Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3026

Filmfare Award: अभिनेत्याने फिल्मफेअर ट्रॉफीने बनवलं चक्क वॉशरुमचं हँडल, स्वत:च केला खुलासा

0
Filmfare Award: अभिनेत्याने फिल्मफेअर ट्रॉफीने बनवलं चक्क वॉशरुमचं हँडल, स्वत:च केला खुलासा



Naseeruddin Shah: पुरस्कारांना ते गांभीर्याने घेत नाहीत. या पुरस्कारांमध्ये पक्षपात असतो, म्हणूनच असे पुरस्कार जिंकल्यानंतरही त्यांना फारसं महत्त्व देत नाहीत.



Source link

Dadar Abhimaan Geet: सुखाचा किनारा! दादरचं दर्शन घडवणारं सुयश टिळकचं गाणं पाहिलत का?

0
Dadar Abhimaan Geet: सुखाचा किनारा! दादरचं दर्शन घडवणारं सुयश टिळकचं गाणं पाहिलत का?



Suyash Tilak: राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते “दादर अभिमान गीत” सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आले.



Source link

Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

0
Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार



Actress Sulochana Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे ४ जून रोजी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.



Source link

Me Honar Super Star:पुण्याच्या सई आणि शरयूने जिंकला ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’चा किताब

0
Me Honar Super Star:पुण्याच्या सई आणि शरयूने जिंकला ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’चा किताब


स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. सागर आणि दिव्येश, झीरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी, सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत पिंपरी पुणे येथील सई आणि शरयू यांनी बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले जळगावचे सागर आणि दिव्येश. तृतीय क्रमांकाचा मान कल्याणच्या झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि कराडच्या डी टू डी क्वीन्स ग्रुप यांना विभागून देण्यात आला. तर श्रीमयी सूर्यवंशीला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. महाअंतिम सोहळ्यातील विजेत्या सई आणि शरयू यांना पाच लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. या खास सोहळ्यात सई आणि शरयूला शुभविवाह मालिकेतील भूमीनेही साथ दिली होती.



Source link

पडद्यावरील आई गेली! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली

0
पडद्यावरील आई गेली! मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली



ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री सुलोचना दिदी उर्फ सुलोचना लाटकर यांचे (वय ९५ , कला कारकीर्द ७० वर्ष) यांचे दादर येथे आज सायंकाळी निधन झाले.

सुलोचना ताई यांची कारकिर्द पाहता, सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई त्यांनी पडद्यावर उत्तमपणे वठवली. ती असंख्य रसिकांना भावली.

मराठी चित्रपटसृष्टी गाजवली

सुलोचना दिदींचे अनेक चित्रपट खूपच गाजले. 1953-54 मध्ये सुलोचना यांचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे सिनेमे खूप गाजले. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले.

मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

सुलोचना दिदींचे काही खास चित्रपट

सुलोचना दिदींचे मोतीलाल यांच्या बरोबरचा ‘मुक्ती’ हा चित्रपटही गाजला. त्यानंतर त्यांनी सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार यांच्या सोबतही काम केले. नायिका म्हणून त्यांनी 30 ते 40 चित्रपट केले असतील. ‘दिल देके देखो’ या 1959 मधील सिनेमात त्यांनी पहिल्यांदा आईची भूमिका साकारली.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

त्यानंतर 1995 पर्यंत त्यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांच्या ‘आई’ची भूमिका वठवली. मराठीत त्यांनी 50, तर हिंदीत 250 सिनेमे केले. सुलोचना दीदींना 1999 मध्ये ‘पद्मश्री’, तर 2009 मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.



Source link

Actress Sulochana Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

0
Actress Sulochana Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास



Actress Sulochana Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं आज मुंबईतील रुग्णालयात निधन झालं आहे. त्यामुळं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.



Source link

सातारा: प्रतापसिंहनगरात भंगार व्यावसायिक विक्रम पैलवान यांच्यावर जीवघेणा हल्ला | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा: दत्ता जाधव यांचा मुलगा लल्लन व त्याच्या सहा साथीदारांनी भंगार व्यावसायिक विक्रम वाघमारे उर्फ विक्रम पैलवान याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.३) रात्री कोरेगाव – प्रतापसिंहनगर मार्गावर घडली. यात सुदैवाने विक्रम पैलवान बचावला. त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी जुनी भांडणे आणि वर्चस्ववादातून हा हल्ला झाला असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये ३ ते ४ वर्षापासून संघटीत गुन्हेगारी कायदा मोक्का अंतर्गत कैदेत असलेल्या लल्लनला एक महिन्यापूर्वी जामीन मिळाला. तो बाहेर येण्याआधीच त्याच्या साथीदारांनी त्याचे सोशल मीडियावर स्टेटस् व्हायरल केले होते.
शनिवारी रात्री विक्रम पैलवान प्रतापसिंहनगरकडे जात असताना लल्लन व त्याच्या सहा साथिदारांनी विक्रमला अडविले. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यातून लल्लन व त्याच्या साथिदारांनी विक्रम पैलवानच्या मानेवर, हातावर, पाठीत कोयत्याने वार केले. त्यानंतर लल्लन व त्याचे साथीदारांनी तेथून पळ काढला. दरम्यान, विक्रमने ही घटना मित्रांना सांगितली. मित्रांनी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सातारा शहर पोलिसांनी लल्लन व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. तो व त्याचे साथीदार फरार आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रतापसिंहनगर मध्ये सद्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दत्ता जाधव व त्याचा मुलगा लल्लन याची दहशत मोडीत काढत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर प्रतापसिंहनगर व परिसरात शांतता होती. या घटनेनंतर प्रतापसिंहनगर मध्ये शांतता रहावी, अशी मागणी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा 











