Friday, September 25, 2026
Homeसातारासातारा: प्रतापसिंहनगरात भंगार व्यावसायिक विक्रम पैलवान यांच्यावर जीवघेणा हल्ला | पुढारी

सातारा: प्रतापसिंहनगरात भंगार व्यावसायिक विक्रम पैलवान यांच्यावर जीवघेणा हल्ला | पुढारी

[ad_1]








सातारा, पुढारी वृत्तसेवा: दत्ता जाधव यांचा मुलगा लल्लन व त्याच्या सहा साथीदारांनी भंगार व्यावसायिक विक्रम वाघमारे उर्फ विक्रम पैलवान याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.३) रात्री कोरेगाव – प्रतापसिंहनगर मार्गावर घडली. यात सुदैवाने विक्रम पैलवान बचावला. त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी जुनी भांडणे आणि वर्चस्ववादातून हा हल्ला झाला असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये ३ ते ४ वर्षापासून संघटीत गुन्हेगारी कायदा मोक्का अंतर्गत कैदेत असलेल्या लल्लनला एक महिन्यापूर्वी जामीन मिळाला. तो बाहेर येण्याआधीच त्याच्या साथीदारांनी त्याचे सोशल मीडियावर स्टेटस् व्हायरल केले होते.
शनिवारी रात्री विक्रम पैलवान प्रतापसिंहनगरकडे जात असताना लल्लन व त्याच्या सहा साथिदारांनी विक्रमला अडविले. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यातून लल्लन व त्याच्या साथिदारांनी विक्रम पैलवानच्या मानेवर, हातावर, पाठीत कोयत्याने वार केले. त्यानंतर लल्लन व त्याचे साथीदारांनी तेथून पळ काढला. दरम्यान, विक्रमने ही घटना मित्रांना सांगितली. मित्रांनी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सातारा शहर पोलिसांनी लल्लन व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. तो व त्याचे साथीदार फरार आहेत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रतापसिंहनगर मध्ये सद्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दत्ता जाधव व त्याचा मुलगा लल्लन याची दहशत मोडीत काढत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर प्रतापसिंहनगर व परिसरात शांतता होती. या घटनेनंतर प्रतापसिंहनगर मध्ये शांतता रहावी, अशी मागणी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments