Thursday, July 30, 2026
Home Blog Page 534

रामराजे-अजित पवार  भेटींमुळे फलटणच्या राजकारणात हलचल

0
रामराजे-अजित पवार  भेटींमुळे फलटणच्या राजकारणात हलचल

मुंबई/: फलटणच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मोठी हालचाल सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सलग दोन दिवस भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मंगळवारी (11 फेब्रुवारी) मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी रामराजे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (12 फेब्रुवारी) मंत्रालयात पुन्हा एकदा त्यांच्या दालनात जाऊन चर्चा केली. या भेटींनंतर माध्यम प्रतिनिधींनी रामराजे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणतेही वक्तव्य देण्याचे टाळले.

यामुळे या भेटी केवळ औपचारिक होत्या की त्यामागे काही राजकीय डावपेच आहेत, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. फलटणमधील राजे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत.

आयकर धाडीच्या पार्श्वभूमीवर भेटींचे महत्त्व

काही दिवसांपूर्वीच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘गोविंद मिल्क’ आणि त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने धाड टाकली होती. या धाडीत काहीही अवैध आढळले नसल्याचा दावा संजीवराजे यांनी केला होता. मात्र, या घटनाक्रमानंतर लगेचच रामराजे यांनी दोन वेळा अजित पवार यांची भेट घेतल्याने या घडामोडींचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

जर राजे गटाने शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार गटात प्रवेश केला, तर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीला वेग मिळेल, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही या हालचाली महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

सध्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांच्या गुप्त हालचाली आणि अजित पवार यांच्यासोबतच्या चर्चांमुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांना ‘राज्यस्तरीय विश्वसमता समाज भूषण पुरस्कार’ जाहीर

0
प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांना ‘राज्यस्तरीय विश्वसमता समाज भूषण पुरस्कार’ जाहीर

फलटण | मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग प्रमुख तसेच श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे विद्यमान संचालक प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांना विश्व समता कलामंच, लोवले (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांचा ‘राज्यस्तरीय विश्वसमता समाज भूषण पुरस्कार – २०२५’ जाहीर झाला आहे.

प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि संशोधनात्मक कार्याची दखल घेत निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांनी २००० हून अधिक समाजप्रबोधन व्याख्याने दिली असून, अनेक शोधनिबंध, लेख, प्रस्तावना, कविता आणि समीक्षालेखन केले आहे. तसेच ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विषयाच्या पीएचडी गाईड म्हणून कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये पीएचडी संशोधन प्रबंधांचे परीक्षक आणि रेफ्री म्हणून त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य म्हणून अभ्यासक्रम निर्मिती, संपादन आणि लेखन क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

#विश्वसमता_पुरस्कार #प्रभाकर_पवार #समाजभूषण_पुरस्कार #मराठीसाहित्य #शैक्षणिकयोगदान

हा पुरस्कार मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे स्वरूप असलेला असून, तो रविवार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी लोवले, जि. रत्नागिरी येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक व शैक्षणिक वर्तुळात त्यांचे अभिनंदन होत आहे.

Pune GBS Update : पुण्यात GBS ने आणखी एका रुग्णाचा घेतला बळी! रुग्णसंख्या पोहोचली २०० पार

0
Pune GBS Update : पुण्यात GBS ने आणखी एका रुग्णाचा घेतला बळी! रुग्णसंख्या पोहोचली २०० पार


Pune GBS Update : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा कहर वाढत आहे. बुधवारी आणखी एका जीबीएस बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी ६ जणांना या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्याचा फॉलोअप देखील घेण्यास सुरुवात केली आहे.



Source link

फलटणमध्ये लोखंडी तलवारीसह तरुण गजाआड – पोलिसांची तातडीने कारवाई

0
फलटणमध्ये लोखंडी तलवारीसह तरुण गजाआड – पोलिसांची तातडीने कारवाई

फलटण, 13 फेब्रुवारी: फलटण शहर पोलीस ठाणे अंतर्गत एका गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दि. 12 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास, पंचायत समिती गेटसमोर रस्त्यावर एका तरुणाला लोखंडी तलवारीसह अटक करण्यात आली.

फिर्यादी पोलीस हवालदार संदीप दिलीप लोंढे (फलटण शहर पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परवेज समिर पठाण (वय 23, रा. बादशाही मस्जिदच्या मागे, कसबा पेठ, फलटण) याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रथम खबर क्रमांक 54/2025 नोंदवली आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भोसले करत असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ ही कारवाई केली. ‘

You Tube वर ‘इंडियाज गॉट लँटेंट’चे व्हिडिओ पाहता येणार नाहीत

0
You Tube वर ‘इंडियाज गॉट लँटेंट’चे व्हिडिओ पाहता येणार नाहीत



प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने  (Ranveer Allahbadia) इंडियाज गॉट लँटेंटमध्ये (India’s Got Latent) केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सध्या गदारोळ माजला आहे. सर्व स्तरातून रणवीरसह समय रैनासह जोरदार टीका केली जात आहे.

थेट मुख्यमंत्र्यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. मुंबई पोलीस सध्या याप्रकरणाची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी सर्व परीक्षकांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. सर्वांचा जबाब नोंदवला जात असून, कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान समय रैनाने (Samay Raina) इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) शेअर केली आहे.

मी माझ्या चॅनेलवरुन ‘इंडियाज गॉट लँटेंटचे सर्व व्हिडीओ हटवले आहेत,” असं समय रैनाने जाहीर केलं आहे. तसंच सर्व तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी मी सर्व यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करेन असं आश्वासन दिलं आहे. 

“जे काही सुरू आहे ते हाताळणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी माझ्या चॅनेलवरून इंडियाज गॉट लेटंटचे सर्व व्हिडीओ हटवले आहेत. माझा एकमेव हेतू फक्त लोकांना हसवणं आणि चांगला वेळ देणं आहे. सर्व तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी मी सर्व यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करेन,” असं समय रैनाने सांगितलं आहे.

दरम्यान समय रैनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. समय रैनाच्या वकिलांनी मुंबई पोलिसांना सांगितलं होतं की, समय सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून तो 17 मार्चला मुंबईत परतणार आहे. मात्र मुंबई पोलिसांनी ही विनंती फेटाळली आहे. इतके दिवस पोलीस तपास थांबवता येणार नाही. त्यामुळे चौकशी सुरू झाल्यापासून 14 दिवसांत त्याला पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. 


हेही वाचा



Source link

Chhaava : ‘छावा’वर चालली सेन्सॉर बोर्डाची कात्री; विकी कौशलच्या चित्रपटातून नेमकं काय काय हटवलं?

0
Chhaava : ‘छावा’वर चालली सेन्सॉर बोर्डाची कात्री; विकी कौशलच्या चित्रपटातून नेमकं काय काय हटवलं?


Chhaava Movie Censor Board Cuts : आगामी ‘छावा’ चित्रपटातील वादग्रस्त लेझिम सीक्वेन्स काढून टाकल्यानंतर, सीबीएफसीने लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात अनेक बदल सुचवले आहेत. हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांच्या भावना दुखावू नयेत, म्हणून काही शब्द बदलण्यापासून ते इतिहासाला अपमानित करणारी दृश्ये काढून टाकण्यापर्यंत अनेकदा या चित्रपटावर कात्री चालवण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने नंतर कोणताही वाद निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, या चित्रपटाला सीबीएफसीने यू/ए १६+ प्रमाणपत्र दिले आहे.



Source link

भारत पाकिस्तान सीमेवर तणाव! पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडली, भारतीय लष्करानं चोख उत्तर देत शत्रूचं कंबरड मोडलं

0
भारत पाकिस्तान सीमेवर तणाव! पाकिस्तानने शस्त्रसंधी तोडली, भारतीय लष्करानं चोख उत्तर देत शत्रूचं कंबरड मोडलं


Pakistan broke ceasefire on LOC : पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली असून नियंत्रण रेषेवरील तारकुंडी भागातील भारताच्या फॉरवर्ड पोस्टवर गोळीबार केला. यामुळे सीमेवर तणाव निर्णयाम झाला असून भारतीय लष्कराने याला चोख उत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराचं  मोठं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे.  



