Thursday, July 30, 2026
Home Blog Page 537

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये खिरवाटप व ‘आदर्श माता पुरस्कार’ची घोषणा

0
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये खिरवाटप व ‘आदर्श माता पुरस्कार’ची घोषणा

फलटण: त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त माता रमाई मित्रमंडळ, मंगळवार पेठ, फलटण यांच्या वतीने सालाबादप्रमाणे खिरवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला उपस्थित महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

या जयंतीनिमित्त माता रमाई मित्रमंडळाने पुढील वर्षापासून ‘आदर्श माता पुरस्कार’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मातांचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू ढावरे यांनी केले. मंगळवार पेठेतील महिला आणि तरुण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

फलटणमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई: श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी तिसऱ्या दिवशीही सुरू

0
फलटणमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई: श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी तिसऱ्या दिवशीही सुरू

फलटण प्रतिनिधी | साहस Times. फलटणमध्ये आयकर विभागाने 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू श्रीमंत संजीवराजे आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तब्बल तिसऱ्या दिवशीही ही चौकशी सुरूच आहे.

पहिल्या दिवशी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची 17 तास चौकशी झाली. दुसऱ्या दिवशीही फलटण येथे सकाळी 6 पासून रात्री 11 वाजेपर्यंत आयकर विभागाचा तपास सुरू होता. आज शुक्रवारी तिसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

समर्थकांमध्ये नाराजी, सोशल मीडियावर निषेध

या चौकशीविरोधात नाईक निंबाळकर समर्थकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात काम केल्यामुळेच ही कारवाई होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, आजही संजीवराजे यांच्या फलटण येथील बंगल्यासमोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. विविध गावांतील पुढारी, आजी-माजी पदाधिकारी सकाळपासूनच तिथे उपस्थित होते.

सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजीवराजे यांना ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट’ कंपनीत चौकशीसाठी नेले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कंपनीचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

पुणे येथील लक्ष्मी निवासस्थानाची चौकशी 50 तासांनंतर संपली

    श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुण्यातील लक्ष्मी निवासस्थानी सुरू असलेली तपासणी तब्बल 50 तासांनी पूर्ण झाली. कोणत्याही संशयास्पद व्यवहाराचे पुरावे न आढळल्याचे समोर आले असून, नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी चौकशीस सहकार्य केल्याची माहिती मिळाली.

“सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागडीत तोलता येत नाही” – श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “आयकर विभागाचे अधिकारी चांगले आहेत, ते प्रत्येक कागद तपासत आहेत. जर काही चुकीचे असेल तर ते आढळेल, पण नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. महाराष्ट्रात काही घराण्यांकडे पूर्वीपासून संपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाला एकाच चष्म्यात बघणे योग्य नाही.”

चौकशी अजून दोन दिवस चालण्याची शक्यता असून, कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती रघुनाथराजे यांनी दिली. मात्र, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे का, यावर त्यांनी कोणतेही थेट उत्तर दिले नाही.

➡️ या चौकशीचा पुढील काय निष्कर्ष लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Marathi Natak : मालिका विश्व गाजवल्यानंतर निखिल चव्हाणची रंगभूमीवर एंट्री! एकाच वेळी गाजवणार दोन नाटकं

0
Marathi Natak : मालिका विश्व गाजवल्यानंतर निखिल चव्हाणची रंगभूमीवर एंट्री! एकाच वेळी गाजवणार दोन नाटकं


Nikhil Chavan Marathi Natak : सध्या मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक वर्ग विशेष वळताना दिसत आहे. या झगमगत्या सिनेविश्वात आता नाटकांकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर, प्रेक्षकवर्ग ही रंगभूमीला प्राधान्य देताना दिसतोय. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याची एकाच वेळी दोन नाटकं सुरू असून, तो रंगभूमी गाजवताना दिसत आहे. आणि हा मालिका विश्वातील मराठमोळा लोकप्रिय चेहरा म्हणजेच ‘लागिरं झालं जी’मधून ‘विक्या’ म्हणून घराघरांत पोहचलेला निखिल चव्हाण आहे. निखिलने आजवर अनेक मराठी मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.



Source link

साखरवाडीत बुद्ध विहाराच्या जागेसाठी पायी लॉंगमार्च! शेकडो अनुयायांचा निर्धार

0
साखरवाडीत बुद्ध विहाराच्या जागेसाठी पायी लॉंगमार्च! शेकडो अनुयायांचा निर्धार

फलटण :- साखरवाडी येथे बुद्ध विहाराच्या जागेसाठी गेली अनेक दशके संघर्ष सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्यास विलंब लावल्यामुळे, हा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. या संदर्भात साखरवाडी गावातून फलटण तहसील कार्यालयावर शेकडो अनुयायांचा पायी लॉंगमार्च आयोजित करण्यात आला आहे.

लॉंगमार्च तपशील:
दिनांक: १० फेब्रुवारी २०२५
वेळ: सकाळी ८ वाजता.                            सुरुवात: साखरवाडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या सर्व अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आपल्या हक्काच्या जागेसाठी संघर्ष करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या लॉंगमार्चच्या माध्यमातून आपली एकता आणि ताकद दाखवून, बुद्ध विहाराला हक्काची भव्य जागा मिळवण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

सर्व बहुजन समाज बांधव, कार्यकर्ते आणि विचारवंत यांनी या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा.

“जय भीम! एका मोठ्या परिवर्तनासाठी पाऊल उचलूया!”

कर्मचाऱ्यांना दिला 14 कोटींचा बोनस, लोकं विचारतायत, ‘इथं नोकरी कशी मिळेल?’

0
कर्मचाऱ्यांना दिला 14 कोटींचा बोनस, लोकं विचारतायत, ‘इथं नोकरी कशी मिळेल?’


14 Crore Bonus to Emlpoyeee: चांगली पगारवाढ आणि घसघसशीत बोनस प्रत्येक कर्मचाऱ्याचं स्वप्न असतं. सर्वांचच हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही. पण अशीही एक कंपनी आहे, जिने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी तिजोरी रिकामी केलीय. ही कंपनी देशभरात चर्चेचा विषय बनला असून कर्मचारी याच कंपनीत नोकरी हवीय, असं म्हणतायत. रेझ्युमे कुठे पाठवायचा? हेदेखील विचारतायत. 

तामिळनाडूतील कोवाई डॉटको नावाच्या आयटी कंपनीने 140 कर्मचाऱ्यांना 14.5 कोटी रुपयांचा बोनस जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या कंपनीत साधारण 260 कर्मचारी काम करतात. कंपनीत 3 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने हे गिफ्ट दिले आहे. coimbatore.co नावाच्या आयटी कंपनीचे मुख्य कार्यालय कोइम्बतूरच्या नव इंडिया परिसरातील अविनाश रोड येथे आहे.  या कंपनीची इंग्लंड आणि चेन्नई येथेही शाखा कार्यालये आहेत.

31 डिसेंबर 2022 पूर्वी कंपनीत सामील होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 3 वर्षांची सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर त्यांच्या एकूण वार्षिक पगाराच्या 50 टक्के बोनस मिळेल अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 80 हून अधिक कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या पगारासह बोनस देण्यात आला.

कंपनीच्या वाढीमध्ये आणि नफ्यात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यावर आमचा दृढ विश्वास असल्याचे कंपनीचे सीईओ आणि संस्थापक सर्वन कुमार म्हणाले. कर्मचाऱ्यांसोबत कंपनीची संपत्ती वाटण्याचे मार्ग शोधणे हे माझे खूप जुने स्वप्न होते, असेही त्यांनी पुढे सांगितले. कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याच्या पद्धतींचा आम्ही विचार करत होतो तेव्हा सुरुवातीला शेअर मालकी योजना किंवा शेअर जारी करण्याचा आम्ही विचार केला. पण कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात फायदे देण्यासाठी, कंपनीला सार्वजनिक गुंतवणूक वाढवावी लागेल किंवा जनतेला शेअर जारी करावे लागतील. म्हणून आम्ही रोख स्वरूपात बोनस देण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीचे सीईओ म्हणाले. 

बँक कर्ज फेडण्यासाठी, घरांसाठी डाउनपेमेंट करण्यासाठी किंवा त्यांच्या गरजेनुसार गुंतवणूक करण्यासाठी आमचे कर्मचारी बोनसच्या पैशांचा वापर करु शकतात, असेही त्यांनी सांगितले.  

14 कोटींचा बोनस जाहीर झाल्यानंतर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाहीय. आम्ही ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीने आम्हाला एक सुखद आश्चर्याचा धक्का दिलाय. त्यांनी आम्हाला दिलेला बोनस आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त असल्याचे ते म्हणाले. ‘आम्हाला आनंद झाला असून आम्ही आमच्या कंपनीच्या विकासासाठी आणखी कठोर परिश्रम करणार असल्याचे कर्मचारी सांगतात. Kovaiकंपनीने 2023 मध्ये वार्षिक 16 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अलीकडेच त्यांनी बेंगळुरूस्थित फ्लोइक कंपनी विकत घेतली आहे.





