Friday, July 17, 2026
Home Blog Page 2806

मदर तेरेसा यांचा जन्म, स्वातंत्र्यसैनिक-अभिनेते ए.के. हंगल यांचा स्मृतीदिन; आज इतिहासात

0
मदर तेरेसा यांचा जन्म, स्वातंत्र्यसैनिक-अभिनेते ए.के. हंगल यांचा स्मृतीदिन; आज इतिहासात


26th August In History :  आज इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भारतरत्न, समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. लेखक, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. स्वातंत्र्यसैनिक, अभिनेते  ए. के. हंगल यांचा आज स्मृतीदिन आहे. 

1910 : भारतरत्न, समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म

भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित करण्यात आलेल्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा आज जन्मदिन. मदर तेरेसा यांचे मूळ नाव  Anjezë Gonxhe Bojaxhiu असे आहे. त्या भारतीय रोमन कॅथलिक नन होत्या. 1948 मध्ये त्यांनी स्वेच्छेने भारतीय नागरिकत्व स्वीकारले. ऑट्टोमन साम्राज्याचा एक भाग असलेल्या स्कोप्जे येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या 18 व्या वर्षी त्या आयर्लंडला गेल्या. त्यानंतर पुढे भारतात आल्या आणि इथले नागरिकत्व स्वीकारून भारतीय झाल्या. 

मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. 1982 मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने 37 लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या.

त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते असे त्यांनी म्हटले. 

1922: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक ग. प्र. प्रधान यांचा जन्म

गणेश प्रभाकर प्रधान हे  समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. महाराष्ट्राला ते ग. प्र. प्रधान या नावाने परिचित होते. ग. प्र. प्रधान हे 18 वर्ष आमदार होते. त्यातील दोन वर्ष ते विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले आहे. ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.

पुण्यात विद्यार्थिदशेतच ते समाजवादी नेते ना. ग. गोरे आणि एस.एम. जोशी यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी 13 महिने येरवड्याच्या तुरुंगात जावे लागले. त्यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते.

1944:  लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म

सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक अनिल अवचट यांचा आज जन्मदिन. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी पुण्यात “मुक्तांगण” हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. तसेच पश्चिम भारताच्या पातळीवर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केले आणि महिलांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. मुक्तांगणाची गोष्ठ आणि गर्द ऐसी ही दोन पुस्तके त्यांनी मुक्तांगण आणि तेथील रुग्णांचे अनुभव यावर लिहिली आहेत. या सामाजिक कार्यासाठी त्यांना 2013 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. 

1969 मध्ये अनिल अवचट यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले होते. त्यांची 22 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली. अवचट यांच्या सृष्टीत..गोष्टीत या कथासंग्रहाला मराठी बाल साहित्य पुरस्कार श्रेणीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. अवचट यांनी मजूर, अनुसूचित जाती,  भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी लिखाण केले. 

1948 : नाटककार आणि पत्रकार कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे मराठी नाटककार होते. पारतंत्र्याच्या काळात पत्रकार म्हणून ते आपले विचार ‘केसरी’च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते.  पण त्याच काळात खाडिलकरांनी ‘स्वयंवर’ ‘मानापमान’ सारखी ललित नाटके लिहिली. ते ‘नाट्यचार्य खाडिलकर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. 

कृष्णाजी खाडिलकर यांनी केसरी वृत्तपत्र सोडल्यानंतर लोकमान्य या वृत्तपत्रात काम सुरू केले. मात्र,  ‘लोकमान्य’ दैनिकाशी असलेला आपला संबंध एक सपाट्यासरशी तोडला आणि ते बाहेर पडले. लोकमान्यांच्या पश्चात नव्या परिस्थितीत महात्मा गांधीजीचे राजकारण हे आपल्या गुरूच्या विचारांची पुढली पायरी आहे. हे त्यांनी मान्य केले. त्यांनी मुंबईत जानेवारी 1924 मध्ये ‘नवाकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. खाडिलकर यांनी महात्मा गांधी यांचे नेतृत्व मान्य केले असले तरी ते गांधीवादी झाले नाही. गांधीवादाचे कर्मकांड त्यांनी स्वीकारले नाही.

2012 : स्वातंत्र्यसैनिक, अभिनेते  ए. के. हंगल यांचे निधन

हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चरित्र अभिनेते अवतार किशन हंगल अर्थात ए. के. हंगल यांचा आज स्मृतीदिन. हंगल यांनी 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. ‘नमक हराम’, ‘शोले’, ‘शौकीन’, ‘आइना’ असे अनेक त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. इतना सन्नाटा क्यों है भाई?, या संवादातून शोलेमधील रहीम चाचाची त्यांची भूमिका अजरामर झाली. 

