Thursday, July 30, 2026
Home Blog Page 535

GBS Update : मुंबईकरांचं टेंशन वाढलं! गुलेन बॅरे सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा पोहोचला ८वर

0
GBS Update : मुंबईकरांचं टेंशन वाढलं! गुलेन बॅरे सिंड्रोममुळे एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा पोहोचला ८वर


Mumbai GBS Update :  राज्यात गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)चा कहर सुरूच आहे.  आता मुंबईत हा आजार पसरत असून या आजाराने ग्रस्त असलेल्या ५३ वर्षीय रुग्णाचा बुधवारी मुंबईत मृत्यू झाला.   जीबीएसमुळे मृत्यू झालेला हा मुंबईतील पाहिला तर राज्यातील  आठवा मृत्यू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. यापूर्वी मंगळवारी पुण्यातील ३७ वर्षीय वाहनचालकाचाही जीबीएसमुळे मृत्यू झाला होता.



Source link

फलटण आगारात १० नवीन बसेस; प्रवाशांची गैरसोय होणार संपुष्टात

0
फलटण आगारात १० नवीन बसेस; प्रवाशांची गैरसोय होणार संपुष्टात

फलटण | गेल्या अनेक दिवसांपासून फलटण आगारात बस कमतरतेमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ही समस्या आता सुटणार आहे. फलटण आगारात अशोक लेलंड बीएस-6 प्रकारातील १० नवीन बसेस दाखल होत आहेत.

फलटण आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे यांनी सांगितले की, पुणे येथील दापोडी आगारातून ह्या नवीन बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर व सुरळीत बससेवा मिळेल.

आमदार सचिन पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसची कमतरता दूर करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट होते. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने ही सुविधा शक्य झाली आहे. नवीन बसेस आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.”

ही नवीन बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय दूर होईल तसेच फलटण आगाराची कार्यक्षमता वाढेल, असेही आगार व्यवस्थापकांनी सांगितले.

उच्च न्यायालय म्हणते, पत्नीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक सेक्स करणे गुन्हा नाही, पीडितेचा झाला होता मृत्यू

0
उच्च न्यायालय म्हणते, पत्नीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक सेक्स करणे गुन्हा नाही, पीडितेचा झाला होता मृत्यू


High Court News : छत्तीसगड उच्च न्यायालयाने बलात्कार किंवा अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत सोमवारी महत्वाचा निकाल दिला.  संज्ञान असलेल्या पत्नीसोबत संमतीने किंवा संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल पुरुषावर बलात्कार किंवा अनैसर्गिक लैंगिक संबंधांचा आरोप लावता येणार नाही, असे महत्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या निकालानंतर न्यायालयाने अपीलकर्त्याची भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ आणि ३७७ अन्वये सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आणि त्याची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.



Source link

साखरवाडीत बुद्ध विहारासाठी भीमसैनिकांचा लढा – ठिय्या आंदोलन तीव्र

0
साखरवाडीत बुद्ध विहारासाठी भीमसैनिकांचा लढा – ठिय्या आंदोलन तीव्र

फलटण: साखरवाडी येथे भव्य बुद्ध विहारासाठी शासकीय जागा मिळावी, या मागणीसाठी शेकडो भीमसैनिकांनी सोमवारी फलटण तहसील कार्यालयावर भव्य लॉंगमार्च काढला. प्रशासनाने निवेदन स्वीकारले असले तरी लेखी निश्चिती मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

फलटण तहसील कार्यालयासमोर भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन सुरू झाले असून, जोपर्यंत बुद्ध विहारासाठी निश्चित जागेबाबत लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

भीमसैनिकांची ठाम भूमिका – “लेखी निर्णय द्या, अन्यथा आंदोलन सुरूच राहील!”

भीमसैनिकांनी आपल्या मागण्यांबाबत प्रशासनासमोर ठोस भूमिका मांडली आहे. फक्त तोंडी आश्वासन नको, तर जागेबाबत प्रशासनाने अधिकृत लेखी पत्र द्यावे, अन्यथा ठिय्या आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

प्रशासनासमोर मागण्या स्पष्ट – अन्यथा संघर्ष तीव्र

  • साखरवाडीत बुद्ध विहारासाठी शासकीय जागेचे लेखी आदेश द्यावेत.
  • फक्त तोंडी आश्वासन नको, तर अधिकृत कागदपत्र हवे.
  • प्रशासनाने वेळकाढूपणा केल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल.

