Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटणमध्ये ‘राजें’च्या घरावर चौकशी; रघुनाथराजेंचा कार्यकर्त्यांना दिलासा – "हा राँग नंबर आहे!"

फलटणमध्ये ‘राजें’च्या घरावर चौकशी; रघुनाथराजेंचा कार्यकर्त्यांना दिलासा – “हा राँग नंबर आहे!”

फलटण : “फलटणमध्ये राजेंच्या घरामध्ये मोठे घबाड सापडेल” या संशयातून आलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, असे स्पष्ट मत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. “सर्व व्यवहार पारदर्शक आहेत, एक-एक रुपयाचा हिशोब आहे. आमच्या नेत्यावर चुकीचा आरोप केला जात आहे. फलटण म्हणजे बिहार नाही,” असे ते म्हणाले.

रघुनाथराजेंनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना सांगितले की, “चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही लक्षात आले आहे की, हे घर दोन नंबरवाल्यांचे नाही. संजीवराजेंकडे सर्व गोष्टींचा हिशोब आहे. उत्पन्नाचे स्रोत आणि टॅक्स भरला आहे की नाही, याची चौकशी होते. कार्यकर्त्यांनी उगाच काळजी करू नये.”

ते पुढे म्हणाले, “माझे आजोबा सोशालिस्ट पार्श्वभूमीचे होते आणि संजीवराजे देखील तसेच आहेत. कोणीही चुकीच्या अपेक्षा ठेवू नयेत, कारण आम्ही पारदर्शक आहोत. चौकशीत काहीच आक्षेपार्ह निघणार नाही. काही लोक राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील, पण ‘हा राँग नंबर’ आहे.”

यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments