Friday, July 17, 2026
Home Blog Page 2803

Ahmednagar News : कपडे काढून झाडाला उलटं टांगलं; नगरमध्ये दलित तरुणांना बेदम मारहाण

0
Ahmednagar News : कपडे काढून झाडाला उलटं टांगलं; नगरमध्ये दलित तरुणांना बेदम मारहाण


मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात मोलमजुरी करून काम करणाऱ्या तीन तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. शेळी आणि कबुतरं चोरल्याच्या संशयावरून गलांडे वस्तीवरील काही लोकांनी तरुणांना मारहाण केली आहे. युवराज गलांडे, नानासाहेब गलांडे, मनोज बोडखे आणि दुर्गेश वैद्य अशी पीडित तरुणांची नावं आहे. आरोपींनी या तरुणांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे टांगले. त्यानंतर चोरीविषयी विचारणा करण्यात आली. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणांना कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.



Source link

Neha Dhupia: ‘तुझ्याकडे ७२ तास आहेत’, लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याने नेहाच्या वडिलांची अशी होती प्रतिक्रिया

0
Neha Dhupia: ‘तुझ्याकडे ७२ तास आहेत’, लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याने नेहाच्या वडिलांची अशी होती प्रतिक्रिया


पुढे नेहाने लग्नाआधी प्रेग्नंट असल्याचे कळताच अनेकांनी ट्रोल केल्याचे सांगितले. तिने म्हटले, “लग्नाअगोदर गरोदर राहिलेल्या महिलांविषयी एखादा लेख असेल तर तो आजही मला टॅग केला जातो. कारण कुणीतरी तुमच्या आयुष्याबद्दल विचित्र गणित तयार करत बसलेले असतात. लोक कोणकोणत्या पद्धतीने तुमच्यावर लक्ष ठेवून असतात याला खरचं अर्थ नाहीये.”



Source link

नेटस्ट्रीम: ‘इसाबेला’ : बहुचर्चित हत्या अन् विकृत वास्तव

0
नेटस्ट्रीम: ‘इसाबेला’ : बहुचर्चित हत्या अन् विकृत वास्तव


  • Marathi News
  • Opinion
  • Sameer Gaikwad Article On  A Life Too Short: The Isabella Nardoni Case On Netflix

समीर गायकवाड2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

नेटफ्लिक्सने ‘ए लाइफ टू शॉर्ट : द इसाबेला नार्डोनी केस’ ही डॉक्युमेंटरीवजा फीचर फिल्म रिलीज केली आहे. यात अलीकडच्या काळातील ब्राझीलमधल्या सर्वात नाट्यमय गुन्हेगारी प्रकरणांची तटस्थ चिकित्सा करण्यात आली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये इसाबेलाचे मित्र, नातेवाईक, कुटुंब, तिची बाजू मांडणारे वकील आणि पत्रकार यांच्या मुलाखतींचा समावेश आहे, जे या केसबद्दल त्यांची मते मांडतात. आपल्या लाडक्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्या चिमुरडीच्या आईला आणि आजीला किती भयंकर नि प्रदीर्घ संघर्ष करावा लागला, हे यातून अत्यंत भेदकतेने समोर येत राहते. मायकेल लँगर आणि क्लाउडिओ मॅनोएल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हे दोघे ‘बियॉन्ड इपनेमा’ आणि ‘सिमोनल : नो वन नोज हाऊ टफ इट’ यांसारख्या सकस चित्रपटांच्या प्रभावी निर्दोष दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. या सिनेमामध्ये इसाबेला नावाच्या चिमुरड्या मुलीची करुण कथा आहे. २००८ मध्ये ही घटना घडली आहे. इसाबेला ही पाच वर्षांची मुलगी होती. साओ पाउलो येथील एका अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावरील खिडकीतून तिला बाहेर फेकण्यात आलं नि त्यात तिचा वेदनादायक मृत्यू झाला. ब्राझीलच्या गुन्हेगारी इतिहासातील सर्वांत खळबळजनक तसेच वादग्रस्त हत्याकांडाचे चित्रण या डॉक्युमेंट्रीमध्ये केले गेले असल्याने ती प्रदर्शित होताच देशभरात शोक, संताप यांची लहर आली. अनेकांना धक्का बसला.

