Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3027

मालोजीराजे शेती माध्यमिक विद्यालय येथे उपप्राचार्य पदी विकास काकडे यांची नेमणूक

0
मालोजीराजे शेती माध्यमिक विद्यालय येथे उपप्राचार्य पदी विकास काकडे यांची नेमणूक

फलटण : मालोजीराजे शेती माध्यमिक विद्यालय फलटण येथे उपप्राचार्य पदी विकास काकडे यांची पदोन्नती मिळून नेमणूक झाली आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हि नियुक्ती करण्यात आली आहे .

विकास काकडे यांचे माध्यमिक शिक्षण हे मालोजी राजे शेती माध्यमिक विद्यालय येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण याठिकाणी झाले. पुढे त्यांनी बी. एड. हे भोर या ठिकाणी पूर्ण केले. काकडे यांची शिक्षक म्हणून ज्ञानदान करण्याची सुरुवात ही नवचैतन्य हायस्कूल गोंदवले बुद्रुक इथून झाली. काकडे यांनी गोंदवले, आसू , पवारवाडी , फलटण शहरातील फ.ए. सोसायटीचे मानबिंदू असलेले मुधोजी माध्यमिक हायस्कूल याठिकाणी एक आदर्श, विद्यार्थी प्रिय शिक्षक, उत्तम सहकारी म्हणून काम केले आहे.

प्रशासकिय कामाचा चांगला अनुभव असल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनात आपल्या आदराचे स्थान त्यांनी निर्माण केले आहे . विकास काकडे यांनी जसे शैक्षणिक क्षेत्रात काम केले तसेच त्यांनी सामाजिक, राजकीय, धम्म चळवळीत अग्रभागी राहून काम केले आहे.

सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकांचे वाटप करणे. रक्तदान शिबीर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपणे. धम्म चळवळीत काम करताना त्यांनी फलटण शहरामध्ये त्यांचे काका कालकथित प्रल्हाद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९२ पासून श्रामणेर शिबीर घेऊन व तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती स्थापन करून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम त्यांनी आजपर्यत चालू ठेवलेआहे. तसेच राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांचे काका माजी नगरसेवक हरिष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक व सांस्कृतिक, आर्थिक स्थिती सुधारणांचे काम करत आहेत.

Mahabaleshwar Fogie Climate Marathi News

0



<p>Mahabaleshwar: महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर; वातावरणात गारवा&nbsp;</p>



Source link

Shark Tank 3: ‘शार्क टँक इंडिया सीझन ३’साठी नोंदणी सुरू! कसं सहभागी व्हायचं? जाणून घ्या प्रक्रिया…

0
Shark Tank 3: ‘शार्क टँक इंडिया सीझन ३’साठी नोंदणी सुरू! कसं सहभागी व्हायचं? जाणून घ्या प्रक्रिया…


ऑनलाइन अर्ज

शार्क टँक इंडिया सीझन ३ चा नोंदणी अर्ज भरण्यासाठी सोनीलिव्ह अॅप डाउनलोड करा किंवा Sonyliv.com वर लॉग ऑन करा. तुमच्या व्यवसाय कल्पनेचे आकर्षक शब्दांत वर्णन करा, ती कल्पना कशी अनन्यसाधारण आहे आणि तिच्यात किती संभाव्यता दडलेली आहे, यावर प्रकाश टाका. तुमची कल्पना ‘शार्क टँक इंडिया टीम’चे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली, तर तुम्ही पुढील पायरी चढू शकाल.



Source link

Sai Tamhankar : मराठमोळ्या सई ताम्हणकरचा लेस्बियन लीपलॉक होतोय व्हायरल! ‘क्राईम बीट’चा टीझर पाहिलात?

0
Sai Tamhankar : मराठमोळ्या सई ताम्हणकरचा लेस्बियन लीपलॉक होतोय व्हायरल! ‘क्राईम बीट’चा टीझर पाहिलात?


अभिनेत्री सई ताम्हणकर हिची नवी वेब सीरिजच लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘क्राईम बीट’ असे या नव्या वेब सीरिजचे नाव आहे. यात सईबरोबर अभिनेता साबीक सलीम, राहूल भट्ट, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, सबा आझाद हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, यात सईचा बोल्ड अंदाज पाहायला मिळला आहे.



Source link

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेग्नंट असताना शोमधून काढलं! जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर नवा आरोप

0
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेग्नंट असताना शोमधून काढलं! जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर नवा आरोप


जेनिफर म्हणाली की, ‘मी प्रेग्नंट होते, गुरचरण सिंह सोढीने शो सोडला होता. त्यामुळे मला सांगण्यात आले की, आम्ही नवीन अभिनेता आणू, पण जर तू गरोदर असशील, तर ते स्क्रीनवर चांगले दिसणार नाही. हा एक फॅमिली शो आहे, जर दुसरा सरदार आला आणि लोकांनी तुला प्रेग्नंट पाहिलं तर त्यांना वाटेल की, तू दुसर्‍यापासून गरोदर आहेस. मी त्यांना सांगितलं की माझा क्लोजअप घ्या आणि कोणाला कळणार नाही, पण त्यांना काहीच जुळवून घ्यायचं नव्हतं.’



Source link

फलटण येथे मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याने दोन बालकांना उडवले | पुढारी

0









साखरवाडी ; पुढारी वृत्तसेवा फलटण येथे शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्‍थेतील एका पोलिस निरीक्षकाने बालकांना उडवले. या घटनेत जखमी झालेल्‍या बालकांना रूग्‍णालयात भरती करण्यात आले. यावेळी संतप्त जमावाने मद्यधुंद पोलिस निरीक्षकाला चोप दिला.

