Friday, July 17, 2026
Home Blog Page 2804

श्रीरामपूरमध्ये चोरीच्या संशयावरून चार दलित तरूणांना झाडाला बांधून मारहाण

0
श्रीरामपूरमध्ये चोरीच्या संशयावरून चार दलित तरूणांना झाडाला बांधून मारहाण

अहमदनगर: शेळी चोरी केल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार दलित तरूणांना झाडाला उलटे बांधून अमानुष मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती, मात्र शनिवारी ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या शुभम माघाडेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. चोरीच्या संशयावरून अशा पद्धतीने मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील नाना गलांडे यांची काही दिवसापूर्वी शेळी आणी काही कबुतर चोरीला गेले होते. या चोरीच्या संशयावरून काल शुक्रवारी सकाळी चार दलित तरूणांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. जखमी तरूणांना श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून आरोपींना अटक केली जावी अशी मागणी होत आहे.

सदर मारहाण प्रकरणी मारहाण करणारे युवराज गलांडे ,नानासाहेब गलांडे, राजू बोरगे, राजेंद्र पारखे, मनोज बोडखे आणी दुर्गेश वैद्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका जखमी तरूणाची आई जेव्हा सोडवायली गेली तर तिलाही धक्काबुक्की करून बाजूला काढून देण्यात आलं असा आरोप जखमी तरुणाच्या आईने केला. तर आम्ही दलित असल्याने मारहाण केल्याचा आरोप जखमी तरूणाने केला आहे.

या धक्कादायक घटनेमुळे दलित समाज आक्रमक झाला असून अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दवाखान्यात भेट देत या प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणी शुभम माघाडे याच्या फिर्यादीवरून आरोपी युवराज गलांडे , मनोज बोडखे , पप्पू पारखे , दीपक गायकवाड , दुर्गेश वैद्य , राजू बोर्गे या आरोपी विरोधात भादवी कलम 307, 364, 342, 506, 504, 147, 148, 149 सह क अ.जा.अ.ज.1989 कलम 3(1) (a) (d), 3(2) (v-a), 3(I)(r)(s) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट इस्पितळात जात मारहाण झालेल्या तरुणांची भेट घेतली. यावेळी इस्पितळाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असून अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी आगामी काळात लक्ष दिले जाईल अशी ग्वाहीसुद्धा दिली.

या घटनेनंतर रविवारी दलित संघटनांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आला आहे.  लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्याची मागणी होत असून कारवाईच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे.

ही बातमी वाचा :

Sharad Pawar : अहमदनगरमध्ये शरद पवार-अजित पवार गटात वादाची ठिणगी; दोन्ही गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या नामफलकाचा वाद पोलिस ठाण्यात

Source link

Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गट व काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारासह ८ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

0
Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गट व काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारासह ८ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस व ठाकरे गटातील आठ माजी नगरसेवकांनी तसेच ठाकरे गटातील माजी आमदाराने शिवसेनेत प्रवेश केला.

Source link

Maharashtra Rain : राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी, नंदुरबार, वाशिममध्ये पावसाच्या धारा

0
Maharashtra Rain : राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी, नंदुरबार, वाशिममध्ये पावसाच्या धारा

Chandrayaan 3 Update: चंद्रावरील ‘शिवशक्ती’ पॉईंटवर फिरताना दिसतोय प्रज्ञान रोव्हर; ISRO ने जारी केला लेटेस्ट व्हिडीओ

Source link

“अजित पवारांची दया येते, कारण त्यांना कितीही वेळा..”, भगतसिंह कोश्यारींचं विधान, शरद पवारांवरही टिप्पणी

0
“अजित पवारांची दया येते, कारण त्यांना कितीही वेळा..”, भगतसिंह कोश्यारींचं विधान, शरद पवारांवरही टिप्पणी

एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले यांनी फडणवीस-अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. कोश्यारी म्हणाले की, अजित पवार स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. आमच्या उत्तराखंडमध्येही एक मोठे नेते आहेत. कितीही वेळा पराभव झाला, तरी ते हार मानत नाहीत. तसेच, अजित पवार आहेत. त्यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात,”असा टोला कोश्यारी यांनी लगावला आहे.