ए. के. हंगल यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला होता. पेशावरमध्ये जन्म झालेल्या ए. के. हंगल यांनी 1929 ते 1947 दरम्यान देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. यादरम्यान त्यांना तीन वर्षे कराची तुरुंगात काढावी लागली. यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. हंगल यांना सुरुवातीपासून अभिनयाची आवड होती. 

हौशी रंगभूमीवर काम करीत असलेले हंगल यांना चित्रपटांमधून काम करण्याची फारशी इच्छा नव्हती. परंतु, परिस्थितीमुळे त्यांना चित्रपट जगतात यावे लागले. रंगभूमीशी जवळीक असणा-या हंगल यांनी अनेक नाटकं लिहून त्यामध्ये भूमिकाही केल्या आहेत. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेशी ते फार पूर्वीपासून जोडलेले होते. अभिनयासोबत त्यांनी सक्रिय राजकारणातही सहभाग घेतला. ए.के. हंगल हे कम्युनिस्ट पक्षाचे अखेरपर्यंत सभासद होते. 

2006 मध्ये ए.के. हंगल यांना चित्रपट, रंगभूमी क्षेत्रातील योगदानासाठी  पद्मभूषण या नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. द लाइफ अ‍ॅण्ड टाइम ऑफ ए. के. हंगल हे त्यांचे आत्मचरित्र इंग्रजीत प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले आहे. 

इतर महत्त्वाच्या घटना : 

1303 : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
1768: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.
1927: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.
1928 : हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म
1972: जर्मनीतील म्युनिच येथे 20 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.



Source link

Madhur Bhandarkar: ऐश्वर्या राय प्रेग्नंट असताना मधूर भांडारकर होता नैराश्यामध्ये, काय होते नेमके कारण?

0
Madhur Bhandarkar: ऐश्वर्या राय प्रेग्नंट असताना मधूर भांडारकर होता नैराश्यामध्ये, काय होते नेमके कारण?


‘फॅशन’, ‘पेज 3’, ‘हिरोईन’ अशा सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक म्हणजे मधूर भांडारकर. तो बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याने त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिलेल्या अभिनेत्री आज बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत. आज २६ ऑगस्ट रोजी मधूर भांडारकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…



Source link

Political Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी

0
Political Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी



Political Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी

मराठी संस्कृतीत मंगळागौर साजरी करण्याची श्रावणातली परंपरा फार जुनी आहे. पण केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवा या चित्रपटानं त्या मंगळागौरीच्या परंपरेला नवं ग्लॅमर लाभलं आहे. आणि ही मंगळागौर काही राजकीय कुटुंबातील महिला एकत्र येऊन साजरी करत असतील, तर त्याचं ग्लॅमर आणखी वाढतं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची नातसून अंकिता निहार ठाकरे यांच्या घरच्या मंगळागौरीसाठी शर्मिला राज ठाकरे, सुनेत्रा अजित पवार, वृषाली श्रीकांत शिंदे आणि उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे यांनी झिम्माफुगडीचा आनंद लुटला.



Source link

Bachchu Kadu : Janta Dal Secular च्या कार्यालयात बच्चू कडूंच्या प्रहारचं कार्यालय ABP Majha

0
Bachchu Kadu : Janta Dal Secular च्या कार्यालयात बच्चू कडूंच्या प्रहारचं कार्यालय ABP Majha



<p>Bachchu Kadu : Janta Dal Secular च्या कार्यालयात बच्चू कडूंच्या प्रहारचं कार्यालय ABP Majha</p>



Source link

Navi Mumbai: पैशांसाठी आईनेच पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार!

0
Navi Mumbai: पैशांसाठी आईनेच पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार!


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावल्याने आणि तिला एक लाख रुपयांची गरज होती. यानंतर या महिलेने दलालाशी संपर्क साधला. त्यावेळी दलालाने आरोपी महिलेला तिच्या अल्पवयीन मुलीने शरीरसंबंध केल्यास १ लाख रुपये मिळतील, असे सांगितले. यानंतर आरोपी महिलेने तिच्या पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर दलालने अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या ग्राहकाचा शोध सुरू केला. या संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला. तसेच बनावट ग्राहकाला दलालशी संपर्क साधायला सांगितला.