या माहितीपटात तथ्ये आणि पुरावे यांशिवाय माध्यमांमधील या प्रकरणाविषयीचा पिसाळलेला टीआरपीग्रस्त चेहरा आणि मीडिया ट्रायलसह अकारण मांडली जाणारी ठाम मते, दोषारोप यांचे विकृत चेहरे समोर येतात. इसाबेला मरण पावली तेव्हा काय घडले होते, कुणी कोणते जबाब दिले होते नि वास्तव काय होते, हे मती गुंग करणारे आहे. जसजसा सिनेमा पुढे जातो तसतसे मानवी भावभावनांचे विविध पैलू समोर येत राहतात, आधी संताप नि कारुण्य यांनी भरलेली स्पेस हतबलतेने, स्त्रीविषयक साचेबंद नकारात्मक जाणिवांनी भारित होते. इसाबेलाच्या हत्येदरम्यान त्याच भागातून जाणाऱ्या दोन महिलांचा दावा महत्त्वाचा होता. त्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या त्या दोघींनी दावा केला होता की, एका घुसखोराने इसाबेलाची हत्या केली आणि हत्येतील प्रमुख संशयित इसाबेलाचे वडील अलेक्झांड्रे अल्वेस नार्डोनी आणि तिची सावत्र आई अॅना कॅरोलिना जटोबा हेच होते. तथापि, सीसीटीव्हीच्या पुराव्यासह साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक तपशिलाचे बारकावे यातून समोर येणारे तथ्य वेगळेच होते. परस्परविरोधी माहिती समोर येत होती.

ही फिल्म प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवते, कारण हत्येचे बारकावे इतक्या तपशीलवार पद्धतीने समोर येत राहतात की, प्रेक्षक नकळत त्यात गुंतून पडतो. सिनेमा जसजसा पुढे जात राहतो तसतसा तो नवनवे खुलासे करीत धक्कादायक वळणे घेत जातो. इसाबेला हयात नसूनही ती पूर्ण फिल्ममध्ये जाणवते. तिची आई अॅना कॅरोलिना ऑलिव्हेरा आणि वृद्ध आजी अॅना कॅरोलिना यांच्यावर या घटनेचा खोलवर भावनिक परिणाम होतो, तो नकळत प्रेक्षकांनाही त्यात ओढून घेतो! इसाबेलासोबतचे टाइम शेअरिंग आणि तिच्या आठवणी यात या दोघी रमतात, त्यांना तिचे भास होत राहतात. या फिल्ममध्ये खटल्याची सुनावणी दाखवली आहे, नाट्यमय पद्धतीने तिची चिकित्साही दर्शवली आहे. इसाबेलाची आई अॅना कॅरोलिना आणि वडील अलेक्झांड्रे यांना अनुक्रमे २६ आणि ३१ वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो, तो फिल्मचा हाय पॉइंट असूनही प्रेक्षक तिथे निराश होतात, कारण या दरम्यान संपूर्ण प्रकरणाची मानसिक उकल झाल्यामुळं त्याला स्ट्रेस जाणवत राहतो.

इसाबेलाच्या हत्येचा परीघ एका चिमुरड्या मुलीची हत्या इतक्या मर्यादित त्रिज्येचा राहत नाही, तर यात अनेक बिंदू समाविष्ट होत जातात. अस्थिर राजकीय वातावरण, मानसिक ताणतणाव, कौटुंबिक स्तरावर जगभरात येत असलेलं वैफल्य, नको तेव्हा मूक राहणारी आणि अनेकदा केवळ स्वार्थापायी अतिसक्रिय होणारी प्रसार माध्यमे, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर होत असलेलं नैतिक अधःपतन जाणवू लागतं. विशेष म्हणजे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपण सध्या अशाच समस्यांना सामोरे जात असल्याने इसाबेलाची हत्या आपल्याच परिचयाच्या व्यक्तीची हत्या वाटू लागते. तपास आणि कायदेशीर व्यवस्थेतील त्रुटी, सनसनाटीपणाचा मोह आणि खटल्याच्या निकालावर असलेला सार्वजनिक दबाव यावरही उत्तम फोकस केला गेला आहे. इसाबेलाच्या अल्पकालीन जीवनाचा नि तिच्या आयडेंटिटीचा कुठेही अवमान होणार नाही, याची पूर्ण फिल्ममध्ये दक्षता घेतली आहे. त्याचवेळी एकल कुटुंबातल्या बालहक्कांवर टोकदार भाष्यही आहे. दीड तासाच्या या फिल्ममध्ये तपास यंत्रणेच्या त्रुटी समोर येतात, काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतात. एका हत्येचे कव्हरेज इतका याचा आशय न राहता हत्येमागचे सामाजिक अधःपतन नि मौन महत्त्वाचे ठरते! देशभरात सेन्सेशन ठरलेल्या एखाद्या हत्याकांडाकडे आपण कसे पाहावे, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणून तरी ही फिल्म पाहायला हवी.