भीमसैनिकांच्या या निर्धारामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, पुढील काही तासांत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा उत्साहात साजरा होणार!

0
श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा उत्साहात साजरा होणार!

फलटण | श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटण यांच्या वतीने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा बुधवार, दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक :

  • सकाळी १०.०० ते ११.०० वा. – हळदी कुंकू समारंभ
  • सकाळी ११.०० ते १२.०० वा. – श्री संत रोहिदास महाराज प्रतिमेचे पूजन व आरती
  • सकाळी १२.०० ते १.०० वा.श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्कार प्रदान सोहळा
  • दुपारी १.०० ते २.०० वा. – महाप्रसाद

प्रमुख उपस्थित मान्यवर :

  • शुभहस्ते : प.पू. परशुरामजी महाराज वाघ (संस्थापक अध्यक्ष, श्री कार्तिक स्वामी आश्रम, देवदरी, अंभेरी)
  • अध्यक्ष : मा. आमदार दीपकरावजी चव्हाण (फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघ)
  • प्रमुख पाहुणे : मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (मा. अध्यक्ष, जि. प. सातारा)
  • विशेष अतिथी :
    • मा. सजन विठोबा हंकारे (सेवानिवृत्त, डी.वाय.एस.पी. सातारा)
    • मा. अशोक सस्ते (पत्रकार, दै. सकाळ)
    • मा. यशवंत खलाटे (प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी)
    • मा. युवराज पवार (संपादक, युवा जनमत)
    • मा. गणपतराव भोसले
    • मा. अॅड. प्रतिक भारत देशमाने (सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट अ, राजपत्रित)
    • मा. संतोष सातपुते (शासकीय मेडिकल कॉलेज सदस्य, बारामती)
    • मा. संतोष चव्हाण (सरपंच, कोरेगाव कुमठे)
    • डॉ. विकास कुंभार (एम.एस. पुणे, नेत्रतज्ञ)
    • मा. ज्ञानेश्वर भगत (मा. उपसंचालक, कामगार विमा, मुंबई)
    • मा. शशीकांत भोसले (सामाजिक कार्यकर्ता, सातारा)

स्थळ : नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कृष्णात बोबडे (अध्यक्ष), श्री. अरुण खरात, श्री. भोलेनाथ भोईटे (उपाध्यक्ष), श्री. रोहिदास पवार, श्री. हृदयनाथ भोईटे (सचिव) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या जयंती सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

साखरवाडीत बुद्ध विहाराच्या जागेसाठी पायी लॉंगमार्च! शेकडो अनुयायांचा निर्धार

0
साखरवाडीत बुद्ध विहाराच्या जागेसाठी पायी लॉंगमार्च! शेकडो अनुयायांचा निर्धार

फलटण :-साखरवाडी येथे गेल्या अनेक दशकांपासून बुद्ध विहाराच्या जागेसाठी संघर्ष सुरू आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्यास विलंब लावल्याने हा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर, साखरवाडी येथील बौद्ध अनुयायांनी आपल्या मागणीसाठी आज, १० फेब्रुवारी २०२५, सकाळी ८ वाजता, साखरवाडी गावातून फलटण तहसील कार्यालयावर पायी लॉंगमार्च काढला आहे.

✊ संघटित लढ्याची हाक!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या शेकडो अनुयायांनी या लॉंगमार्चमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. “जय भीम!” आणि “बुद्ध विहार आमच्या हक्काचं!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. हा लॉंगमार्च बौद्ध अनुयायांच्या एकजुटीचे प्रतिक ठरत असून, बुद्ध विहाराच्या हक्काची भव्य जागा मिळवण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यातून व्यक्त करण्यात आला आहे.

समाज बांधवांना आवाहन
सर्व बहुजन समाज बांधव, कार्यकर्ते आणि विचारवंतांनी या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“जय भीम! एका मोठ्या परिवर्तनासाठी पाऊल उचलूया!”

“सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार!” – रामराजेंचा राजकीय इशारा?

0
“सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार!” – रामराजेंचा राजकीय इशारा?

फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता आयकर विभागाने छापा टाकला होता. या कारवाईने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती.

100 तासांच्या तपासणीनंतर अखेर संजीवराजे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. काल रात्री आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर संजीवराजेंनी पत्रकार परिषद घेत सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितले.

या दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच’ असे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा संदेश त्यांच्या राजकीय विरोधकांसाठी गर्भित इशारा असल्याची चर्चा फलटणमध्ये रंगू लागली आहे.