Source link

Rushikant Shinde: पक्षांतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेत प्रवेश; ऋषिकांत शिंदे यांचा खुलासा | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी पक्षात असणारी गद्दारी व अंतर्गत असणारे मतभेद, समन्वयाचा अभाव व गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत माझा पक्षांतर्गतच कुरघोड्यांमुळे जाणीवपूर्वक केलेला पराभव. या पार्श्वभूमीवर मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते, माथाडी कामगारांचे ज्येष्ठ नेते ऋषिकांत शिंदे (Rushikant Shinde) यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना केला.

राष्ट्रवादीचे नेते ऋषिकांत शिंदे (Rushikant Shinde) हे आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे पडद्यामागचे अदृश्य शक्ती म्हणून उभे राहिलेले ऋषिकांत शिंदे यांची सातारा जिल्ह्यातील व नवी मुंबई राष्ट्रवादी पक्षात ओळख आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक लढाया जिंकण्यामध्ये ऋषिकांत शिंदे यांचा वाटा आहे. यातच जावळी तालुक्यात शशिकांत शिंदेंना १० वर्षांपासून आमदार करण्यात ऋषिकांत शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे. ऋषिकांत शिंदे यांनी अचानक राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा खांद्यावर घेत जय महाराष्ट्रचा नारा दिला. या सर्व घडामोडीमुळे आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादीला जोरदार धक्का मानला जात आहे. आगामी काळातील राष्ट्रवादी पक्षासह व भविष्यातील सगळ्या निवडणुकीची समीकरणे बदल्याची शक्यता आहे.

दैनिक पुढारीने नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले ऋषिकांत शिंदे यांचे संपर्क साधला असता रूषिकांत शिंदे म्हणाले मी जिल्हा परिषद कुडाळ गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर उभे होतो. मात्र, पक्षांतर्गत गद्दारीमुळे व कुरघोड्याचे राजकारणामुळे पराभव केला.
जिल्हा परिषद कुडाळ गटात राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर माझा पराभव झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांना न्याय दिला गेला नाही. जनतेला न्याय दिला गेला नाही. नवी मुंबईमध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. त्या कामांना न्याय देण्यासाठी माथाडी कामगारांना खऱ्या अर्थाने त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नपूर्तीसाठी मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे ऋषिकांत शिंदे यांनी सांगितले.

जावळी तालुक्यातील याचे पडसाद उमटले आहेत. ऋषिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना नवा पक्ष नवी दिशा मिळाल्यामुळे जावळी तालुक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे शशिकांत शिंदे यांचा शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांच्याशी कोरेगाव तालुक्यात संघर्ष सुरू आहे. आता त्याच गटात ज्येष्ठ बंधू ऋषिकांत शिंदे यांचा प्रवेश झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

हेही वाचा 











Source link

Satyaprem Ki Katha: ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर

0
Satyaprem Ki Katha: ठरलं! ‘या’ दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर


समीर विद्वांस यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे नाव आधी’सत्यनारायण की कथा’ असे होते, परंतु त्याच्या शीर्षकावरून झालेल्या वादामुळे त्याचे नाव’सत्यप्रेम की कथा’ असे ठेवण्यात आले आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा हा चित्रपट२९ जून२०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर’ सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन’आशिकी३’, ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. तर, कियारा अडवाणी’सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाव्यतिरिक्त’गेम चेंजर’ चित्रपटात दिसणार आहे.



Source link

नवचैतन्य हायस्कूल गोंदवले येथे प्राचार्य पदी सुधीर अहिवळे यांची निवड

0
नवचैतन्य हायस्कूल गोंदवले येथे प्राचार्य पदी सुधीर अहिवळे यांची निवड

फलटण : नवचैतन्य हायस्कूल गोंदवले बुद्रुक येथे सुधीर अहिवळे यांची पदोन्नती मिळून प्राचार्य पदी नेमणूक झाली आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अहिवळे यांची निवड करण्यात आली आहे.

अहिवळे यांनी शिक्षक म्हणून कामाची सुरुवात नवचैतन्य हायस्कूल मधून केली. त्यांनतर त्यांनी आसू, पवारवाडी, म्हसवड, फलटण शहरातील नावाजलेले फ. ए. सो. मानबिंदू असलेले मुधोजी माध्यमिक हायस्कूल फलटण याठिकाणी उपप्राचार्य म्हणून उत्तम प्रकारे काम केले आहे. मालोजी राजे शेती विद्यालय फलटण येथे अहिवळे यांनी उपप्राचार्य म्हणून एक उत्तम प्रशासक म्हणून आपल्या कामाच्या ठसा उमटविला आहे. सहकाऱ्यांना बरोबर होऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम व शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. अहिवळे यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात चांगले काम केले.