संपर्क : ९७६६८३३२८३

sameerbapu@gmail.com



Source link

कबीररंग: झिरमिर बरसिया…

0
कबीररंग: झिरमिर बरसिया…


हेमकिरण पत्की4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

निसर्ग म्हणजे नेमकं काय? वाहणं विसरलेली एखादी नदी निसर्ग असते. माळावरलं एकुलतं एक हिरवं झाड निसर्ग असतं. अरण्यामधल्या नीरव शांततेत दबा धरून कळपातील पाडसाची शिकार करणारा वाघ निसर्ग असतो. झाडाची पालवी निसर्ग असते अन् पाचोळाही निसर्ग असतो. आकाशातील पावसाळी मेघ आणि नाचत – नाचत केका रानभरी करणारा मोर निसर्ग असतो. मुंग्यांचं वारूळ निसर्ग असतं. हृदय – संवेदनेनं ओथंबून आपण या निसर्गाचं अवलोकन करायला हवं. स्वतःच्या सुखासाठी झाडं, पाखरं, प्राणी यांची हत्या होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

निसर्ग हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. उद्याच्या सुगीसाठी आज आपण जशी बीजांची काळजी घेतो, पीक – पाण्याविषयी आस्था बाळगतो, तसंच या संपूर्ण पृथ्वीवरच्या सजीवांप्रति आपली संवेदना हवी. माणसांच्या हातांनी जेव्हा एखादं झाड आपल्या डोळ्यांसमोर तोडलं जातं, तेव्हा आपला अवयवच कुणी तोडतोय, असा आपला भाव असतो का? पानांच्या सळसळीतून आपल्याला झाडाची चेतना जाणवते का? प्रखर उन्हातून चालता – चालता एखाद्या झाडाच्या सावलीत उभं राहिल्यावर तिची शीतलता अगदी थेट आपल्या हृदयात कधी उतरते का? निसर्गातील या साऱ्या घटकांविषयी आपण सजग असणं महत्त्वाचं आहे. कबीर अपार सजगतेनं, अपरंपार जिव्हाळ्यानं या सृष्टीचं, ऋतुचक्राचं अवलोकन करतात. त्यांच्या दृष्टीत निसर्गाची विशिष्टता नाही. निसर्गातील घटकांविषयी आपपरभाव नाही. अखंड प्रेमानं भरलेलं त्यांचं हृदय सृष्टीला – ऋतुचक्राला अंतरंगात घेतं. या निसर्गाला प्राकृतिक परमेश्वरानं बनवलं आहे, त्याच्यात माणसांच्या हाताचे कोणतेही ठसे नाहीत, असा त्यांच्या हृदयीचा भाव आहे. निसर्गाचं अवलोकन करताना कबीरांची दृष्टी टिपते…

झिरमिर झिरमिर बरसिया, पाहन उपर मेह माटी गलि पानी भई, पाहन वाही नेह।

पावसाच्या सरी सावकाश बरसतात. नद्या,ओढे – नाले, ओहोळ आणि तळी काठोकाठ भरतात. जमिनीवरली धूळ पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाते. मातीच्या पोटातही पाणी साचून राहतं. भूगर्भातलं हेच पाणी उफाळणाऱ्या झऱ्यातून बाहेर येतं. मेघातील पाण्याचा ओलावा असा जमिनीत दाटून राहतो. आपण आभाळ असतो, आपल्या हृदयात पावसानं निर्माण केलेली ओल असते. पाऊस जितका झाडांचा, तितकाच आपलाही असतो. जलाशयामधल्या पाण्याची वाफ व्हावी, तिचे मेघ व्हावेत आणि तेच पाऊस होऊन बरसावेत, तसे आपणही सृष्टीचा स्नेह घेऊन जन्माला येतो. पाऊस येतो – जातो. ओलावा मात्र कायम राहतो. आपल्यातील ओलावाही असाच कायम राहतो. एक सर्जनाचा तर दुसरा विसर्जनाचा ऋतू असतो. म्हणून तर सृष्टीचं हे चक्र अव्याहत चालू राहतं. कबीर ऋतूकडून घडणाऱ्या विसर्जनाचं दर्शन कसं घेतात ते पाहा…

