग ऊस, रस, पाक, गूळ या सगळ्याच गोष्टींची चंगळ झाली. आमच्या जिभेला गुळाची जी चव चिकटलेली होती, त्यामुळं साखर पांचट लागायची. कारण गुळाची गोडी विलक्षण आवडायची. त्यामुळं संक्रातीच्या काळात तिळगुळाचे लाडू खायला मिळणे ही मोठी पर्वणीच असायची. गोड पदार्थांपैकी पुरणाची पोळी हा पदार्थ जसा सर्वात जास्त आवडीचा होता, त्यापेक्षाही तिळगुळाचे लाडू हा पदार्थ आणखीच जास्त आवडायचा. गोड पदार्थांत क्रमवारी लावायची झाली, तर सगळ्यात पहिला क्रमांक तिळगुळाचा येतो. त्यात भाजलेल्या तिळाची चव आणि गुळाची गोडी इतकी विलक्षण मिसळलेली असायची की नुसत्या आठवणीनेही जिभेला पाणी सुटायचं. इतकी त्या गोडीची चव जिभेवर रेंगाळलेली असायची. त्यामुळे आजही आम्हाला जगातली सर्वात चवदार गोष्ट काही वाटत असेल, तर ती तिळगुळ हीच आहे.दिवाळीच्या मागंपुढं शेतातून तीळ आणि संक्रातीच्या आसपास गुऱ्हाळातून गूळ घरी यायचा. संक्रातीच्या निमित्तानं या दोघांचं मिलन व्हायचं, ते आयुष्यात विलक्षण चव आणायचं. तिळाच्या आधी वर्षभर तिळगुळ खायला मिळण्याचा प्रश्नच नव्हता. हौस म्हणून आज आपण कधीही तिळाच्या पोळ्या करतो, लाडू करतो. कारण आज तीळ आणि गूळ, साखरही भरपूर उपलब्ध आहे. पण तेव्हा असं नसायचं. तिळगुळाचे लाडू फक्त संक्रातीलाच खायला मिळायचे. त्यामुळं बुंदीच्या लाडूसाठी दिवाळीची वाट बघावी लागायची, तशी तिळगुळाच्या लाडूसाठी संक्रातीची वाट पाहावी लागायची. आणि तेही मर्यादित असायचे. एक मात्र असायचं, या काळात आई तिळगुळ घेऊन मला पाहुण्यांच्या गावी पाठवायची. म्हणजे आजोळी, वहिनींच्या माहेरी, बहिणीच्या सासरी. प्रत्येक पाहुण्याकडं गेलं की आपली तिळगुळाची पिशवी द्यायची आणि त्यांनी दिलेला तिळगुळ घेऊन घरी यायचं. त्यांच्या घरी आम्हाला तिळाचा लाडू खायला मिळायचाच. त्यामुळं हा तिळगुळाचा मुराळी होणं खूप फायद्याचं आहे, असं वाटायचं. मी सगळ्या आत्या, बहिणींसोबत नेहमीच त्यांच्या गावी जात असल्यामुळं हा तिळगुळ घेऊन जाण्याचं गोड काम मी आनंदानं करायचो.घरच्या उसाचा भरपूर गुळ घरी येऊ लागला. घरात गुळाच्या ढेपा ठेवलेल्या असायच्या, तेव्हा मात्र आधीसारखा वडीलधाऱ्यांसमोर गुळासाठी हात पसरावा लागायचा नाही. ढेप सोडून ठेवलेली असायची. जवळच सराटा ठेवलेला असायचा. त्या सराट्यानं गुळाच्या खपल्या काढून हव्या तेवढ्या खाता यायच्या. मी भरपूर गूळ खायचो. मला सगळे गोडघाशा म्हणायचे. गुळामुळं पोटातली उष्णता वाढायची. कधी कधी घोळणा फुटायचा. म्हणजे नाकातून रक्ताचे थेंब पडायला लागायचे. माझी बहीण गूळ तळायची आणि तळलेला गूळही विलक्षण चवदार लागायचा. त्यात कधी कधी शेंगदाणे टाकले, तर त्याची बाजारात मिळते तशी चिक्की व्हायची. तीसुद्धा विलक्षण चवदार लागायची. सगळे शेतात निघून गेले की, माझी बहीण आणि मी अशी चिक्की करून खायचो. सगळे शेतात निघून गेले की बहीण हळूच गूळ काढायची, चूल पेटवायची, त्यावर तवा ठेवून थोडसं तेल टाकायची. तेल कढलं की त्यात गूळ टाकायची. तो पातळ झाला की त्यात भाजलेले शेंगदाणे टाकून तवा खाली उतरवायची. हे मिश्रण थोडा वेळ हलवलं की एकजीव व्हायचं. तव्याला तेल लावल्यामुळं थोडा वेळ थंड झालं की गुळाची रेवडी तयार व्हायची. नंतर आम्ही तिचे तुकडे करून पोटभर खायचो. सगळं खाऊन झालं की बहीण सराटा, तवा सगळं घासून पुसून ठेवायची. पण, असा गूळ खाऊन खाऊन उष्णता वाढल्यानं सारखे घोळणे फुटू लागले, तेव्हा आईला संशय आला की हे गुळ तळून खात असावेत. त्या घोळण्यानं घोळ व्हायचा आणि आमची चोरी उघडी पडायची. inbhalerao@gmail.com



Source link

वेध मुत्सद्देगिरीचा…: निरुपमा राव : आव्हानांवर मात करत विस्तारला परीघ

0
वेध मुत्सद्देगिरीचा…:  निरुपमा राव : आव्हानांवर मात करत विस्तारला परीघ


डॉ. रोहन चौधरी1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

जागतिक राजकारणातील महिलांचे स्थान हा कायमच चिंतेचा आणि चिंतनाचा विषय राहिला आहे. महानता, उदात्ततेच्या परिमाणांमध्ये स्त्रियांची प्रतिमा बंदिस्त करुन, त्यांच्या यशाचे मार्ग मर्यादित ठेवण्यातच आपला समाज धन्यता मानतो. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातील महिलांविषयीचा कळवळा आणि वास्तव यात जमीन-अस्मानाचे अंतर दिसते. मुत्सद्देगिरीची दुनियाही या परिस्थितीला अपवाद नाही. आपल्याकडे विजयालक्ष्मी पंडित यांच्यापासून गायत्री इसार कुमार ते सुजाता सिंग यांच्यापर्यंत मुत्सद्देगिरीची एक परंपरा राहिली आहे. पण, आपल्यापैकी किती जण या नावांशी आणि त्यांच्या कार्याशी परिचित आहोत? या महिलांच्या कारकिर्दीत भारताच्या परराष्ट्र धोरणात मूलभूत बदल झाला आहे किंवा या महिलांनी पुरुषांपेक्षा वेगळी भूमिका घेतली, असे मानण्याचे काही कारण नाही. मुद्दा आहे, तो प्रतिनिधित्त्वाचा.महिलांच्या बाबतीत असलेल्या एकूणच प्रतिकूल परिस्थितीत, परराष्ट्र धोरणातील सामाजिक प्रतिनिधित्वाचा आश्वासक चेहरा निरुपमा राव यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. चीनमधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिला महिला प्रवक्त्या आणि भारताच्या माजी परराष्ट्र सचिव अशा महत्त्वाच्या पदांची जबाबदारी राव यांनी सांभाळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातून पदवी घेतलेल्या राव यांनी १९७३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत प्रवेश केला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या, श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त, चीनमधील राजदूत आणि परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी पार पाडलेली कामगिरी अत्यंत आव्हानात्मक होती.राव या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या असताना देशाच्या परराष्ट्र धोरणावर दीर्घकालीन प्रभाव पाडणाऱ्या घटना घडत होत्या. २००१ च्या जुलैमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आग्रा शिखर परिषदेमुळे दक्षिण आशियातील राजकारणात शांततेची संधी चालून आली होती. १९९९ च्या कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली कटुता दूर करून नवा अध्याय सुरू करण्याचा हा प्रयत्न होता. भारतातील जनमानस आणि राजकीय भावना पाहता, या संवादाच्या यशापयशापेक्षा त्याची गरज अधोरेखित करणे अधिक महत्त्वाचे होते. २००१ च्या डिसेंबरमध्ये भारताच्या संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला हा परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ता म्हणून राव यांच्यासमोरचे दुसरे आव्हान होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे, याबद्दल भारतीयांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. त्यावेळी गरज होती, ती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल दुटप्पीपणे वागणाऱ्या अमेरिकेला निक्षून सांगण्याची आणि पाकिस्तानचे खरे रूप जगासमोर आणण्याची. राव यांच्यातील मुत्सद्द्याने नेमकी हीच बाब हेरली. आज मागे वळून पाहताना त्यांनी ही जबाबदारी खूप संयमाने आणि यशस्वीपणे निभावल्याचे दिसते. अशा एखाद्या घटनेची निव्वळ माहिती देणे एवढीच परराष्ट्र प्रवक्त्याची जबाबदारी नसते, तर त्या घटनेच्या प्रतिक्रियेतून योग्य तो राजकीय आणि राजनयिक संदेश दिला जाणे अधिक महत्त्वाचे असते. हा संदेश कसा द्यायचा, याचा वस्तुपाठच राव यांनी घालून दिला.राव २००६ मध्ये चीनमधील भारताच्या पहिल्या महिला राजदूत बनल्या. चीनचे तत्कालीन राष्ट्रपती हू जिंताओ यांची भारत भेट तसेच आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची चीन भेट या त्यांच्या कार्यकाळातील राजकीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घटना होत्या. राजदूत हा केवळ देशाचा राजनयिकच नव्हे, तर आर्थिक आणि सांस्कृतिक प्रतिनिधीही असतो, याची जाणीव राव यांना होती. त्यांच्या कार्यकाळात ऑक्टोबर २००७ मध्ये चीनमधील ग्वांगझौ येथे भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ‘भारत – चीन व्यवसाय मंच’ही स्थापन करण्यात आला. भारत आणि चीन यांच्यातील संबंधाला राजकीय विषयापुरते मर्यादित न ठेवता, व्यापार तसेच गुंतवणुकीशी संबंधित क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित करणे, हा या मंचाचा उद्देश होता. राव यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये भारताने चीनच्या पश्चिमेकडील निमगिया प्रांतात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि माहिती केंद्र स्थापन केले. भारत – चीन संबंधांच्या इतिहासात अशा प्रकारचा पुढाकार प्रथमच घेण्यात आला होता. त्या माध्यमातून शेती हा विषयही दोन्ही देशांच्या परिघात यावा, अशी राव यांची इच्छा होती.राजकीय आणि आर्थिक पातळीवरील संबंधांबरोबरच भारत – चीन संबंधांना सांस्कृतिक आयाम देण्याचा प्रयत्नही राव यांनी आपल्या कार्यकाळात केला. या उद्देशाने त्यांनी भारतीय दूतावासाच्या सांस्कृतिक विभागाचा चीनमध्ये विस्तार करण्यास प्रारंभ केला. चिनी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावे तसेच संगीत आणि नृत्य या कलांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा विभाग कार्यरत राहावा, अशी त्यांची मनीषा होती. त्यामुळे अशा विविध उपक्रमांद्वारे भारतीय परराष्ट्र धोरणाचा परीघ वाढवण्याचे श्रेय निश्चितच त्यांना जाते. आपल्यापुढील आव्हानाचे संधीत रुपांतर करून राव यांनी परराष्ट्र सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी आदर्श निर्माण केला. मुत्सद्देगिरीइतकेच त्यांच्या कारकिर्दीचे हे एक मोठे यश मानावे लागेल.



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: जावेद अख्तर यांनी युवकाला दिलेले ते नॅरेशन – Chhatrapati Sambhajinagar News

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  जावेद अख्तर यांनी युवकाला दिलेले ते नॅरेशन – Chhatrapati Sambhajinagar News



जावेद साहेबांनी दोन दिवसांपूर्वी आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्त खंडाळ्यातील ‘सुकून’ या आपल्या बंगल्यात त्यांनी काही खास लोकांना बोलावले होते. मी पत्नीसह तिथे पोहोचलो, तेव्हा आपणही त्या खास लोकांमध्ये आहोत, याची मला जाणीव झाली. त्यामुळे आ

.

जावेद साहेबांसोबत मी कितीतरी संध्याकाळी, रात्री अन् तास घालवले आहेत. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण आठवणीत जपावा असा आहे. ते लिहायला बसलो तर पुस्तके तयार होतील, ऐकवू लागलो तर आठवडेही पुरणार नाहीत. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो, आजही शिकतो आहे. सारे जग त्यांच्या कविता, त्यांच्या नज्म, त्यांचे संवाद, त्यांची विनोदबुद्धी यावर फिदा आहे. त्यांच्या वाढदिवशी मला खूप काही आठवत होते, मी भावूकही झालो होतो.