Source link

नवी इमारत दीड वर्षांपासून धुळखात पडून; सातारा पोलिसांचा संसार जुन्याच वसाहतीत

0


सातारा : राज्य शासनाकडून सध्या पोलिसांच्या (Police) वसाहती आणि पोलीस कार्यालयांच्या इमारती नव्याने व अत्याधुनिक पद्धतीने बांधण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे कालच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्‍यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कार्यालयांच्या इमारतीचे भूमीपूजन केले. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून धुळखात पडून असलेल्या साताऱ्यातील (Satara) पोलीस कुटुंबीयांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीचे उद्घाटन कधी होणार, असा सवाल पोलिसांच्या कुटुंबीयांना पडलेला आहे. जिल्ह्यात पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी शेकडो कोटी खर्च करून मोठी प्रशस्त अशी पोलीस वसाहत उभारण्यात आली आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी या वसाहतीचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. तब्बल 700 कर्मचाऱ्यांसाठी आणि 100 अधिकारी यांना राहण्यासाठी ही वसाहत बांधण्यात आली आहे. मात्र, उद्घाटन केलं नसल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना येथे राहण्यासाठी जाता येत नसल्याने ही प्रशस्त अशी वसाहत धुळखात पडली आहे.

नव्या इमारतीत जाता येत नसल्याचे जुन्याच वसाहतीत पोलीस कुटुंबीयांचा संसार सध्या सुरू आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कुटुंबीयांनी एबीपी माझावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या वसाहतीचे उद्घाटन कधी होणार, आम्ही कधी तेथे राहण्यासाठी येणार अशी भावनिक साद पोलीस पत्नींनी व्यक्त केली आहे. 

लवकरात लवकर उद्घाटन करावे

साताऱ्यातील पोलीस वसाहतीतील पोलीस कुटुंब सध्या जुन्या पोलीस लाईनमध्ये राहत आहेत. या पोलीस लाईनमधील घरांची दुरवस्था झालेली आहे. घरांच्या कौलांची पडझड, भिंतींना पडलेल्या भेगा, लाइट्स, ड्रेनेज पाणी, पोलीस लाईन शेजारी असणाऱ्या उघड्या नाल्याचा वास तसेच उघड्यावर टाकत असलेला कचरा, यांसारख्या समस्यांचा नाहक त्रास पोलीस कुटुंबीयांना होत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी व प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर ही नव्याने बांधण्यात आलेली वसाहत सुरू करण्यात यावी, अशी मागणी पोलीस कुटुंबीयांनी केली आहे

पोलीस अधीक्षकांचा बोलण्यास नकार

या गृह प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा विचार आहे. मात्र, एक ते दीड वर्षांपूर्वीच पूर्ण झालेला हा प्रकल्प धुळखात पडला आहे. सध्या पोलीस कुटुंबियांना जुन्या घरामध्येच राहून त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, या प्रकल्पाचे उद्घाटन कधी होणार, याची विचारणा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केले असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा

 दिल्लीतील एक्झिट पोलनंतर भाजपवर निशाणा; ‘आप’ने पहिल्यांदाच सांगितला विधानसभा निकालाचा आकडा

अधिक पाहा..



Source link

फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर बंगल्यावर  आयकर विभागाचा छापा; राजकीय हालचालींची चर्चा तीव्र

0
फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर बंगल्यावर  आयकर विभागाचा छापा; राजकीय हालचालींची चर्चा तीव्र

फलटण: विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पुणे, मुंबई आणि गोविंद डेअरीवरही छापेमारी करण्यात आली असून ही कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याच्या तयारीत असताना ही कारवाई झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासूनच त्यांच्यावर चौकशी सुरू असून घरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानीही केंद्रीय तपास यंत्रणांनी छापा टाकला आहे. मात्र, या कारवाईचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राजकीय दबाव की नियमांची अंमलबजावणी?
संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली असल्यामुळे राजकीय दबाव असल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “आमच्या घराण्याने देशाला लाखो रुपये कर स्वरूपात दिले आहेत. आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, त्यामुळे यामुळं काही नुकसान होणार नाही.”

रामराजेंची कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन
या छाप्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून “कृपया गर्दी करू नका; खात्याला काम करू द्या, काळजी नसावी,” असा संदेश देत शांत राहण्याचे आवाहन केले.

तालुक्यातून निषेधाचे सूर
या कारवाईचा निषेध करत आमदार दीपकराव चव्हाण म्हणाले, “गेल्या तीन पिढ्यांपासून निंबाळकर कुटुंब राजकारणात कार्यरत आहे. त्यांच्या राजकीय जीवनावर कधीही डाग लागलेला नाही. त्यामुळे अशा कारवाया अपेक्षित नाहीत. मात्र, ही कारवाई राजकीय आहे की नाही, याबाबत काही सांगता येणार नाही.”

ही कारवाई नेमकी कोणत्या संदर्भात झाली आहे आणि त्याचे पुढील परिणाम काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फलटणमध्ये ‘राजें’च्या घरावर चौकशी; रघुनाथराजेंचा कार्यकर्त्यांना दिलासा – “हा राँग नंबर आहे!”