Source link

Ajit Pawar Baramati : पूर्वीची बारामती आणि आत्ताची बारामती फरक आहे, बारामती बदलतेय- अजित पवार

0
Ajit Pawar Baramati : पूर्वीची बारामती आणि आत्ताची बारामती फरक आहे, बारामती बदलतेय- अजित पवार

Ajit Pawar Baramati : पूर्वीची बारामती आणि आत्ताची बारामती फरक आहे, बारामती बदलतेय- अजित पवार

Source link

पुण्यात डीआरआयची मोठी कारवाई, 50 कोटींचे ड्रग्स जप्त

0
पुण्यात डीआरआयची मोठी कारवाई, 50 कोटींचे ड्रग्स जप्त

पुणे : शिक्षणाचं माहेरघर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचं (Pune Crime News)  दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज पुरवण्याऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांनी धडाधड कारवायादेखील सुरु केल्या आहेत. त्यातच पुणे परिसरातून तब्बल 50 कोटी रुपयांचा 101 किलो मेथाक्युलोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात  आला आहे. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या 5 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांना एका कारमध्ये पाच जण मेथाक्युलोनसह पुण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून एक वाहन जप्त केलं आहे. वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले 4 निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम आढळून आले आहेत. यामध्ये मेथाक्युलोन हा पदार्थ आढळला असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी लागलीच पाच जणांना अटक केली आहे. आरोपी  बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचंदेखील समोर आलं आहे.

शिक्षणाचं माहेरघर सध्या ड्रग्जच्या विळख्यात?

दोन दिवसांपूर्वीच पुण्यातून  1 कोटी रुपयाचे अफीम जप्त करण्यात आलं होतं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने 3 जणांना अटक केली होती. राजस्थानची टोळी अफीमचा साठा गोळा करत होती, असं तपासात समोर आलं होतं.

सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत असे अटक केलेल्या आरोपींची नावे होती. पुण्यातील गोकुळनगर भागात पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कात्रज भागात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, कात्रज-कोंढवा रोडवर एक व्यक्ती अफिम या अंमली पदार्थाची विक्री करत होते. पोलिसांनी छापा टाकून सुमेर बिष्णोई याला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून 64 लाख 28 हजार रुपये किमतीचे 3 किलो 214 ग्रॅम अफिम जप्त केलं होतं. अधिक चौकशी केली असता त्याने अफिम हे त्याच्या दोन साथीदार चावंडसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून आणल्याचे सांगितले होतं. तसेच त्यांनी अंमली पदार्थाचा साठा करुन ठेवल्याचं सांगितल होतं. त्यानुसार आरोपींकडून 1 कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामुळे पुणे शहरात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar Baramati Visit : पोलीस ठाण्यात कुणालाच यायची गरज पडू नये, आदरयुक्त दबदबा असला पाहिजे; अजित पवारांच्या पोलिसांना सूचना

Source link

उरणमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने चार जणांना चिरडलं, पाहा थरारक VIDEO

0
उरणमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने चार जणांना चिरडलं, पाहा थरारक VIDEO

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार,रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.भरधाव वेगाने आलेल्या ट्रकनं रस्त्यावरून चालत जात असलेल्या चार जणांना उडवलं आहे. या भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे,तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Source link

SRK and Amitabh Bachchan: १७ वर्षांनंतर दोन सुपरस्टार आमनेसामने, बिग बींसोबत शाहरुख करणार स्क्रीन शेअर

0
SRK and Amitabh Bachchan: १७ वर्षांनंतर दोन सुपरस्टार आमनेसामने, बिग बींसोबत शाहरुख करणार स्क्रीन शेअर

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी १७ वर्षांपूर्वी एकत्र काम केले होते. त्यांनी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘डॉन ३’ या चित्रपटात दोघेही पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘डॉन ३’ या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच बिग बी आणि शाहरुख पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Source link

Mumbai Drugs Crime Rate : नागपूर, पुणे ते मुंबई… महाराष्ट्राला का लागतेय ड्रग्जची कीड?

0
Mumbai Drugs Crime Rate : नागपूर, पुणे ते मुंबई… महाराष्ट्राला का लागतेय ड्रग्जची कीड?

Mumbai Drugs Crime Rate : नागपूर, पुणे ते मुंबई… महाराष्ट्राला का लागतेय ड्रग्जची कीड?

Source link

KBC 15: एक दिवसासाठी ‘केबीसी’मध्ये बिग बींवर किती खर्च केला जातो? वाचून बसेल धक्का

0
KBC 15: एक दिवसासाठी ‘केबीसी’मध्ये बिग बींवर किती खर्च केला जातो? वाचून बसेल धक्का

बॉलिवूडचे शहेनशाह म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी एक काळ गाजवला आहे. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आजकाल ते चित्रपटसृष्टीमध्ये फारसे सक्रिय नसले तरी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक कलाकाराला अमिताभ यांच्यासोबत गप्पा मारायच्या असतात. मात्र, काही स्पर्धकांनाच ती संधी मिळते. पण या शोसाठी अमिताभ बच्चन किती मानधन घेताता असा प्रश्न अनेकांना पडतो.

Source link