Thursday, August 20, 2026
Homeसातारासाताऱ्याजवळ कारचा भीषण अपघात; जयसिंगपूर येथील एका कुटुंबातील ३ जण ठार |...

साताऱ्याजवळ कारचा भीषण अपघात; जयसिंगपूर येथील एका कुटुंबातील ३ जण ठार | पुढारी

साताऱ्याजवळ कारचा भीषण अपघात; जयसिंगपूर येथील एका कुटुंबातील ३ जण ठार | पुढारी

[ad_1]








कोल्हापूर; सातारा : पुढारी वृत्‍तसेवा मुंबई येथून जयसिंगपूरकडे परतणाऱ्या सव्वाखंडे कुटुंबावर आज (शनिवार) सकाळी काळाचा घाला पडला. सातार्‍याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

शशिकांत सव्वाखंडे (वय 50), मुलगा निखिल (वय 30) व सून प्रियंका निखिल सव्वाखंडे( वय 25 राहणार सर्व महालक्ष्मी मंदिरा जवळ शाहूनगर जयसिंगपूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

जखमींना सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सव्वाखंडे यांच्या मुंबईतील एका नातेवाईकाचे नुकतेच निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी मोटारीने मुंबईला गेले होते. शुक्रवारी रात्री जयसिंगपूरकडे परतत असताना साताऱ्याजवळ महामार्गावर आज सकाळी ही दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने जयसिंगपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :  









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments