Sunday, August 30, 2026
Homeसातारात्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये खिरवाटप व ‘आदर्श माता पुरस्कार’ची घोषणा

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये खिरवाटप व ‘आदर्श माता पुरस्कार’ची घोषणा

फलटण: त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त माता रमाई मित्रमंडळ, मंगळवार पेठ, फलटण यांच्या वतीने सालाबादप्रमाणे खिरवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला उपस्थित महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

या जयंतीनिमित्त माता रमाई मित्रमंडळाने पुढील वर्षापासून ‘आदर्श माता पुरस्कार’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मातांचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू ढावरे यांनी केले. मंगळवार पेठेतील महिला आणि तरुण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments