
मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या रशियन तरुणीने रस्त्यावर गोंधळ घातला आणि पोलिसांचाही विरोध केला असं साक्षीदारांनी सांगितलं आहे. रशियन तरुणीचा पोलिसांसोबत वाद घालत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Source link

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या रशियन तरुणीने रस्त्यावर गोंधळ घातला आणि पोलिसांचाही विरोध केला असं साक्षीदारांनी सांगितलं आहे. रशियन तरुणीचा पोलिसांसोबत वाद घालत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Source link

लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात (lilavati hospital) अखेरचा श्वास घेतला.
पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबई (mumbai) महापालिकेत (bmc) उच्च पदावर काम करत होते. मात्र क्रिकेटवर लिहिणं, बोलणं आणि मराठी साहित्यातली त्यांची रुची त्यामुळे त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडला.
मराठी क्रिकेट (cricket) रसिकांनी त्यांच्या क्रिकेटवरच्या लेखांना आणि इतर लेखांना कायमच दाद दिली होती. क्रिकेट या खेळाबाबतची माहिती देणारा, त्यातली सौंदर्यस्थळं लेखणीने टिपणारा एक अवलिया माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे.
क्रिकेट विश्व, त्यावरच्या सुरसकथा लिहिणारी लेखणी शांत झाली आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्व हळहळलं आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत काम केले, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते 2008 या वर्षी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले.
त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 1970 च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले.
भारताने इंग्लंडमध्ये 1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते, ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.
द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.
हेही वाचा

The Other World Natak : ‘द… अदर वर्ल्ड’ हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी,नाले,ओढे, झरे,समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.

Suspense Film On OTT : वीकेंड जवळ येऊ लागला की, घरीच बसून एखादा चित्रपट किंवा सीरिज बघण्याचा प्लॅन अनेकजण बनवत असतात. मात्र, अशावेळी नक्की काय बघावं हा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडलेला असतो. सोशल मीडियावर अनेक पर्याय शोधताना आपल्याला असा एखादा चित्रपट सापडतो की तो पाहिल्यावर वीकेंड धमाकेदर होऊन जातो. या आठवड्यात तुम्ही देखील असाच काही प्लॅन बनवत असाल, आणि एखादा सस्पेन्स चित्रपट बघणे तुम्हाला आवडत असेल, तर ओटीटीवर असलेला हा साऊथचा सिनेमा नक्कीच पाहू शकता.