0
फलटणमध्ये ‘राजें’च्या घरावर चौकशी; रघुनाथराजेंचा कार्यकर्त्यांना दिलासा – “हा राँग नंबर आहे!”

फलटण : “फलटणमध्ये राजेंच्या घरामध्ये मोठे घबाड सापडेल” या संशयातून आलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, असे स्पष्ट मत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. “सर्व व्यवहार पारदर्शक आहेत, एक-एक रुपयाचा हिशोब आहे. आमच्या नेत्यावर चुकीचा आरोप केला जात आहे. फलटण म्हणजे बिहार नाही,” असे ते म्हणाले.

रघुनाथराजेंनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना सांगितले की, “चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही लक्षात आले आहे की, हे घर दोन नंबरवाल्यांचे नाही. संजीवराजेंकडे सर्व गोष्टींचा हिशोब आहे. उत्पन्नाचे स्रोत आणि टॅक्स भरला आहे की नाही, याची चौकशी होते. कार्यकर्त्यांनी उगाच काळजी करू नये.”

ते पुढे म्हणाले, “माझे आजोबा सोशालिस्ट पार्श्वभूमीचे होते आणि संजीवराजे देखील तसेच आहेत. कोणीही चुकीच्या अपेक्षा ठेवू नयेत, कारण आम्ही पारदर्शक आहोत. चौकशीत काहीच आक्षेपार्ह निघणार नाही. काही लोक राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील, पण ‘हा राँग नंबर’ आहे.”

यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एंट्री! जैशसोबत हातमिळवणी करत पीएम मोदी, अमित शहा यांना शत्रू म्हटलं, भारताचं टेंशन वाढलं

0
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एंट्री! जैशसोबत हातमिळवणी करत पीएम मोदी, अमित शहा यांना शत्रू म्हटलं, भारताचं टेंशन वाढलं


Hamas In POK : भारताचं टेंशन वाढलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासशी हातमिळवणी केली. दोन्ही दहशतवादी संघटनेच्या नेत्यांची या ठिकाणी बैठक झाली. या बैठकींत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी शत्रू घोषित केलं. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जैशचा एक नेता काश्मीरच्या लढ्याबद्दल बोलताना दिसत आहे. तसेच मोदी आणि शहा हे त्यांचे शत्रू असून काश्मीरसाठी ते एकत्र आले असल्याचं यावेळी दोन्ही संघटनेच्या दहशतवाद्यांनी म्हटलं आहे.



Source link

‘तुझ्या प्रियकराला बागेत बोलव,’ नंतर पतीने मित्राच्या मदतीने केलं हादरवणारं कृत्य

0
‘तुझ्या प्रियकराला बागेत बोलव,’ नंतर पतीने मित्राच्या मदतीने केलं हादरवणारं कृत्य


उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील हत्येची घटना पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांना आरोपी प्रेयसी, तिचा पती आणि एका मित्राला अटक केली आहे. ही घटना हरदत्त नगर गिरंट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंसरी गावात घडली. भेंसरी गावातील रहिवासी राजा बाबू यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राजा बाबूच्या वडिलांनी जुन्या वादातून पाच जणांवर आणि आठ अज्ञातांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

घटनेचा खुलासा करताना एसपी घनश्याम चौरसिया यांनी सांगितले की, मृत राजा बाबूचे लग्नापूर्वी बहराइच पोलिस ठाण्याच्या कोतवाली देहात परिसरातील नगरौर गावातील रहिवासी राणूच्या पत्नीशी अवैध संबंध होते. लग्नाच्या एका वर्षानंतरही मृत राजा बाबू आपल्या पत्नीला अश्लील फोटो आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत होता. 

पाईप, साखळी आणि चाकूद्वारे राजा बाबूची हत्या

एकदा रानूने तिच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाहिले होते. यानंतर, 30 जानेवारीच्या रात्री रानूने आपल्या पत्नीला सांगून राजा बाबूला आंब्याच्या बागेत बोलवण्यास सांगितले. जिथे आधीच उपस्थित असलेल्या रानूने बहराइचच्या कोतवाली देहात परिसरातील बेरिया गावातील रहिवासी असलेल्या त्याच्या मित्र उपेंद्र यादवसोबत मिळून लोखंडी साखळी, पाईप आणि चाकूने राजा बाबूची हत्या केली. 

तिघांना पोलिसांकडून अटक 

या प्रकरणात रानू, त्यांची पत्नी आणि मित्र उपेंद्र यादव यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी वापरेला चाकू, साखळी, पाईप, हे ताब्यात घेण्यात आले आहे. त्यासोबकच राजा बाबूच्या मोबाईलचे रक्ताने माखलेले कव्हर, एक मोबाईल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना संबंधित न्यायालयात हजर करण्यात आले. जिथून जोडप्याला आणि त्यांच्या सहकाऱ्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.





Source link