🔹 रामराजेंची भूमिका स्पष्ट!
आयकर विभागाच्या कारवाईदरम्यानही रामराजे यांनी समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन करत “गर्दी करु नका, खात्याला काम करु द्या, काळजी नसावी” असा संदेश दिला होता. मात्र, आता त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Election News LIVE February 10, 2025: आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळरांची तब्बल ५ दिवस चौकशी! तपास अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं ?

0
Maharashtra Election News LIVE February 10, 2025: आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळरांची तब्बल ५ दिवस चौकशी! तपास अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं ?


Maharashtra Election 2024 News LIVE: आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळरांची तब्बल ५ दिवस चौकशी! तपास अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं ?

Maharashtra Election 2024 News LIVE: आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळरांची तब्बल ५ दिवस चौकशी! तपास अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं ?

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Mon, 10 Feb 202512:41 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळरांची तब्बल ५ दिवस चौकशी! तपास अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं ?

  • Sanjeevraje Naik Nimbalkar News : सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याविविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. ही कारवाई तब्बल पाच दिवस चालली.


Read the full story here





Source link

फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर छापा; पाच दिवसांनंतर कारवाई संपुष्टात

0
फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर छापा; पाच दिवसांनंतर कारवाई संपुष्टात

🔹 फलटण: श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण आणि पुण्यातील निवासस्थानी आयकर विभागाने घातलेल्या छाप्याची कारवाई पाच दिवसांनंतर संपुष्टात आली. बुधवारी  सुरू झालेल्या या कारवाईत अधिकारी चौकशी करत होते, मात्र संजीवराजे यांनी स्पष्ट केले की, या छाप्यादरम्यान काहीही जप्त करण्यात आले नाही.

🔹 काय घडले या पाच दिवसांत?

पहिल्या दोन दिवसांत चौकशी पूर्ण झाली होती, मात्र आवश्यक कागदपत्रांच्या तपासणीसाठी आणखी वेळ लागला, अशी माहिती संजीवराजे यांनी दिली. छाप्याचा तपास गोविंद मिल्कशी संबंधित होता आणि त्यांचा व्यक्तिगत संबंध नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यादरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमाव करत त्यांना पाठिंबा दर्शवला. आयकर विभागाचे अधिकारी निघून गेल्यावर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला आणि घोषणाबाजी करत संजीवराजे यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला.

🔹 राजकीय दबाव की योगायोग?

संपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर संजीवराजे यांचा पक्षांतराचा मुद्दा चर्चेत आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) समर्थन घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशा वेळीच आयकर विभागाने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यामुळे राजकीय हेतूने ही कारवाई झाली का, असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, संजीवराजे यांनी यावर स्पष्ट उत्तर देण्याचे टाळत “सध्या काहीही घडू शकते,” असे सांगितले.

🔹 पुण्यातील निवासस्थानावरही तपास

फलटणच्या घरासोबतच पुण्यातील ‘लक्ष्मी’ निवासस्थानीही तपास करण्यात आला. तब्बल 50 तास चाललेल्या चौकशीनंतर कोणत्याही संशयास्पद बाबी आढळल्या नसल्याचे समजते.

🔹 निष्कर्ष:

या कारवाईनंतर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ही कारवाई कोणत्याही चुकीच्या व्यवहाराशी संबंधित नसल्याचे सांगितले. मात्र, राजकीय वर्तुळात अजूनही चर्चांना उधाण आहे की, हा छापा पक्षांतराच्या चर्चेच्या अनुषंगाने झाला का? यावर निश्चित उत्तर मात्र मिळालेले नाही.

धक्कादायक! देशातील प्रसिद्ध उद्योगपतीची हत्या; मालमत्तेच्या वादातून नातवाने आजोबांना ७३ वेळा चाकूने भोसकले!

0
धक्कादायक! देशातील प्रसिद्ध उद्योगपतीची हत्या; मालमत्तेच्या वादातून नातवाने आजोबांना ७३ वेळा चाकूने भोसकले!


तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील पंजागुट्टा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ८६ वर्षीय एका उद्योगपतीची त्याच्या नातवानेच चाकू भोसकून हत्या केली आहे. सांगितले जात आहे की, संपत्तीच्या वादातून नातवाने आपल्या उद्योगपती आजोबाची हत्या केली. पोलिसांनी रविवारही या घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सह फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास घडली.



Source link