या विषयी अधिक माहिती अशी की, फलटण शहर पोलीस ठाण्यातून नुकतीच बदली झालेले पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी काल (शनिवार) दि. 3 जून रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास फलटण शहरातील दत्तनगर येथे मद्यधुंद अवस्थेत बालकांना उडवले. या घटनेनंतर नागरिकांनी संशयिताला थांबले. यावेळी कारमध्ये दारू रेचत असल्याचे समोर आल्याने त्याला संतप्त जमावाने चोप दिला. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जखमी मुलांना रुग्णालयात हलवले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :  











Source link

Neena Gupta birthday: प्रेग्नंट नीना गुप्ताला सतीश कौशिकने घातली होती लग्नाची मागणी! वाचा किस्सा…

0
Neena Gupta birthday: प्रेग्नंट नीना गुप्ताला सतीश कौशिकने घातली होती लग्नाची मागणी! वाचा किस्सा…


नीना गुप्ता यांनी आपल्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात सतीश कौशिक यांच्याशी संबंधित एक खुलासा केला होता. यात त्यांनी म्हटले होते की, मी गरोदर असताना माझा जवळचा मित्र आणि अभिनेता सतीश कौशिकने आपल्याला लग्नाची मागणी घातली होती. सतीश कौशिक यांनी लग्नाआधीच प्रेग्नंट झालेल्या नीना गुप्ता यांना सांगितले होते की, ‘तू काही काळजी करू नका, जर मूल रंगाने काळे असेल, तर ते माझे आहे, असे सांग. आपण लग्न करू. यात कुणाला शंकाही येणार नाही.’ मात्र, नीना गुप्ता यांनी सतीश कौशिक यांची ही ऑफर नाकारली होती.



Source link

Aryan Khan Debut: आर्यन खानच्या डेब्यू प्रोजेक्टला झाली सुरुवात; ‘पापा’ शाहरुख खानने दिलं खास सरप्राईज!

0
Aryan Khan Debut: आर्यन खानच्या डेब्यू प्रोजेक्टला झाली सुरुवात; ‘पापा’ शाहरुख खानने दिलं खास सरप्राईज!


मीडिया रिपोर्ट्सनुसार, २ जून रोजी आर्यन खानने मुंबईतील वरळी येथे शूटिंग सुरू केले आहे. यादरम्यान शाहरुख खानही आपल्या मुलाला चिअर करण्यासाठी पोहोचला होता. रिपोर्टिंगची वेळ सकाळी ७ वाजता होती आणि आर्यन खानला सरप्राईज देण्यासाठी शाहरुख खान ७च्या आधीच सेटवर पोहोचला होता. व्यस्त शेड्यूलमध्येही, शाहरुख खानने या खास दिवशी आपल्या मुलासाठी वेळ काढत त्याला प्रोत्साहन दिले.



Source link

S. P. Balasubrahmanyam : ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवणारे एस. पी. बालासुब्रमण्यम! वाचा…

0
S. P. Balasubrahmanyam : ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवणारे एस. पी. बालासुब्रमण्यम! वाचा…


S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary: कमल हसनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पींच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले. याशिवाय सलमान खान पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली. ४ जून १९४६ रोजी आंध्र प्रदेशातल्या, नेल्लोर येथील मूलपेट मेहुआमध्ये एस. पी. बालासुब्रमण्यम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरिकथा कलाकार होते. हरिकथा हा आंध्र प्रदेशातील एक पारंपरिक कला प्रकार असून, यात कथा, कविता, नृत्य, नाटक अशा सगळ्या कला यात अंतर्भूत असतात. धार्मिक कथा या कलाप्रकारातून सादर केल्या जातात. एस. पी. बालासुब्रमण्यम यांचे वडील याच नाटकांतून काम करायचे. एस. पी. बालासुब्रमण्यम यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी असून, त्यातील एक बहिण एस.पी.शैलजा यासुद्धा गायिका आहेत.



Source link

Ashok Saraf Birthday: बँकेची नोकरी ते अभिनय क्षेत्र; असा सुरू झालेला अशोक सराफ यांचा फिल्मी प्रवास!

0
Ashok Saraf Birthday: बँकेची नोकरी ते अभिनय क्षेत्र; असा सुरू झालेला अशोक सराफ यांचा फिल्मी प्रवास!


सध्याच्या काळात नोकरी सोडून व्यवसायाकडे वाटचाल केल्याचे किस्से सर्रास पाहायला मिळतात. मात्र, ८०-९०च्या दशकात, सरकारी नोकरी वगळता प्रत्येकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा धोका पत्करत नव्हता. मात्र, अभिनेते अशोक सराफ यांनी हा पराक्रम केला. अभिनय कारकिर्दीपूर्वी अशोक सराफ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये काम करायचे. सुशिक्षित कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या वडिलांना त्यांना सरकारी नोकरी करताना पाहायचे होते. अशोक सराफ यांनी वडिलांचा आदेश पाळला आणि नोकरी देखील मिळवली. मात्र, अभिनयाचं वेड त्यांना बालपणापासूनच होतं. त्यामुळे नोकरीसोबतच अशोक सराफ रंगभूमीशी देखील जोडले गेले. यादरम्यान, आपल्या अभिनय कौशल्यात सुधारणा करण्याबरोबरच, अशोक सराफ यांनी नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.



Source link