मी मुंबईत आलो तेव्हा मी फारसे कुणाला ओळखत नव्हतो. ज्या दोन-चार लोकांनी मला प्रेम दिले, ज्यांच्यामुळे मला मुंबईत राहण्याचे बळ मिळाले, त्यापैकी एक जावेद साहेब होते. एका लहान शहरातला एक मुलगा एवढ्या मोठ्या शहरात आला होता. जावेद साहेब त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठे व्यक्ती होते, आजही आहेत. पण, ते माझे फोन घ्यायचे, मला घरी बोलवायचे. कधी घरी, कधी हॉटेलमध्ये खाऊ घालायचे. तासन् तास आपल्यासोबत बसवून घ्यायचे. अनेदका असे व्हायचे की, हॉटेलात बसलेलो असायचो आणि अगदी सकाळपर्यंत आमच्या गप्पा रंगायच्या. जो पुढे काही बनेल की नाही हेही माहीत नाही, अशा माझ्यासारख्या २०-२१ वर्षांच्या मुलाला ते आपल्यासोबत बोलवायचे, खाऊ घालायचे. हे खरे तर त्यांचे मोठेपण होते. मी एका खोलीत राहात होतो, तेव्हाही ते माझ्याकडे यायचे. मला अशा सगळ्या गोष्टी आठवताहेत. मी लेखनामध्ये, दिग्दर्शनामध्ये कुणाचा सहायक म्हणून काम केले नाही. मी फिल्मी मॅगेझीन वाचत नव्हतो; शिवाय त्या काळात इंटरनेट, लॅपटॉप असे काही नव्हते. जी गोष्ट मी पहिल्यांदा पाहिली-ऐकली ती म्हणजे एखाद्या कहाणीचे कथन. अशा नॅरेशनच्या बाबतीत मला थोडेफार माहीत होते. एखादी कहाणी सुरूवातीपासून शेवटपर्यंत सलगपणे ऐकवणे किंवा वाचून दाखवण्याला नॅरेशन म्हणतात, हे मी ऐकून होतो. पण, मी कधी प्रत्यक्षात असे नॅरेशन ऐकले नव्हते. मला आठवतेय, मी त्या काळात खूप त्रासलो होतो. लोक मला गांभीर्याने घेत नव्हते. मी भोपाळमध्ये नाटकात कामे करायचो, म्हणून मग इथेही पृथ्वी थिएटरमध्ये अॅक्टिंग करायला सुरूवात केली. मुंबईत पाय रोवण्यासाठी काही नाही जमले तर अॅक्टिंग करावी, असा विचार मी करत होतो.

