Friday, July 17, 2026
Home Blog Page 2805

Dada Kondke: दादा कोंडकेंचा “ह्योच नवरा पाहिजे” सिनेमा पाहाता येणार घर बसल्या, या दिवशी होणार प्रदर्शित

0
Dada Kondke: दादा कोंडकेंचा “ह्योच नवरा पाहिजे” सिनेमा पाहाता येणार घर बसल्या, या दिवशी होणार प्रदर्शित


दादा कोंडके हे मराठी प्रेक्षकांचे जसे लाडके होते तसे ते बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्याही आवडीचे होते. दादांमधील कल्पकता, सिनेमाचे तंत्र, चित्रपटासाठी कष्ट घेण्याची तयारी हे नेहमीच हिंदी सिनेमातील कलाकारांनाही खुणावत होते. दादा कोंडके यांची अनोखी रोमँटिक कॉमेडी पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. ३ सप्टेंबरला ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ या सिनेमाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. तर या सीझनची सांगता १० सप्टेंबरला ‘आली अंगावर’ या सुपरहिट चित्रपटाने होणार आहे. त्यामुळे येत्या काळात दादा कोंडके यांचे आणखी दोन चित्रपट पाहायला मिळणार असल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.



Source link

Dream Girl 2 Review: आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ कसा आहे? जाणून घ्या रिव्ह्यू

0
Dream Girl 2 Review: आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’ कसा आहे? जाणून घ्या रिव्ह्यू



Dream Girl 2 Review: अभिनेता आयुष्मान खुराना महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाचा रिव्ह्यू…



Source link

साताऱ्याजवळ कारचा भीषण अपघात; जयसिंगपूर येथील एका कुटुंबातील ३ जण ठार | पुढारी

0









कोल्हापूर; सातारा : पुढारी वृत्‍तसेवा मुंबई येथून जयसिंगपूरकडे परतणाऱ्या सव्वाखंडे कुटुंबावर आज (शनिवार) सकाळी काळाचा घाला पडला. सातार्‍याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

शशिकांत सव्वाखंडे (वय 50), मुलगा निखिल (वय 30) व सून प्रियंका निखिल सव्वाखंडे( वय 25 राहणार सर्व महालक्ष्मी मंदिरा जवळ शाहूनगर जयसिंगपूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

जखमींना सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सव्वाखंडे यांच्या मुंबईतील एका नातेवाईकाचे नुकतेच निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी मोटारीने मुंबईला गेले होते. शुक्रवारी रात्री जयसिंगपूरकडे परतत असताना साताऱ्याजवळ महामार्गावर आज सकाळी ही दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने जयसिंगपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :  











Source link

Shiv Grewal: बाबो! चमत्कार झाला, मेलेला कलाकार सात मिनिटात पुन्हा झाला जिवंत

0
Shiv Grewal: बाबो! चमत्कार झाला, मेलेला कलाकार सात मिनिटात पुन्हा झाला जिवंत


एखादा मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, साहजिकच एखादा मृत व्यक्ती पुन्हा जिवंत कसा होणार. या सगळ्याला एक अभिनेता अपवाद ठरला आहे. काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. जवळपास सात मिनिटांनी तो पुन्हा जिवंत झाला. हा मोठा चमात्कारच आहे असे म्हणायला हरकत नाही.



Source link

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार, लवकरच मुख्यमंत्र्यांची बैठक : गिरीश महाजन

0
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार, लवकरच मुख्यमंत्र्यांची बैठक : गिरीश महाजन


नाशिक : केंद्र सरकारने निर्यात शुल्क (Export Duty) वाढविल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्याचबरोबर नाफेडच्या (Nafed) खरेदीवरून देखील शेतकरी नाराज असल्याचे चित्र आहे. या सर्व मुद्द्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत येत्या मंगळवारी किंवा बुधवारी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल. त्यानंतर पुढील वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात (Nashik) कांदा प्रश्न पेटला (onion Issue) असून चांगला भाव मिळण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने (Central Government) कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी आंदोलनही केले. याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी कांदा प्रश्नाबाबत आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. मंत्री महाजन म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे भविष्यात कांद्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्याचबरोबर देशातील कांदा देशाबाहेर गेला तर देशात कांदा टंचाई भासून कांद्याची भाववाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून केंद्र सरकारने शेतकरी आणि ग्राहक हितास प्राधान्य देवून कांदा निर्यातीवर शुल्क लागु केले आहे. असे असले तरीही शेतक-यांचे नुकसान होवू नये, याकरिता नाफेड आणि एन सी सी एफ यांच्यामार्फत 2410 रूपये प्रति क्विंटल दाराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यात येत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 40 कांदा खरेदी केंद्र सुरू असून अजून 10 खरेदी केंद्र वाढविण्याच्या सूचना नाफेड व एन.सी.सी.एफ यांना देण्यात आल्या आहेत. 

नाफेडचे केंद्र वाढवण्याचे आदेश

दरम्यान नाफेडच्या (NAFED) माध्यमातून 4 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला. तर नाफेडचे केंद्र वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील काळात भाव वाढतील, अशी शक्यता आहे. मात्र कायमस्वरुपी मदत कशी करता येईल, साठवण क्षमता कशी वाढवता येईल, भाव स्थिर ठेवता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचसोबत यापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रूपये प्रति क्विंटल अनुदान राज्य शासनाने जाहीर केले आहे. या अनुदानापोटी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 865 कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून त्यापैकी 465 कोटी रूपये वितरित करण्यास नुकतीच राज्य शासनाने मंजुरी दिली आहे तर उर्वरित अनुदानही लवकरात लवकर देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. 

कांद्याला जास्त भाव देणे प्रॅक्टिकल नाही…. 

नाफेडच काम कांदा साठवणे आणि भाव वाढल्यास त्या ठिकाणी पाठवणे असं आहे. नाफेडला थेट बाजारात जाण्यासाठी तांत्रिक अडचणी आहे. सगळा सरसकट कांदा घेणे शक्य नाही. 2410 रुपये कांद्याचा निकष अगोदरच ठरलेला आहे. कांद्याने मागे किती रडवले, हे माहीत आहे ना? त्यामुळे सद्यस्थितीत 4 हजार पेक्षा जास्त भाव देणे प्रॅक्टिकल नाही. मोदी सरकारच्या काळात धान्यांच्या एमएसपी दुप्पटपेक्षा वाढली आहे. त्यामुळे कांद्यावरून राजकारण करू नका, असा इशारा महाजन यांनी विरोधकांना दिला. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्याची दिर्घकाळ साठवणूक करता येण्यासाठी कांदाचाळीचे अनुदान वाढविण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी नाफेड व एनसीसीएफचे अधिकारी यांनी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Onion Issue : शेतकरी बांधवासाठी महत्त्वाची सूचना, ‘असा’ कांदा स्वीकारला जाणार नाही, नाफेडकडून लावलेले होर्डिंग चर्चेत



Source link

Dream Girl 2: आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ची ‘सत्यप्रेम की कथा’ला टक्कर, कमावले इतके कोटी

0
Dream Girl 2: आयुष्मानच्या ‘ड्रीम गर्ल २’ची ‘सत्यप्रेम की कथा’ला टक्कर, कमावले इतके कोटी


ड्रीम गर्ल २ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. पहिल्या भागाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते. आता ड्रीम गर्ल २ चित्रपटात आयुषमान खुराना आणि अनन्या पांडे यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंह, परेश रावल, अनु कपूर, विजय राज, सीमा पहवा, मनोज जोशी आणि रंजन राज अहम हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.



Source link

Ganeshotsav 2023 : मुंबईतील गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

0
Ganeshotsav 2023 : मुंबईतील गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय



Ganeshotsav 2023 : मुंबईसह पुणे, नाशिक आणि नागपुरमध्ये प्रशासनाकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यातच आता गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.



Source link

Mumbai Local Mega Block : रविवारी मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक; पाहा लोकलचं बदललेलं वेळापत्रक

0
Mumbai Local Mega Block : रविवारी मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक; पाहा लोकलचं बदललेलं वेळापत्रक



Mumbai Local Mega Block : मुंबईत ऐन वीकेंडच्याच दिवशी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.



Source link

Kareena Kapoor: करीना कपूरचे ओटीटीवर पदार्पण, पहिल्यावहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

0
Kareena Kapoor: करीना कपूरचे ओटीटीवर पदार्पण, पहिल्यावहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित



Jaane Jaan Teaser: अभिनेत्री करीना कपूर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. तिच्या पहिल्या ओटीटी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.’



Source link

Malaika Arora: ‘चला आता वेगळे होऊया’, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकाच्या टी-शर्टने वेधले लक्ष

0
Malaika Arora: ‘चला आता वेगळे होऊया’, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकाच्या टी-शर्टने वेधले लक्ष



Malaika Arora Breakup: गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मलायकाच्या टीशर्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link