Friday, July 17, 2026
Home Blog Page 2807

Gadar 2 : संसद भवनात दाखवला जाणार सनी देओलचा ब्लॉकबस्टर ‘गदर २’

0
Gadar 2 : संसद भवनात दाखवला जाणार सनी देओलचा ब्लॉकबस्टर ‘गदर २’


चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात…

चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. ‘संसद भवनाच्या कार्यालयातून आम्हाला या संदर्भातील ई-मेल आला आहे. हा खऱ्या अर्थानं मोठा सन्मान आहे, असं ते म्हणाले. तीन दिवसांच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात सहभागी होणार का असं विचारलं असता त्यांनी असमर्थता दर्शवली. ‘तातडीनं दिल्लीला जाणं जरा अवघड आहे, पण मी उद्या कदाचित तिकडं जाण्यासाठी निघेन. उपराष्ट्रपती देखील चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत असं मला कळलंय, असं शर्मा यांनी सांगितलं.



Source link

Milind Safai: प्रसिद्ध मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन; ‘या’ आजाराशी झुंज ठरली अपयशी!

0
Milind Safai: प्रसिद्ध मराठी अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन; ‘या’ आजाराशी झुंज ठरली अपयशी!


मिलिंद सफई यांनी ‘प्रेमाची गोष्ट’, ‘लकडाऊन’, ‘मेकअप’, ‘पोस्टर बॉईज’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तर, मालिका विश्वातही ते प्रचंड सक्रिय होते. ‘पुढचं पाऊल’, ‘सांग तू आहेस का?’, ‘आई कुठे काय करते’, ‘१०० डेज’ या मालिकांमध्ये ही त्यांनी काम केले होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. मात्र, बाबांच्या भूमिकेत त्यांना विशेष पसंती मिळाली. त्यांच्या निधनाने अवघ्या मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.



Source link

Sharad Pawar Full PC : अजित पवार आमचे नेते असं मी म्हणालो नाही, शरद पवार Uncut

0
Sharad Pawar Full PC : अजित पवार आमचे नेते असं मी म्हणालो नाही, शरद पवार Uncut


Sharad Pawar : अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही; सुप्रिया सहजपणे बोलत असतील तर राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही : शरद पवार



Source link

शेतकर्‍यांच्या हिताआड येणार्‍यांना पाठिंबा नाही : शरद पवार | पुढारी

0









सातारा: पुढारी वृत्तसेवा: दुष्काळी परिस्थितीमुळे बीड, नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे चहरे सुकले आहेत. तरुण अस्वस्थ आहेत. त्याचप्रमाणे माण तालुक्याचीही परिस्थिती आहे. या जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये राज्याची सत्ता आहे, त्यांची आहे. मात्र, त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला सरकार तयार नाही. जो कष्टकरी, शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येतो, त्याला आमचा पाठिंबा नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सरकारला फटकारले.

आज (दि.२५) खासदार शरद पवार माण तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते. बारामतीहून ते वाहनाने फलटणमार्गे दहिवडी येथे पोहोचले. दरम्यान, फलटण येथे महाविकास आघाडीच्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर ते दहिवडीकडे रवाना झाले. मोगराळे घाटातून पवार यांची माण तालुका युवक राष्ट्रवादीने जल्लोषी रॅली काढली.

दहिवडी येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार, आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा 











Source link

अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही : शरद पवार

0


सातारा : अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन शरद पवार (Sharad Pawar) यांनी घुमजाव केलं आहे. “अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही,” असं शरद पवार म्हणाले. सुप्रिया (Supriya Sule) त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. साताऱ्यात (Satara) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.

शरद पवार हे आमचेच नेते आहेत. कोणी वेगळा निर्णय घेतला तर पक्षात फूट पडली असं म्हणायचं काही कारण नाही, असं शरद पवार यांनी आज सकाळी बारामतीमधील (Baramati) पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन एकच खळबळ उडाली होती. शिवाय संभ्रमावस्था देखील निर्माण झाली होती. 

‘सुप्रिया सहजपणे बोलत असतील तर राजकीय अर्थ काढू नये’

शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर (Kolhapur Visit) आहेत. बारामतीहून साताऱ्यात पोहोचल्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना शरद पवार म्हणाले की, “अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.” “आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत,” असं शरद पवार यानी स्पष्ट केलं.

एकदा संधी दिली, परत संधी द्यायची नसते, मागायची नसते : शरद पवार

“फूट म्हणजे एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची नसते,” असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार हे पक्षात परत येतील का प्रश्नाचं अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं.

दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल अजित पवार यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी ‘नो कमेंट्स’ असं म्हणत कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला.   

बावनकुळे म्हणतात शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच भाजपला पाठिंबा देतील?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरुन शरद पवार यांनी अतिशय खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली. “माझी त्यांची फार ओळख नाही. अलिकडेच त्यांना ओळखतो. साधारण या पदावर राहणाऱ्या व्यक्तीला काहीतरी तारतम्य ठेवायची एक कल्पना असते. पण ते ज्या पद्धतीने बोलतायत, की आम्ही लोकांनी यांच्यावर टीका करु नये, त्यांच्यावर टीका करु नये. उद्या त्यांच्या सहकाऱ्यांच्यावर टीका केली तर कदाचित ते म्हणू शकतात. पण जे आमच्या पक्षातील लोक जे सोडून गेले त्यांच्यावर टीका केली तर याची चिंता बावनकुळेंना का वाटते कळत नाही. त्याबाबत यांचं मार्गदर्शन आम्ही मागितलं नाही. याचा अर्थ ते जे बोलतात त्यामध्ये तारतम्य नाही, ज्याच्या बोलण्यात तारतम्य नाही, त्याला फारसं एन्टरटेंट करु नये,” असं शरद पवार म्हणाले.

VIDEO : Sharad Pawar Full PC : अजित पवार आमचे नेते असं मी म्हणालो नाही, शरद पवार Uncut

संबंधित बातमी

अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट पडली म्हणायचं कारण नाही : शरद पवार



Source link

Malaika Arora: मलायकाशी ब्रेकअप करून अर्जुन कपूरने धरला ‘या’ अभिनेत्री हात? नेमकं सत्य काय?

0
Malaika Arora: मलायकाशी ब्रेकअप करून अर्जुन कपूरने धरला ‘या’ अभिनेत्री हात? नेमकं सत्य काय?


मलायका आणि अर्जुन जवळपास गेल्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सोशल मीडियावर इतके सक्रिय आहेत की, दररोज त्यांचे बोल्ड आणि रोमँटिक फोटो शेअर करत असायचे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करताना दिसले होते. मात्र, आता त्यांच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी अर्जुन कपूर एकटाच व्हेकेशनचा आनंद घेताना दिसला होता. तर, दुसरीकडे मलायका देखील अर्जुनला सोडून ओरहान अवत्रामणीसोबत धम्माल पार्टी करताना दिसली होती.



Source link

Sharad Pawar Satara Dahiwadi : काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, त्यावर मला काही बोलायचं नाही : पवार

0



<p>Sharad Pawar Satara Dahiwadi : काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, त्यावर मला काही बोलायचं नाही : पवार</p>



Source link

पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ; सरकारनं लक्ष द्यावं अन्यथा भयंकर संकट : शरद पवार 

0


Sharad Pawar : सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. पाण्याअभावी पिकं माना टाकत आहेत. पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस पडत नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चिंता व्यक्त केलीय. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. याकडे सरकारनं तात्काळ लक्ष द्यावं, अन्यथा हे संकट अधिक भयंकर होईल असे शरद पवार म्हणाले. सध्याचे सरकार मात्र, शेतकऱ्यांकडे बघायला तयार नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. ते सातारा जिल्ह्यातीन माणमध्ये बोलत होते. 

15 दिवसात यवतमाळमध्ये 21 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

बीड, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, तरुण अस्वस्थ आहेत. आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्यांना याची आस्था किती आहे हे सांगता येत नाही, असेही पवार म्हणाले. 15 दिवसात यवतमाळमध्ये 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.  कर्जाला कंटाळून या आत्महत्या केल्या आहेत. हे चिन्ह महाराष्ट्रच्या दृष्टीनं चांगलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे हेच माझं धोरण

कधीही कांद्याची एवढी चर्चा झाली नाही तेवढी आता झाली. कांद्याच्या निर्यातीवर सरकारनं मर्यादा आणली आहे. याआधी इतका कर बसवला नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका केली. त्यांना मी सांगितले की मी कधी कांद्यावर कर बसवला नसल्याचे शरद पवार म्हणाले. भाजपचे लोक कांद्याच्या माळ घालून आले. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, कांद्याच्या माळ घाला नाहीतर काही करा मी कांद्यावर कर बसवणार नाही असे शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे हे माझं धोरण असल्याचे शरद पवार म्हणाले. 