त्या दरम्यान जावेद साहेबांचा ‘मैं आजाद हूँ’ हा सिनेमा तयार होत होता. त्यांनी मला हॉटेल हॉलिडे इनमध्ये बोलावले. म्हणाले, रूमी साहेब, आज मी तुम्हाला माझ्या सिनेमाचे नॅरेशन देतो. मी आतून खूप एक्साइट झालो. जावेद साहेबांनी मला तीन तास समोर बसवून प्रत्येक व्यक्तिरेखा आणि अगदी कॉमा, फुलस्टॉपसह इतके चांगले नॅरेशन दिले की, आख्खा सिनेमा माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. त्यादिवशी मला नॅरेशन कशाला म्हणतात आणि ते कसे देतात, हे समजले. जावेद साहेबांचे नॅरेशन तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. नॅरेशन ऐकवल्यावर ते म्हणाले, हा सगळा सिनेमा तुम्ही ऐकला आहे. यामध्ये काही तरुणांच्या भूमिका आहेत, काही डायलॉग आहेत. मला नाही वाटत की असे काम करुन तुम्हाला काही फायदा होईल. उलट नुकसानच होईल. मी ही कहाणी एवढ्यासाठीच ऐकवली की, मी तुमच्याबाबतीत गांभीर्याने विचार करत नाही, असे तुम्हाला वाटू नये. त्यांच्या बोलण्याने मी भावूक झालो. मनात विचार आला की, चला, जावेद साहेबांचे माझ्यावर इतके प्रेम आहे. ते माझा, माझ्या भल्याचा विचार करताहेत. मुंबईसारख्या शहरात आपल्याला साथ देणारे, आपल्या भल्याचा विचार करणारे लोक कुठं भेटतात? या गोष्टीवरून मला जावेद साहेबांनी लिहिलेला एक शेर आठवतोय… तुम ये कहते हो कि मैं ग़ैर हूँ फिर भी शायद निकल आए कोई पहचान ज़रा देख तो लो। जावेद साहेबांचे माझ्यावर किती प्रेम आहे, याचा प्रत्यय मला अनेकदा आला आहे. १९९७ मध्ये माझे लग्न झाले तेव्हा याची सर्वांत मोठी प्रचिती आली. माझे लग्न मुंबईत झाले आणि अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये खूप मोठे रिसेप्शन झाले, ज्याला सगळी फिल्म इंडस्ट्री आली होती. भोपाळमध्ये माझे मित्र मुकेश नायक यांच्या बंगल्यावर तिथल्या नातेवाईक आणि मित्रांसाठी एक रिसेप्शन ठेवले होते. मुंबईतील माझ्या रिसेप्शनच्या वेळी जावेद साहेब दिल्लीत होते आणि त्यांची रात्री दहाची शेवटची फ्लाइट चुकली होती. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की, रूमी साहेब, माझ्याकडून मोठी चूक झालीय की मी तुमच्या रिसेप्शनला येऊ शकलो नाही. तुम्ही माझे भाऊ आहात आणि तुमच्या रिसेप्शनला मी येणार नाही, असे होऊ शकत नाही. तुमचे भोपाळचे रिसेप्शन कधी आहे? मी म्हणालो, २ नोव्हेंबरला आहे. त्यांनी सांगितले की, मी भोपाळला येऊन तुमच्या रिसेप्शनला हजेरी लावेन. त्या काळी मुंबईहून भोपाळला सकाळी ५.४० वाजता एकच फ्लाइट होती. त्यासाठी पहाटे चारला घरातून निघावे लागायचे. त्यावेळी जावेद साहेब सकाळी इतक्या लवकर उठत नसत, हे मला माहीत होते. ही फ्लाइट पकडण्यासाठी तर रात्रभर जागावे लागायचे.

मी भोपाळमध्ये आमच्या घरी झोपलो होतो. मला बहिणीने उठवले आणि जावेद साहेबांचा फोन आहे, असे सांगितले. मी लगेच फोन घेतला. जावेद साहेब म्हणाले, ‘रूमी साहेब, मी भोपाळला पोहोचलोय, अशोका हॉटेलमध्ये चेक इनही केलंय. मला सांगा, रिसेप्शन किती वाजता आहे आणि कुठं यायचंय?’ माझी झोपच उडाली. जावेद साहेब आले आहेत, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी लगेच तयार झालो आणि त्यांना भेटायला हॉटेलवर गेलो. माझ्यावर किती प्रेम आहे, हे त्यांनी भोपाळला येऊन सिद्ध केले. त्यांचे हे प्रेम, ही साथ आयुष्यभर अशीच लाभावी, हीच माझी प्रार्थना. जावेद साहेबांसाठी त्यांनी लिहिलेले ‘मिस्टर इंडिया’तील हे गाणे ऐका… ज़िन्दगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है… स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा. परवा, १७ जानेवारीला जावेद अख्तर यांनी आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. जावेद अख्तर यांचे नॅरेशन संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे.



Source link

खलनिग्रहणाय: पोलिस तपासात ‘एआय’चा वापर – Chhatrapati Sambhajinagar News

0
खलनिग्रहणाय:  पोलिस तपासात ‘एआय’चा वापर – Chhatrapati Sambhajinagar News



पोलिस तपासात ‘एआय’च्या वापरातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांत्रिक पुरावा. न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी असे पुरावे खूप उपयोगी पडतात. गुन्ह्यांच्या तपासामध्ये ‘एआय’चा वापर वाढल्यास त्याचा दोषसिद्धीत मोठा फायदा होऊ शकतो. शिवाय, सर्व प्रकारच

.