Source link

शरद पवार जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा रमतात; शरद पवारांचे कोल्हापूरवर एवढं प्रेम का?

0
शरद पवार जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा रमतात; शरद पवारांचे कोल्हापूरवर एवढं प्रेम का?


कोल्हापूर: माझी आई कोल्हापूरची, कोल्हापूरच्या मातेच्या पोटी जन्माला येण्याचं मला भाग्य मिळालं… हे वक्तव्य आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांचं. कोणत्याही चांगल्या कामाला सुरूवात ही कोल्हापूरपासून (Sharad Pawar Kolhapur Speech) करण्याची शरद पवारांची परंपरा. कोल्हापूर ही शौर्याची नगरी, स्वाभिमानाची नगरी असल्याचं पवारांनी सातत्याने त्यांच्या भाषणातून सांगितलंय. त्यामुळेच की काय कोणत्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा ही कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारापासून केली जाते. 

आई शारदाबाई पवार कोल्हापूरच्या 

शरद पवार आणि कोल्हापूर हे संबंध काही नवीन नाहीत, शरद पवारांना घडवणाऱ्या त्यांच्या आई शारदाबाई पवार (Sharadabai Pawar) या मूळच्या कोल्हापूरच्या. त्यामुळे शरद पवारांना कोल्हापूरविषयी राजकारणापलिकडचं प्रेम. शरद पवारांच्या आई शारदाबाई पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 रोजी कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात गोलिवडे या गावी झाला. जन्मच शाहूंच्या कोल्हापुरातील (Kolhapur Shahu Maharaj) असल्याने लहानपणापासूनच त्यांचा ओढा हा समाजकारणाकडे.

पुढे मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या पण बारातमतीत स्थायिक गोविंदराव पवार (Govindrao Pawar) यांच्याशी त्यांचं लग्न झालं. शारदाबाई पवार या  1938 साली पुण्याच्या लोकल बोर्डात निवडून आल्या आणि पुढे त्यांनी 14 वर्षे यामध्ये काम केलं. आपण केवळ सात दिवसांचे असताना आपल्या आईने लोकल बोर्डाच्या मिटिंगला नेल्याचं शरद पवार त्यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या आत्मचरित्रात सांगतात. 

काही वर्षांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार हे त्यांच्या आजोळी म्हणजे गोलिवडे या ठिकाणी गेले होते. त्यावेळी मिश्किल टिप्पणी करताना ते म्हणाले होते की, मामाच्या गावची मुलगी करण्याची इच्छा अपुरी राहिली. 

शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा 

कोल्हापूर नगरी ही पुरोगामी नगरी असून या नगरीने देशाला दिशा दाखवल्याचं शरद पवार म्हणतात. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जे कार्य केले ते आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शवत असंच आहे. शाहू महाराजांनी जाती आणि धर्माच्या पलिकडे जाऊन शिक्षण, शेती, आरोग्य आणि सर्वच क्षेत्रात अत्यंत भरीव असं कार्य केलं. शरद पवार आपल्या भाषणात वारंवार याचा दाखला देतात. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनाही मोठी मदत केली. बाबासाहेबांच्या शेतीविषयक विचारांमध्ये किंवा पाण्यासंबंधी धोरणांवर शाहू महाराजांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे असं एकदा शरद पवारांनी म्हटलं होतं. 

शरद पवारांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ज्या विचारांवर उभी आहे त्यावर शाहू महाराजांच्या कार्याचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच शरद पवारांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच शरद पवार कोल्हापुरातील राजकारणावरही स्वतः बारकाईने लक्ष ठेऊन असतात.

शरद पवारांच्या भगिनी कोल्हापूरच्या 

शरद पवार यांच्या भगिणी सरोज पवार या शेतकरी कामगार पक्षाचे लढवय्ये नेते एन डी पाटील (  Dr. N D Patil) यांच्या पत्नी. शरद पवारांच्या आई शारदाबाईंचे आपल्या पुत्राप्रमाणेच जावयावरही प्रेम. शरद पवार यांचे राजकारण आणि एन डी पाटील यांचे राजकारण एकदम विरोधी टोकाचे. एनडी पाटील हे शेकापचे कट्टर तर शरद पवार हे काँग्रेस विचारधारेचे. या दोघांच्या राजकारणाची सुरूवातच एकमेकांच्या विरोधातून झाली. पण यांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे पुरोगामी विचार. त्यामुळेच राजकारणात या दोघांच्या भूमिका काहीही असल्या तरी त्यांनी नातेसंबंधात राजकारण कधीही आणल्याचं दिसत नाही.