Source link

साखरवाडी बुद्ध विहार आंदोलन – सरकारला ठाम इशारा!

0
साखरवाडी बुद्ध विहार आंदोलन – सरकारला ठाम इशारा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाही; सर्व निवडणुकांवर बहिष्कार

साखरवाडी (ता. फलटण)बुद्ध विहारासाठी जागा मिळावी, ही मागणी संपूर्ण दलित समाजाची हक्काची मागणी आहे. मात्र, गेल्या 26 वर्षांत 72 वेळा खोटी आश्वासने देत प्रशासनाने समाजाची दिशाभूल केली. या अन्यायाविरोधात आता लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, शासनाने तातडीने लेखी निर्णय न घेतल्यास यंदा साखरवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाणार नाही! तसेच आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.

समाजाची ठाम भूमिका – मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत!
फक्त वस्तीत भीम-बुद्ध पूजा, संविधान वाचन आणि ग्रंथवाटप होईल.
बुद्ध विहारासाठी जागा मंजूर झाल्यासच जयंती साजरी करू, अन्यथा यंदा जयंती नाही!

प्रशासनाच्या दिरंगाईला विरोध – आता निर्णयच हवा!

गेल्या अनेक वर्षांत तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार यांनी आपल्या परीने प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा आहेत. प्रशासनाच्या साखळीतील इतर वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी आता स्पीड 100 चा गतीने निर्णय घ्यावा!
आज डिजिटल युगात सर्व व्यवहार ऑनलाइन होत असताना, एक मागणी दिल्ली दरबारी पोहोचवण्यासाठी 6-6 महिने लावले जातात, हे मान्य नाही! फॅक्स करा, मेल करा, संबंधित अधिकाऱ्यांना फोन करा! गरज पडल्यास आम्हीही सरकारपर्यंत पोहोचू. पण आता विलंब खपवून घेतला जाणार नाही!

निर्णय झाला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार!

संपूर्ण साखरवाडीतील दलित समाज ग्रामपंचायतसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल!
आगामी निवडणुकीत आमदार, खासदार आणि इच्छुक उमेदवारांना मत मागण्याआधी विचारावे लागेल – “बुद्ध विहारासाठी काय केलं?”
लोकप्रतिनिधींना मत नागरिकांच्या प्रश्नांसाठी दिले जाते. मात्र, जर सरकार आमच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल, तर अशा व्यवस्थेला मत देण्यात काहीच अर्थ नाही!

नोटा बटणाचा प्रचार – संपूर्ण समाजाचा निर्धार!

जर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर हा निर्णय केवळ साखरवाडीसाठी मर्यादित न राहता, संपूर्ण तालुक्यात आणि समाजात जनजागृती करून आम्ही “NOTA” बटणाच्या प्रचारात उतरू!
कोणतेही राजकीय चिन्ह मोठे नाही, पण आमची अस्मिता मोठी आहे!

सरकारला अंतिम इशारा!

सरकारने तातडीने लेखी आदेश जारी करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल!
आम्ही शांत आहोत, पण ही शांतता सरकारसाठी धोक्याची घंटा ठरेल!
बुद्ध विहारासाठी मागील 26 वर्षांत एक संपूर्ण पिढी वाया गेली, आता हे पुन्हा होऊ द्यायचे नाही.

1999 मध्ये नवीन पोलीस ठाण्याची जागा बुद्ध विहारासाठी निश्चित झाली होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि दलित समाजावरील अन्यायामुळे ती जागा हिरावून घेतली गेली. आता तीच जागा बुद्ध विहारासाठी द्यावी आणि आमच्या जुन्या पिढीच्या संघर्षाला न्याय द्यावा!