शेतकऱ्यांचा अहिताची धोरणे आखलेल्या लोकांना आमची साथ नाही. शेतकरी विरोधी धोरणाला लोकांच्या मदतीनं आम्ही त्याला विरोध करु असे शरद पवार म्हणाले. कांदा, ऊस टोमॅटो या मालावर बंधने नको. त्याचा उत्पादन खर्च बघून दर मिळाला पाहिजे. जर दर मिळाला नाहीतर आपण संघर्ष केला पाहिजे असे शरद पवार म्हणाले. 

मणिपूर, नागालँडमध्ये संघर्ष, पंतप्रधानांनी तिकडं गेलं पाहिजे

सध्या मणिपूर, नागालँडमध्ये संघर्ष सुरु आहे. स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांची धिंड काढली जाते आणि केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेते. पंतप्रधान मोदींनी तिकडे गेलं पाहिज पण ते तिकडे गेले नाहीत, असे शरद पवार म्हणाले. चीनच्या शेजारील राज्य जपली पाहिजेत असे पवार म्हणाले. देशात वेगळं चित्र निर्माण झालं आहे. त्यासाठी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. तुमचे दुःख कमी करण्याऐवजी ते वाढेल कसे याकडे सरकारचे लक्ष असल्याचे पवार म्हणाले.  

सरकारला धडा शिकवला पाहिजे 

पक्ष फोडण्यसाठी केंद्र सरकार काम करत आहे. त्यांच्या विरोधात आता उभे राहिले पाहिजे. त्यांना धडा शिकवला पाहिजे असेही शरद पवार म्हणाले. त्या रस्त्याने आपण जाऊया आणि देशाला दाखवुया की हे लोकांचे राज्य आहे. याचा निर्धार आपण करु. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, असेही शरद पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sharad Pawar On Sugar Export Ban : केंद्र सरकारनं जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली तर….वाचा शरद पवार नेमकं काय म्हणाले?



Source link

Ragini: हिंदीनंतर कार्तिकेय मालवीया गाजवणार मराठी सिनेसृष्टीत; ‘या’ गाण्यातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

0
Ragini: हिंदीनंतर कार्तिकेय मालवीया गाजवणार मराठी सिनेसृष्टीत; ‘या’ गाण्यातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


दिग्दर्शक सचिन कांबळे यांनी आतापर्यंत ‘आपली यारी’, ‘मी नादखुळा’, ‘आपलीच हवा’, ‘चिंतामणी माझा’, ‘माझी ताई’ अशा ५०हून अधिक म्युझिक अल्बमचं दिग्दर्शन केलं आहे. काही गाण्यांची कोरिओग्राफी सुद्धा त्यांनी केली आहे. सई आणि कार्तिकेय हे दोघेही ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिॲलिटी शोमध्ये एकमेकांचे स्पर्धक जरी असले, तरी त्यांची छान मैत्री होती. ‘रागिनी’ गाण्यात देखील त्यांची रिअल बॉंडींग चांगल्याप्रकारे दिसून आली‌ आहे. ‘रागिनी’ हे गाणं आरती पाठक हिने लिहीले असून, गायक मधूर शिंदे आणि गायिका अंशिका चोणकर यांनी गायले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.



Source link

Rang Maza Vegla: आयेशा अखेर इनामदार कुटुंबात येणार! दीपा-कार्तिकचा डाव आता तरी यशस्वी होणार?

0
Rang Maza Vegla: आयेशा अखेर इनामदार कुटुंबात येणार! दीपा-कार्तिकचा डाव आता तरी यशस्वी होणार?


मात्र, आता त्यांच्या या प्लॅनची कुणकुण श्वेताला लागली आहे. सौंदर्या इनामदार इतक्या बदलूच शकत नाहीत, त्या हे सगळं नाटक करत आहेत, असे श्वेताला वाटत आहे. आता ती या प्लॅनमध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न करू शकते. जर, श्वेताने यात हस्तक्षेप केलाच तर कार्तिक आणि दीपाचा हा प्लॅन फसण्याची शक्यता आहे. आता मालिकेत पुढे रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.



Source link