Thursday, July 30, 2026
Home Blog Page 536

आयकर विभागाची कारवाई संपली, अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं? संजीवराजेंनी सगळचं सांगितलं

0


Sanjeevraje Naik Nimbalkar :  विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar)आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर (Raghunathraje Naik Nimbalkar) यांच्या फलटणमधील (Phaltan) घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. आजचा कारवाईचा पाचचा दिवस होता. पाच दिवसानंतर ही कारवाई संपली आहे. आयकर विभागाकडून बुधवारी ही कारवाई सुरु करण्यात आली होती. आयकर विभागाचे अधिकारी निघून जाताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. तसेच संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. पण या कारवाईतून अधिकाऱ्यांना नेमकं काय मिळालं? असा सवाल उपस्थित होत आहे. 

चौकशी पूर्ण झाल्यानंतर नेमकं काय म्हणाले संजीवराजे नाईक निंबाळकर?

कारवाईनंतर संजीवराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौकशी पहिल्या दोन दिवसात पूर्ण झाली होती. त्यानंतर त्यांचे जे पेपरवर्क होते, त्याला जास्त वेळ लागल्याचे संजीवराजे निंबाळकर म्हणाले. आयकर विभागाला या चौकशीतून काहीही सापडलं नाही. त्यांनी माझ्याकडून काहीही जप्त केलं नाही. ही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती. गोविंद मिल्क संदर्भात ही कारवाई होती असे संजीवराजे निंबाळकर म्हणाले. राजकीय हेतूनं ही कारवाई झाली आहे का? याबाबत विचारले असता संजीवराजे म्हणाले की, याबाबत सांगणे कठीण आहे. सध्या काहीही घडू शकते असे संजीवराजे म्हणाले. पक्ष बदलाबाबत फक्त चर्चा सुरु असल्याचेही संजीवराजे म्हणाले. 

 कारवाईचा आजचा पाचवा दिवस होता

आजचा आयकर विभागाच्या कारवाईचा आजचा पाचवा दिवस होता. आज ही कारवाई संपण्याची शक्यता वर्तवली होती. फलटण येथील संजीवराजे (Sanjeevraje Naik Nimbalkar) आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती बुधवारी आयकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हापासून सुरू झालेली चौकशी आज पाचव्या दिवशी देखील सुरूच होती. गेल्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती, मात्र या दरम्यानच्या काळातच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला. आयकर विभागाच्या चौकशीमध्ये काय समोर आलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर वारंवार सांगताना दिसत आहेत, या चौकशीतून काहीही समोर येणार नाही. 

पुण्यातील घरावरही टाकला होता छापा, 50 तासानंतर चौकशी संपली

संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानासह पुण्यातील घरावरती आयकर विभागाने चौकशी केली. पुण्यातील लक्ष्मी या निवासस्थानी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी तब्बल 50 तासांनंतर संपली आहे. या चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचा संशयित व्यवहार आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीला नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी पूर्णपणे सहकार्य केले आहे. मात्र, पुण्यातील चौकशी संपली असली, तरीही फलटण येथील चौकशी मात्र अजूनही सुरूच आहे. 

 

अधिक पाहा..



Source link

कोणी धोका दिला, हे कधीच सांगू नका.. पॉडकास्टमध्ये सलमान खानने आयुष्य आणि मैत्रीवर केली ‘मन की बात’

0
कोणी धोका दिला, हे कधीच सांगू नका.. पॉडकास्टमध्ये सलमान खानने आयुष्य आणि मैत्रीवर केली ‘मन की बात’


मैत्रीचे महत्त्व सांगताना सलमान म्हणाला, ‘माझे अनेक मित्र आहेत जे वर्षानुवर्षे माझ्यासोबत आहेत. आपण अनेकदा भेटत नसलो, तरी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा आपलं नातं तसंच राहतं. खऱ्या मैत्रीत स्वार्थ नसतो. आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना दबंग खान म्हणाला, ‘सनम बेवफा’च्या वेळी एका मित्राने मला १५ हजार रुपये उधार दिले होते. त्यावेळी ही खूप मोठी रक्कम होती आणि तेव्हापासून आमची मैत्री घट्ट आहे. मैत्रीत कोणत्याही गरजा, मागण्या किंवा स्वार्थ नसावा, असेही ते म्हणाले.



Source link

‘आयुष्याचा मनमुराद आनंद असा घ्यावा’; मुंबईतील रिक्षा चालकाने ट्रॅफिक सिग्नलवरच जमवली मैफिल, पाहा Video

0
‘आयुष्याचा मनमुराद आनंद असा घ्यावा’; मुंबईतील रिक्षा चालकाने ट्रॅफिक सिग्नलवरच जमवली मैफिल, पाहा Video


जगातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी छंद असतोच मात्रकामाच्या जबाबदारीतून प्रत्येकाला छंद जोपासता येत नाही. कामाच्या तासांमुळे एखाद्याच्या आयुष्यात उदासीनता येते व त्याचा जीवनातील छोट्या छोट्या सुखात आनंद घेण्यामध्येही रस दिसून येत नाही. तुमचे काम केवळ उपजीविकेचे साधन बनू शकते. मात्र तुमची नोकरी आणि तुमची आवड या दोन्हींचा समतोल साधता आला तर?



Source link

Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल

0
Rahul Solapurkar : बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं, राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, VIDEO व्हायरल


Rahul solapurkar controversial statement : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आले होते, तसेच डॉ. आंबेडकर वेदानुसारब्राह्मणअसल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



Source link

लेणी चळवळीतील अभ्यासक सूरज रतन जगताप यांना “त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर पुरस्कार २०२५”ने सन्मान

0
लेणी चळवळीतील अभ्यासक सूरज रतन जगताप यांना “त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर पुरस्कार २०२५”ने सन्मान

कल्याण, ८ फेब्रुवारी २०२५ – सामाजिक कार्य आणि लेणी अभ्यास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सुरज रतन जगताप यांना “त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर नागरिक कल्याण ट्रस्ट, कळवा यांच्या वतीने रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त हा सन्मान देण्यात आला.

सूरज रतन जगताप हे लेणी चळवळीतील एक सक्रिय अभ्यासक असून, ऐतिहासिक लेणी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी त्याच्या सहकार्यानी  महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला. विशेषतः अर्जुन काटे यांनी या कार्याचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेतला.

पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सूरज रतन जगताप म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून, पुढील सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल. ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.”

अत्याचाराविरोधातभीमसैनिकांचा लाँग मार्च – न्यायासाठी हजारोंचे आंदोलन सुरू!

0
अत्याचाराविरोधातभीमसैनिकांचा लाँग मार्च – न्यायासाठी हजारोंचे आंदोलन सुरू!

📍 नाशिक | 8 फेब्रुवारी 2025 परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि त्यानंतर घडलेल्या पोलिसी अत्याचाराविरोधात आंबेडकरी समाजाने तीव्र आंदोलन छेडले आहे. या घटनेच्या निषेधार्थ परभणीत आंबेडकरी संघटनांनी बंद पुकारला होता, मात्र त्या दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंबेडकरी वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन केले. या दरम्यान, निरपराध नागरिकांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, महिलांवरही अत्याचार झाले.

या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी, जो एलएलबीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता, त्याला पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. याच पोलिसी अत्याचारामुळे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

भीमसैनिकांचा परभणी ते मंत्रालय लाँग मार्च

या अमानुष घटनेच्या विरोधात आशिष वाकोडे, सुधीर साळवे आणि अन्य आंबेडकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली 17 जानेवारी 2025 पासून परभणी ते मंत्रालय असा लाँग मार्च सुरू आहे. गेल्या 22-23 दिवसांपासून या चळवळीतील कार्यकर्ते, माता-भगिनी कोणत्याही सुविधांशिवाय, ऊन, थंडी, भूक, तहान सहन करत चालत आहेत. काहींना चप्पलही नाहीत, तर अनेकांचे पाय रक्तबंबाळ झाले आहेत.