महाराष्ट्रात खोदल्या गेलेल्या अनेक लेण्यांची दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते जेव्हाकी लेणी ह्या आपला अनमोल ठेवा आहे सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्याही त्या महत्त्वाच्या आहेत,असे धार्मिक स्थापत्य प्रकार आधी महाराष्ट्रात नव्हती आज एकविसाव्या शतकात तांत्रिकदृष्ट्या आपण प्रगत असताना देखील असे वास्तू प्रकार आपण घडवू शकणार नाहीत तर असलेली वास्तू जोपासली जावी ही मानसिकता तयार होणे गरजेचे आहे .
महाराष्ट्रात “लेणी” हा वास्तू प्रकाराला सुरुवात जरी भाजा लेणी पासून झाली असली तरी तिच्या समकालीन असलेली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील “पितळखोरा लेणी” देखील आद्य लेणी म्हणुनच गणली जाते “पीतांगल्य” हे तिचे पूर्वीचे नाव इ स पुर्व दुसऱ्या शतकातील ही तशी थेरवादी शाखेची लेणी पण इ स पाचव्या शतकात महायना शाखेच्या प्रभावाखाली आल्याने इथे तथागतांचे, बौध्दीस्तवांचे भित्तीचित्रे पाहायला मिळतात ही लेणी १८५३ मध्ये प्रथमता प्रकाश झोतात आणली ती संशोधक जॉन विल्सन यांनी “जनरल अॉफ रॉयल एशियाटिक सोसायटी” च्या ४ क्र खंडात या लेणीचा पहिल्यांदा उल्लेख मिळतो तसेच १८८० मध्ये जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी आपल्या “The Cave Temple of India” या आपल्या पुस्तकात तीचा उल्लेख मिळतो त्यात फक्त १ ते ९ फक्त या लेण्यांचीच माहिती मिळते नंतरच्या काळात M N Deshpande सरांनी १९५७/५८ मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले त्यात हत्तींची रांग काही शिल्प टेराकॉटा म्हणजे भाजकी भांडी सापडली तसेच “संकरीन यक्ष” स्फटिकात तयार केलेले स्तूपाच्या आकाराचे शरीर धातू ठेवण्यासाठी तयार केलेले करंडक सापडले होते आणि चार क्रमांकाच्या लेणीकडे जाणार्या दरवाज्यात दोन सुस्थितीत उभे असलेले द्वारपाल सापडले.
१९५३ साली ही लेणी “राष्ट्रीय संरक्षित स्मारक” म्हणून घोषित करण्यात आली आहे, ही लेणी जाहिर केल्यापासून “संरक्षित” आहे असे म्हणता येईल का…?
पितळखोरा लेणी संरक्षित नाही असे म्हणायला खूप मोठा वाव आहे कारण ज्या वेळेस चार क्रमांकाच्या लेणी समोरील ढिगारा १९५७/५८ साली उपसला गेला तेव्हा त्या खाली दोन द्वारपाल सापडले जे अत्यंत सुंदर आणि सुस्थितीत होते लेणी समोरील उभे असलेल्या द्वारपालांच्या पेहराव्या वरून गत काळातील राहणीमान आपल्याला लक्षात घेता येते, तेव्हा हे द्वारपाल व्यवस्थित व सुस्थितीत होते त्या नंतरच्या काळात मात्र हळू हळू हे शिल्प नष्ट करण्यास सुरुवात झाली, नष्ट करण्याचा सपाटाच लावला होता मिळालेल्या माहितीनुसार इथल्या खालच्या गावातील गुरे चरायला आणणाऱ्या मुलांनी हे शिल्प दगड मारून मारून तोडले आहे तसेच हत्तींच्या रांगे आधी एक घोड्याचे शिल्प तसेच एक युगुल असलेलं शिल्प कोरलेले होते कदाचीत ते राज घराण्यातील स्त्री पुरुषाचे होते ते देखील नष्ट केले गेले आज ती शिल्प आपल्याला पाहायला मिळत नाहीत, जर “राष्ट्रीय संरक्षित स्मारक” म्हणून घोषित असलेल्या महाराष्ट्रात प्रथम खोदलेल्या लेणींच्या श्रृंखलेतील आद्य लेणीची ही अवस्था आहे तर बाकीच्या छोट्या लेणी /स्मारकांची अवस्था काय असेल ही फक्त कल्पनाच करा.
जागतिक किर्ती मिळवली “अजिंठा लेणी” च्या जवळच असलेल्या या पितळखोरा लेणीकडे पर्यटक फारसे फिरकत नाही फक्त अभ्यासाच्या दृष्टीने येणारी मंडळी इकडे वळतात.
आपला सांस्कृतिक ठेवा जोपासण्यासाठी पाहण्यासाठी आम्ही अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अनेक लेणींनवर जात असतो त्यामुळे आपला वाढलेला वावर पाहून नासधूस करणारी मंडळीना आळा बसतो , अशा बारीकसारीक तपशीलवार माहिती जाणुन घेण्यासाठी येणार्या दिवसात आम्ही असाच एक अभ्यास दौरा आयोजित करत आहोत ज्यांना या अभ्यास दौऱ्यात समाविष्ट होण्याची इच्छा आहे त्यांनी खालील नंबरवर आपला संपूर्ण पत्ता आणि माहिती व्हॉट्स अप वर पाठवायची आहे.
संदर्भ
१) The Cave temple of India : James Burgess
२) Pitalkhora Cave Report : M N Deshpande
३) भारतीय कलेचा इतिहास : डॉ अनिल कठारे
सूरज रतन जगताप

Delhi Exit Poll 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला बंपर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पी-मार्क, चाणक्य स्ट्रॅटेजीज, मॅटराईज आणि पीपल्स इनसाइट सह बहुतेक सर्वेक्षणांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत देण्यात आले आहे. पण आतापर्यंत केवळ दोन सर्व्हेमध्ये ‘आप’च्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माइंड ब्रिंक (Mind Brink) आणि विप्रेसिड सर्व्हेमध्ये आम आदमी पक्ष सलग चौथ्यांदा सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे :- संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज आणि व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी भावनिक चिठ्ठी लिहीत कुटुंबीय व मित्र परिवाराची माफी मागितली आहे. त्याचवेळी स्वतःवर असलेल्या कर्जाची माहितीही या चिठ्ठीत नमूद केली आहे. या घटनेनंतर देहू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आज सकाळी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुरुवातीला या आत्महत्येमागे नेमकं कारण काय याबाबत साशंकता होती. मात्र पोलिसांच्या तपासात शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार वेगवेगळ्या चिठ्ठ्या मिळून आल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी आर्थिक अडचणींबरोबरच विविध भावना व्यक्त केल्या आ शिरीषमहाराजांनी लिहिलेल्या पहिल्या चिठ्ठीतून आई, वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबीय आणि चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना शेवटचा संदेश दिला आहे. एका चिठ्ठीत त्यांनी आपल्यावर ३२ लाख रुपयांचं कर्ज असल्याचं नमूद केलं आहे. आपण हे कर्ज फेडू असं वाटत होतं, मात्र आता लढण्याची ताकद उरलेली नाही. त्यामुळं मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझ्यावरील कर्ज फेडण्यासाठी कुटुंबीयांना साथ द्या अशी भावनिक सादही त्यांनी आपल्या मित्रांना घातली आहे. तसेच आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही त्यांनी माफी मागितली आहे. आपण होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्नं दाखवली, मात्र ती पूर्ण न करताच आपला प्रवास थांबवतोय. मला तिला वेळ देता आला नाही. मात्र आता तिच्यासाठी चांगला मुलगा बघून लग्न करून द्या अशीही विनवणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, शिरीष महाराज यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेला होता. लवकरच ते विवाहबद्ध होणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे देहू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचं त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमधून समोर आलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेला चालना देण्यात आली आहे. ५ वर्षात आठ लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. काही घरे दिल्यानंतर आम्ही तेथे भेट देऊन त्यांची गुणवत्ता तपासणार आहोत. कोकण मंडळात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. सध्याच्या लॉटरीमध्ये २ हजार १४७ सदनिकांचा समावेश आहे. यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेमधील ५९४ सदनिका (ठाणे व कल्याण), म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेतील ७२८ सदनिका (ठाणे, कल्याण, रत्नागिरी), १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील ८२५ सदनिका (डोंबिवली) यांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी एकूण ३१ हजार ४६५ अर्ज प्राप्त झाले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २३ चौरस मीटर ते ५० चौरस मीटर दरम्यान असून सदनिकांची सरासरी किंमत रुपये १० लाख ते ३५ लाखापर्यंत आहे.
सातारा: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे बंधु संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर(Raghunath Raje Naik Nimbalkar) यांच्या घरावर आज (5 फेब्रुवारी) सकाळी आयकर विभागानं छापा टाकाला होता. दरम्यान, सकाळी 6 वाजतापासून सुरू असलेल्या या कारवाईला आता दहा तास उलटले असूनही ही चौकशी अद्याप सुरूच असल्याचे पुढे आले आहे. मात्र ही धाड नेमकी कशामुळे आणि धाडीचे कारण काय? हे अद्याप कळू शकलेले नाही. दुसरीकडे या कारवाई विरोधात निंबाळकरांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून आज सकाळपासून निंबाळकर यांच्या घरावराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान, या कारवाईच्या विरोधात फलटणमधील राजे गटाचे कार्यकर्ते आता अधिक आक्रमक झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याच्या निषेधार्थ उद्या(6 फेब्रुवारी) फलटणमध्ये निषेध मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या कारवाईच्या विरोधात सकाळपासून संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते गेटवर ठाण मांडून बसले आहे. यात माजी आमदार दीपक चव्हाण हे देखील सकाळपासून गेटवर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले आहे.
इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास रघुनाथराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरीवर धाडी टाकल्या आहेत. एकाचवेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या आहेत. रघुनाथराजे यांचे स्वीय सहायक महेश ढवळे यांच्या घरी देखील धाडी टाकण्यात आल्या आहेत. घरातील सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू कुठून आल्या, घरात असलेली रक्कम तसेच विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले. आज सकाळपासून संजीवराजे आणि रघुनाथराजे यांना प्रश्न विचारल्यानंतर घरातील कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य यांना देखील प्रश्न विचारणं सुरू आहे. तर निंबाळकर कुटुंबियांकडून आपण व्यवस्थित असून कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
आयकर विभागाच्या छाप्यानंतर संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. आक्रमक कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी ही तबडा बंदोबस्त घराबाहेर तैनात केला आहे. अशातच ‘कृपया घरा बाहेर गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या, काळजी नसावी’ अशी पोस्ट करत रामराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..