[ad_1]
सैफ अली खान हल्ला प्रकरणी मध्य प्रदेशात शनिवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर अधिकाऱ्यांनी ही अटक आणखी वेगळ्या प्रकरणात झाल्याचे सांगितले. सैफ अली खानच्या वांद्रे येथील राहत्या घरी घुसून एका व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्याच्या मणक्याजवळ अडकलेला चाकूचा तुकडा काढला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर सैफ अली खानचा धाकटा मुलगा जहांगीरच्या खोलीत घुसला होता.
[ad_2]
Source link