या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव यांनी 26 जानेवारीच्या कार्यक्रमात 25,000 रुपये संकलित केले आणि 50,000 रुपये निधी गोळा करण्याचा संकल्प केला. हा निधी दैनिक रत्न सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आणि त्यांनी तो नाशिकमध्ये आशिष वाकोडे यांच्याकडे हस्तांतरित केला.

नाशिकमध्ये औषध उपचार आणि मदतीचे आवाहन

नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे अरुण निकम, त्यांची मुलगी डॉ. सुप्रिया आणि पुतण्या विशाल निकम यांनी जखमी कार्यकर्त्यांसाठी औषधोपचार आणि आवश्यक वस्तूंचे वाटप केले. अनेक कार्यकर्त्यांचे पाय सुजलेले, जखमी झालेले असून त्यांच्यावर पेन किलर स्प्रे व मलम लावण्यात आले.

भीमसैनिकांना आंदोलनासाठी पाठबळ देऊया!

दलित पँथरच्या स्थापनेपासून आंबेडकरी समाजाने अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मग ती वरळी दंगल असो, रमाबाई नगर गोळीबार असो किंवा नामांतर आंदोलन असो, आंबेडकरी समाजाने नेहमीच बलिदान देत संघर्ष केला आहे. मात्र, आज भीमसैनिक मंत्रालयाच्या दिशेने न्यायासाठी चालत असताना आपण फक्त सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन स्वस्थ बसतो आहोत का?

लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा!

सध्या हा लाँग मार्च नाशिकमधील पांडव लेणी येथे पोहोचला आहे. त्यामुळे सर्व आंबेडकरी बांधवांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन सरकारवर दबाव टाकावा आणि या आंदोलनाला यश मिळवून द्यावे. तसेच आर्थिक मदत करूनही आपण आपले कर्तव्य पार पाडू शकतो.

📌 आर्थिक मदतीसाठी Google Pay क्रमांक: 9167369272 (डॉ. सुप्रिया)

✊ जयभीम!

🔹 अरुण निकम
📞 9323249487
📅 8 फेब्रुवारी 2025

आयकर चौकशीचा : राजेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी, सत्यजितराजेंनी दिलासा दिला

0
आयकर चौकशीचा : राजेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी, सत्यजितराजेंनी दिलासा दिला

फलटण: संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या आयकर विभागाच्या चौकशीचा आज सलग चौथा दिवस आहे. पहाटे ६ वाजल्यापासून आयकर अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

आर्थिक व्यवहारांवर कसून चौकशी

गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, कुरोली फूड्स, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, श्रीराम सहकारी साखर कारखाना यासह विविध उद्योगांच्या आर्थिक देवाण-घेवाणीची चौकशी आयकर विभाग करत आहे. आज सकाळी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आयकर अधिकाऱ्यांनी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेला भेट देऊन आर्थिक व्यवहारांची पाहणी केली.

सरोज व्हीला बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

संजीवराजे यांच्या फलटण येथील निवासस्थानी, सरोज व्हीला बाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गावोगावीचे अनेक पदाधिकारी आणि समर्थक पहाटेपासूनच ठाण मांडून होते. सलग चौथ्या दिवशीही कार्यकर्त्यांमध्ये तणाव जाणवत नसला, तरी मानसिक थकव्याचे वातावरण स्पष्ट दिसत होते.

“सगळं व्यवस्थित आहे” – शिवांजलीराजे नाईक निंबाळकर

संजीवराजे यांच्या पत्नी सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना धीर देत, “सगळं व्यवस्थित आहे, काळजीचे कारण नाही,” असे सांगितले. त्यांनी स्मितहास्य करत दिलासा दिल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये थोडा आत्मविश्वास निर्माण झाला.

“तुम्ही सगळे आहात, त्यामुळे आधार वाटतो” – सत्यजितराजे

चौकशीच्या चौथ्या दिवशी संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र सत्यजितराजे नाईक निंबाळकर आपल्या आईंसोबत कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानत सांगितले, “प्रवासातून येताना थोडं टेन्शन आलं होतं, पण तुम्ही सगळे आहात, त्यामुळे आधार वाटतो. आता केवळ कागदपत्र पूर्ण करण्याचे काम बाकी असून ते लवकरच संपेल. तुम्ही तुमच्या कामाला लागलात तरी चालेल.”

आयकर चौकशी अजून किती दिवस?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे यांच्या विरोधात सुरू असलेल्या आयकर चौकशीचे ८० तास पूर्ण झाले आहेत. इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत चौकशी सुरू असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चौकशी अद्याप सुरूच असल्याने कार्यकर्त्यांना ही प्रक्रिया आज पूर्ण होण्याची आशा आहे.

Nagpur: शारीरिक संबंधास नकार दिल्यानं विवाहित प्रेयसीची हत्या, नंतर मृतदेहावर केला बलात्कार; नागपुरातील घटना

0
Nagpur: शारीरिक संबंधास नकार दिल्यानं विवाहित प्रेयसीची हत्या, नंतर मृतदेहावर केला बलात्कार; नागपुरातील घटना


Nagpur News: नागपूर हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली. एका तरुणाने विवाहित प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. महिलेने संबंधास नकार दिल्याने तरुणाने महिलेची हत्या केली. महिलेची मुलगी शाळेतून घरी परतल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Source link

96 तास उलटूनही संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरील आयकर विभागाची कारवाई सुरूच; पुण्यातील चौक

0


फलटण : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरील आयकर विभागाची कारवाई अद्यापही सुरूच आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी ५ फेब्रुवारीला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाने छापे टाकले होते. आयकर विभागाने छापे टाकलेल्या पहिल्या दिवशी संजीवराजे (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांची तब्बल 17 तास चौकशी केली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही चौकशी करण्यात आली. शुक्रवारी पुन्हा सकाळी लवकरच सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. अजून दोन दिवस चौकशी सुरू राहील, असे रघुनाथराजे निंबाळकर यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे तब्बल 96 तास उलटले तरी अद्याप आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे.

आजचा आयकर विभागाच्या कारवाईचा पाचवा दिवस आहे. आज ही कारवाई संपू शकते असं देखील बोललं जातं आहे. फलटण येथील संजीवराजे (Sanjeevraje Naik Nimbalkar) आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती बुधवारी आयकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हापासून सुरू झालेली चौकशी आज पाचव्या दिवशी देखील सुरूच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती, मात्र या दरम्यानच्या काळातच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला. बुधवारी पासून सुरू झालेली कारवाई अद्याप सुरूच आहे. आयकर विभागाच्या चौकशीमध्ये काय समोर आलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर वारंवार सांगताना दिसत आहेत, या चौकशीतून काहीही समोर येणार नाही. 

पुण्यातील चौकशी तब्बल 50 तासानंतर संपली

संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानासह पुण्यातील घरावरती आयकर विभागाने चौकशी केली. पुण्यातील लक्ष्मी या निवासस्थानी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी तब्बल 50 तासांनंतर संपली आहे. या चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचा संशयित व्यवहार आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीला नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी पूर्णपणे सहकार्य केले आहे. मात्र, पुण्यातील चौकशी संपली असली, तरीही फलटण येथील चौकशी मात्र अजूनही सुरूच आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकल्यापासून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी गेली चार दिवस त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. संजीवराजेंच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर आणि सुपूत्र सत्यजीतराजेंनी काल (शनिवारी, ता. 8) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सुदैवानं आज कारवाई संपेल. थोडं पेपर वर्क बाकी आहे, असं सांगत त्यांनी कारवाई रात्री संपणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

अधिक पाहा..



Source link

Maharashtra Weather Updates: राज्यात उकाडा वाढतोय, बहुतांश ठिकाणी पारा ३५ अंशांवर!

0
Maharashtra Weather Updates: राज्यात उकाडा वाढतोय, बहुतांश ठिकाणी पारा ३५ अंशांवर!



Weather News: महाराष्ट्राच्या तापामानात आता हळूहळू बदल होताना दिसत आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून अनेक भागात उन्हाळा चटका जाणवत आहे.



Source link