केरळ पोलिसांनी १९ वर्षांपूर्वी घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील दोन फरार आरोपींना अलीकडेच ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अतिशय शिफातीने अटक केली. कोलाममधील एका महिलेची तिच्या जुळ्या मुलांसह निर्घृण हत्या करण्यात आली होती. यातील दोन आरोपी फरार असल्याने पोलिस त्यांना अटक करु शकले नव्हते. इतक्या वर्षात पोलिसांना त्यांचा कसलाही थांगपत्ता लागला नाही. सदर महिलेच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यानंतर २०१० मध्ये या हत्याकांडाचा तपास ‘सीबीआय’कडे देण्यात आला. ‘सीबीआय’ने तपास पूर्ण करुन २०१३ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, पण आरोपी मात्र फरारच राहिले.

आता १९ वर्षांनी गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपींची माहिती घेताना पोलिस महासंचालक कार्यालयाच्या कायदा – सुव्यवस्था विभागाला ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर केरळ पोलिसांच्या ‘टेक्निकल इंटेलिजन्स विंग’ने ‘एआय’च्या मदतीने तपास सुरू केला. या हत्याकांडातील आरोपींचे १९ वर्षांआधीचे फोटो मिळवून ते आता कसे दिसत असावेत, याविषयी विश्लेषण करण्यात आले. या फोटोंची जगभरातील विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या फोटोंशी ‘एआय’च्या सहाय्याने पडताळणी करण्यात आली. त्यात एक फोटो असा मिळाला, जो जुन्या फोटोशी ९० टक्के मिळताजुळता होता. कुठल्या तरी लग्नसमारंभात काढलेला हा फोटो पुद्दुचेरीतील एकाने आपल्या फेसबुकवर टाकला होता. मग पोलिसांनी डिजिटल तपासातून त्याला शोधून काढले आणि तो त्या दोन फरार आरोपींपैकी एक निघाला. मग त्याने दिलेल्या माहितीवरुन दुसरा आरोपीही पकडला गेला. दोन्ही आरोपींना केरळ पोलिसांनी ‘सीबीआय’च्या ताब्यात दिले.

केरळ पोलिसांची ही कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. त्यांनी जवळपास दोन दशके दडून बसलेले आरोपी शोधण्याचे अशक्य काम ‘एआय’च्या मदतीने शक्य केले. हा तपास देशातील पोलिसांसाठीही दिशादर्शक ठरला आहे. देशातील हजारो गंभीर गुन्हे आजवर उघडकीस आलेले नाहीत. जे उघडकीस आले त्यातील आरोपी फरार आहेत. त्यामुळे आता अशा आरोपींचा ‘एआय’च्या सहाय्याने छडा लावता येईल. केरळ पोलिसांच्या या कामगिरीची प्रेरणा घेऊन अन्य राज्यांच्या पोलिसांनी जुन्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला पाहिजे. ‘बीपीआरडी’नेही हा तपास मॉडेल मानून सर्व राज्यांच्या पोलिसांना त्याविषयी माहिती द्यायला हवी. कारण एखाद्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद होऊन त्याला शिक्षा होत नाही, तोवर पीडिताला न्याय मिळत नाही. तसेच असे गुन्हे करणाऱ्यांना जरबही बसत नाही.

अलीकडे सायबर गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. सायबर ठग हजारो कोटींची लूट करत आहेत. सेक्सटॉर्शनचे प्रमाणही खूप वाढले आहे. सायबर गुन्हेगार नवनव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी वापरतात. त्यामुळे असे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. उघडकीस आले तरी लोकांचे पैसे परत मिळत नाहीत. या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत आहेत. अशा सायबर गुन्हांच्या तपासातही ‘एआय’ची खूप मदत होऊ शकते. अनेकदा सायबर ठग आपला आवाज बदलून बोलतात. ‘एआय’च्या सहाय्याने त्यांच्या आवाजाचे विश्लेषण करुन योग्य तपास करता येईल. अशा गुन्ह्यांमध्ये व्हिडिओ कॉल करुन लोकांना धमकावणे ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. ब्लॅकमेल करून किंवा आमीष दाखवून पैसे लुटण्यात येतात. ‘एआय’च्या माध्यमातून अशा सायबर गुन्ह्यांचा अचूक उलगडा होऊ शकतो. आपल्याकडे सायबर गुन्ह्यांचा तपास करणारे अधिकारी ‘एआय’च्या वापराबाबत म्हणावे तेवढे दक्ष नसल्याचे दिसते. त्यांना या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

‘एआय’चा वापरातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांत्रिक पुरावा. न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी असे पुरावे खूप उपयोगी पडतात. गुन्ह्यांच्या तपासात ‘एआय’चा वापर वाढला तर त्याचा दोषसिद्धीमध्येही मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तपासामध्ये ‘एआय’चा अधिकाधिक वापर केल्यास सर्व प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करता येईल. सरकार आणि पोलिस दलाने त्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

‘रेकॉर्ड’मधील डेटाचे विश्लेषण महिलांची सुरक्षितता हा सुद्धा अलीकडच्या काळात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींच्या बाबतीत लैंगिक छळ किंवा विनयभंगाच्या घटना घडतात. अशा अनेक घटनांतील गुन्हेगार सराईत असतात. ‘एआय’च्या सहाय्याने त्यांचा शोध घेता येऊ शकतो. पोलिस तपासात अशा प्रकारच्या गुन्हे आणि गुन्हेगारांच्या रेकॉर्डला खूप महत्त्व असते. त्यामुळे रेकॉर्ड कीपिंगमध्येही ‘एआय’ खूप उपयोगी पडू शकते. या तंत्राच्या मदतीने मोठ्या प्रमाणातील डेटाचे वेगाने आणि अचूक विश्लेषण करणे शक्य होईल.

bhushankumarupadhyay@gmail.com



Source link

स्वामित्व योजनेमुळे मिळकतीचे वाद संपुष्टात येणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

0
स्वामित्व योजनेमुळे मिळकतीचे वाद संपुष्टात येणार- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

सांगली, दि. 18: स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापन व मिळकत पत्रिका वितरणामुळे गावांमधील मिळकतीचे वाद संपुष्टात येतील आणि गावांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगलीत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 50 लाख मिळकत पत्रिकांचे आभासी वितरण करण्यात आले, त्यानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये

जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, माजी पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले:

  • स्वामित्व योजनेमुळे गावठाणाचे अचूक मोजमाप होते, ज्यामुळे रस्ते, हद्द आणि मिळकतींवरील वाद मिटतील.
  • मिळकत पत्रिका मिळाल्याने बँक कर्जे सहज मंजूर होतील.
  • घरकुल योजना व इतर सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.
  • न्यायालयीन वाद कमी होऊन कायदा व सुव्यवस्था सुधारेल.

सांगली जिल्ह्यातील प्रगती

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले की:

  • 332 गावांचे ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण पूर्ण.
  • 1217 हेक्टर गावठाण जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड तयार.
  • 232 गावांमध्ये 39,757 लाभार्थींना मिळकत पत्रिका वाटप.
  • 68 मिळकतधारकांनी बँकांकडून कर्ज मिळवले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा परिषदेची उल्लेखनीय कामगिरी सांगितली आणि “माझी वसुंधरा अभियान 5.0” अंतर्गत नवीन निरीक्षण प्रणालीचे उद्घाटनही केले.


स्वामित्व योजनेची वैशिष्ट्ये व फायदे

महत्त्वाचे वैशिष्ट्ये:

  1. गावठाण भूमापन व मिळकत पत्रिकांचा तयार होणारा अधिकार अभिलेख.
  2. जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे.

फायदे:

  • मिळकतीचे संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन.
  • मिळकत धारकांना त्यांच्या क्षेत्राची अचूक माहिती.
  • मिळकतींना आर्थिक तरलता व बाजारपेठेत वाढ.
  • ग्रामपंचायतीला कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी आधार.

कार्यक्रमाचे इतर महत्त्वाचे मुद्दे

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लाभार्थीशी थेट संवाद साधला.
  • प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना मिळकत पत्रिका वितरीत.
  • तालुका व ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा आयोजित.
  • कडेगाव, शिराळा व जत तालुक्यांमधील 7 गावांमध्ये 1,342 लाभार्थींना मिळकत पत्रिका वाटप.

निष्कर्ष

स्वामित्व योजनेमुळे गावांचे विकासात्मक स्वरूप बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लाभार्थींना आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाचे साधन म्हणून ही योजना क्रांतिकारी ठरली आहे.