तुमचं वाहन 2019 पूर्वीचं आहे का? मग ही बातमी वाचाच, 1 एप्रिलआधी नंबर प्लेट बदला अन्यथा बसेल भुर्दंड

0
तुमचं वाहन 2019 पूर्वीचं आहे का? मग ही बातमी वाचाच, 1 एप्रिलआधी नंबर प्लेट बदला अन्यथा बसेल भुर्दंड


राज्यातील  वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमच्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट आहे का? नसेल तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. एका नव्या नियमामुळे मात्र वाहनचालक गोंधळलेले दिसत आहेत. 2019 पूर्वीच्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 31 मार्चपर्यंत ही मुदत देण्यात आली असून 1 एप्रिलपासून कारवाई केली जाणार आहे. यामुळे वाहनचालक मात्र काहीसे गोंधळलेले दिसत आहेत. 

वाहनधारकांनो जागे व्हा!, तुमची गाडी जर 2019 पूर्वीची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार वाहन उत्पादकांना 2019 एप्रिलनंतरच्या वाहनांना HSRP देणं बंधनकारक केलं होतं. मात्र  2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं बंधनकारक नव्हतं. मात्र आता नव्या नियमानुसार राज्यात   2019 पूर्वीच्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं अनिवार्य आहे. 31 मार्चपर्यंत नवी नंबर प्लेट लावली नाही तर अशा वाहनचालकांना 1 हजारांपर्यंतचा भुर्दंड बसेल. या नंबर प्लेटमुळे वाहनधारकांची सुरक्षा योग्य प्रकारे होऊ शकते असा दावा वाहतूक प्रशासनानं केला आहे. 

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक असली तरी वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या प्रमुख शहरात नंबर प्लेट लावण्यासाठी खासगी एजन्सींना कंत्राट देण्यात आलं आहे.  

– महाराष्ट्र मोटार वाहन विभागाच्या वेबसाईटवर नंबर प्लेटसाठी स्लॉट बुकींगचं लॉग इन होत नाही 

– अनेक वेळेस पैसे टाकूनही नंबर प्लेट मिळण्याची शाश्वती नाही

– स्लॉट बुकींगनंतर 90 दिवसांच्या आत नंबर प्लेट मिळणार, त्यामुळे 31 मार्चची डेडलाईन कशी पाळणार?

– बाजारात डुप्लिकेट प्लेटसचा सुळसुळाट

– लवकर नंबर प्लेट मिळवून देण्याच्या आरटीओ एजंट अधिक पैसै आकारतात ..

फॅन्सी नंबर प्लेटचं सध्या फॅड आहे, मात्र विचित्र पद्धतीने टाकलेले नंबर अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्पीड रडारमध्ये रीड होत नाहीत, आणि अपघातावेळी वाहन धारकांची ओळख पटवताना पोलिसांना अवघड जातं. आता या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना शिस्त येते का आणि अपघातांचं प्रमाण कमी होतं का हे पाहावं लागेल. 





Source link

साखरवाडी येथे बौद्ध विहारासाठी जागेच्या मागणीला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा!

0
साखरवाडी येथे बौद्ध विहारासाठी जागेच्या मागणीला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा!

साखरवाडी (ता. फलटण) :-येथे बौद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी बौद्ध बांधवांनी सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 रोजी साखरवाडी गाव ते फलटण प्रांत कार्यालयापर्यंत पायी चालत लॉंग मार्च काढला. प्रशासनाकडून वेळोवेळी मागणी करूनही जागा मिळत नसल्याने संतप्त बौद्ध बांधवांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, फलटण तालुका यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. पक्षाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना समर्थन पत्र देण्यात आले असून, पक्ष भविष्यात बौद्ध विहार उभारणीसाठी आवश्यक ती मदत करेल, असे आश्वासन देण्यात आले.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख विक्रम नाळे, तालुका संघटक नंदकुमार काकडे, शहर संघटक अक्षय विलास तावरे, शिवआरोग्य सेनेचे अंकुश पवार व प्रविण पवार यांच्या उपस्थितीत पाठिंबा पत्र आंदोलनकर्त्यांना सुपूर्द करण्यात आले.

संविधानिक अधिकार असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने बौद्ध बांधवांना संघर्ष करावा लागत आहे. आता हा लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.