लोकसभेचा पहिला उमेदवार कोल्हापुरातील 

शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर त्यांना कोल्हापुरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यावेळचे नेते सदाशिवराव मंडलिक आणि निवेदिता माने यांनी शरद पवारांची साथ दिली. तसेच या जिल्ह्यातून अनेक नेत्यांनीही साथ दिली अन् त्या नेत्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं काम हे कोल्हापुरातील जनतेने केलं. त्यामुळे शरद पवारांकडून लोकसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करताना पहिलं नाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवाराचे (Kolhapur Loksabha Election) घोषित केलं जायचं. 

मिरज दंगलीवेळी हसन मुश्रीफांचा उल्लेख 

सन 2008-09 सालच्या दरम्यान सांगलीतील मिरज या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगल उसळली. त्याचा परिणाम शेजारच्या कोल्हापूरवरही झाला. त्या वर्षी झालेल्या दंगलीत कोल्हापुरात पहिल्यांदाच भाजपचे आमदार निवडून आले. आजूबाजूच्या सांगली आणि बेळगाव परिसरातही काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. पण कागलमधून हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) आपली आमदारकी कायम ठेवली. त्यावेळी राज्यातील विधानसभा निवडणुकीतील चांगली गोष्ट काय असा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले होते की, एवढ्या मोठ्या दंगलीनंतरही राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हसन मुश्रीफ निवडून आले ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. 

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील शरद पवारांचे विश्वासू नेते… त्यांना काम करण्याची पूर्ण मोकळीकता. पण मधल्या काळात हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत मुश्रीफांनी अजित पवारांसोबत भाजपसोबत जाणं पसंद केलं आणि स्वतःला ईडीच्या रडारपासून तात्पुरतं का असेना बाजूला केलं. त्यावर शरद पवारांनी कोल्हापुरात येऊन त्यांच्यावर जाहीर टीका केली. 

एकंदरीत शरद पवार म्हणजे कप्लिट कोल्हापुरी… आणि विषय एकदम हार्ड. शरद पवार ज्या ज्या वेळी कोल्हापुरात येतात त्या त्या वेळी ते त्यांच्या आठवणीत रमतात.

ही बातमी वाचा: 

 



Source link

Sharad Pawar: कोल्हापुरात शरद पवार कडाडले; विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरले

0
Sharad Pawar: कोल्हापुरात शरद पवार कडाडले; विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरले


Sharad Pawar Kolapur Speech: कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी चांद्रयान-३, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महागाईसह विविध मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहित पवार, शशिकांत शिंदे, फौजीया खान, रोहित आर आर पाटील यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.



Source link

NCP Crisis : अजित पवारांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश?; बड्या नेत्याचं सूचक विधान

0
NCP Crisis : अजित पवारांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश?; बड्या नेत्याचं सूचक विधान


येड्याच्या सरकारकडून अपेक्षाभंग

एकनाथ शिंदे (E), देवेंद्र फडणवीस (D) आणि अजित पवार (A) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ‘येड्या’चं (EDA) सरकार अशी उपमा पटोले यांनी दिली. या सरकारनंही जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. शेतकरी लुटला जात आहेत, शेतमालाला भाव नाही, पीक येताच बाजारात भाव पाडले जातात. यामुळं लोक भाजपला कंटाळले आहेत, असा दावा पटोले यांनी केला.



Source link

Sharad Pawar vs Ajit Pawar : पवारांचं आधी वक्तव्य, नंतर यू-टर्न; दादा म्हणतात…

0
Sharad Pawar vs Ajit Pawar : पवारांचं आधी वक्तव्य, नंतर यू-टर्न; दादा म्हणतात…


Sharad Pawar : अजितदादा नेमके कुणाचे? राष्ट्रवादीत फूट पडलीय का नाही? शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या यू टर्नमुळे सगळेच संभ्रमात



Source link

Mumbai Sindhudurg Flight : कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! १ सप्टेंबरपासून मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमानसेवा

0
Mumbai Sindhudurg Flight : कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! १ सप्टेंबरपासून मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमानसेवा


‘येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरुळीत सुरू व्हावी,’ अशी विनंती चव्हाण यांनी बैठकीत केली. शिंदे यांनी कोकणवासीयांच्या त्रासाची दखल घेऊन ही सेवा सुरू करण्याचं आश्वासन दिलं. एअर अलायन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत दर आठवड्याला विमान सेवा दिली जाईल, असं आश्वासन केद्रीय मंत्र्यांनी दिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.



Source link