फागुण आवत देखि के, मन झूरे बनराय,

जिन डाली हम केलि किय, सो ही ब्योरे जाय

फाल्गुन महिना येतोय, हे दिसल्यावर वनराज मनात झुरू लागतो. ज्या फांद्या फुलून – फळून आल्या, ज्यांच्या अंगा – खांद्यावर वसंतानं क्रीडा केली, त्या फांद्या वनराजाला आता ओक्याबोक्या दिसतात. कबीर या वनराजाच्या दृष्टीतून फाल्गुन मास अवलोकतात. सृष्टीतील विसर्जन त्यांच्या दृष्टीत भरून येतं. पानगळ, फूलगळ, फळगळ आणि अखेर बीजांचं वाऱ्यासह वाहणं हे ऋतुचक्रातलं विसर्जनच तर असतं! निसर्ग परिग्रह करत नाही. तो केवळ असतेपणाचं सूत्र सांभाळतो. सृष्टी आहे, ऋतुचक्र आहे आणि आपणही आहोत, हे जाणून घेण्यातील शहाणपण कबीरांनी निसर्गाचं अवलोकन प्रतिकात्मक न करता पुढील दोह्यांतून आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. ते म्हणतात…

फागुण आवत देखि करि बन रूना मनमॉंहि,

ऊँची डाली पात है, दिन – दिन पीले थाहि।

फाल्गुन मास येताना रान मनातून रडत रडत पाहतं.. झाडांच्या शेंड्यावरची पानं दिवसेंदिवस पिकून जाताहेत… रानातील झाडं पानाफुलांनी लहडणं ही सुंदरता आहेच; पण शेंड्यावरची पानं पिकून पिवळी होण्यातही सुंदरता असते. ‘मी’पण नसलेल्या दृष्टीनं अवलोकणाऱ्या कबीरांना ही सुंदरता जाणवते. सुंदरतेची पारख हा जीवनकाव्याचा डोळा असतो. या पारखणाऱ्या डोळ्यांनीच कबीरांचं निसर्गदर्शन घडतं. ज्यांना ही अवघी पृथ्वी विश्वाचं अंगण वाटतं, हे आकाश आपल्या निवाऱ्यावरचं छत वाटतं, ते लोक पशु-पक्ष्यांच्या, झाडांच्या हत्येमध्ये सहभागी होत नाहीत, तर ते झाडां – पाखरांच्या, नदी – समुद्राच्या आणि आभाळ – मातीच्या दिठीमिठीत आपलं असणं अनुभवतात.

संपर्क : ९४०३७६८८९१

hemkiranpatki@gmail.com



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: रेशमा : छुप गए वो साज़-ए-हस्ती छेड़कर; अब तो बस आवाज़ ही आवाज़ है…

0
माझ्या हिश्श्याचे किस्से: रेशमा : छुप गए वो साज़-ए-हस्ती छेड़कर; अब तो बस आवाज़ ही आवाज़ है…


रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

रेशमाजी म्हणाल्या, ‘मी भारतात आले होते. राज कपूर साहेबांकडे माझा कार्यक्रम होता. तेथे सुभाष घईंनी माझे गाणे ऐकले. त्या वेळेपर्यंत मी त्यांना ओळखतही नव्हते. ते हॉटेलवर आले आणि म्हणाले, ‘माझे नाव सुभाष घई. मला तुम्हाला भेटायचंय.’ मी म्हणाले, ‘मी तर तुम्हाला ओळखतही नाही..’

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज तुम्हाला चित्रपटसृष्टीतील एका गायिकेचा किस्सा सांगणार आहे. या गायिकेने एकच गाणे गायिले आणि त्याच गाण्याने त्यांना हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. ही गोष्ट मी मुंबईला जाण्यापूर्वीची आहे. १९८४-८५ मध्ये महेश जोशी हे मध्य प्रदेशचे गृहनिर्माणमंत्री होते. इंदूर येथे राहणारे त्यांचे मोठे बंधू दा साहेबांचा मला फोन आला. ते म्हणाले, ‘दोन दिवसांनी महेशकडे पाकिस्तानहून रेशमा येणार आहे, सिंगर; तिचा कार्यक्रम आहे, तुम्हा सर्वांना यायचंय..’ दा साहेब आणि महेश अंकल आमच्यासाठी कुटुंबाप्रमाणेच होते.

रेशमाजींचा कार्यक्रम ज्या दिवशी संध्याकाळी होता, त्या दिवशी सकाळीच मी महेशजींच्या बंगल्यावर पोहोचलो. तेव्हा महेश अंकल आणि आणखी दोन-तीन जण रेशमाजींसोबत गप्पा मारत होते. मला पाहिल्यावर महेशजींनी रेशमाजींसोबत माझी ओळख करून दिली. मी शांतपणे एका ठिकाणी बसून त्यांचे बोलणे ऐकत होतो. त्या सांगत होत्या, ‘मी तर बंजारन होते. बंजारनचे काय काम असते, तर सगळीकडे फिरणे. एकदा आम्ही कबिल्यामध्ये गात होतो, त्या वेळी कराची रेडिओमध्ये काम करणारे एक साहेब माझे गाणे ऐकून थबकले. नंतर म्हणाले, ‘तुम्ही खूप छान गाता. कराचीला याल तेव्हा मला नक्की भेटा.’ आणि मग मला त्यांनी कार्ड दिले. कराचीला गेल्यावर त्यांना भेटायला गेले. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमधील एका खोलीत नेऊन बसवले आणि म्हणाले, ‘गा..’ मी जराशी धास्तावले होते, पण त्यांच्या आग्रहाला नकार देऊ शकले नाही. नंतर मी गायिलेले ते गाणे ट्रांझिस्टरमध्ये एेकू येऊ लागले. सगळे म्हणू लागले की, हा तर रेशमासारखाच आवाज आहे. मग मला कोणीतरी म्हणाले की, हा रेशमासारखा आवाज नाही, तर रेशमाचाच आवाज आहे. मला तेव्हा पहिल्यांदाच कळले की, त्यांनी त्या दिवशी माझ्याकडून जे गाणे गाऊन घेतले होते, ते त्यांनी त्यांच्या मशीनमध्ये भरले होते. त्याला रेकॉर्डिंग म्हणतात हे मला नंतर समजले. खरं तर मला काहीच माहिती नव्हतं. मला तर उर्दूदेखील नीट येत नव्हती. फक्त पंजाबी यायची आणि राजस्थानात जन्म झाल्यामुळे राजस्थानी येत होती. मी माझ्या मुलांचे वयदेखील ऋतुमानानुसार लक्षात ठेवते. म्हणजे याचा जन्म झाला होता तेव्हा आंब्याचा हंगाम होता. आठ आंब्याचे हंगाम झाले, याचा अर्थ हा आठ वर्षांचा झाला. दुसऱ्याचा जन्म झाला तेव्हा हरभऱ्याचे पीक आले होते. मग हरभऱ्याचे अकरा हंगाम झाले. मुलांचे वय असेच लक्षात ठेवते.’

त्यांचा हा साधेपणा पाहून मी अवाक झालो. एवढी मोठी कलाकार, इतक्या निर्मळ मनाची, इतकी प्रामाणिक आहे. त्यांची विनोदबुद्धीही चांगली होती. मला अजूनही आठवतं, त्या म्हणाल्या, ‘माझ्या कॉलनीत एक साहेब राहत होते. ते जेव्हा कधी मला भेटायचे तेव्हा म्हणायचे की, रेशमाजी, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, माझी खूप इच्छा आहे की, एक दिवस तुम्ही माझ्या घरी यावं आणि माझ्यासमोर बसून गावं.’ मी म्हणाले, ‘हो येईन, नक्की येईन.’ एक दिवस मला राहवले नाही. वाटलं की, हा आपल्यावर इतकं प्रेम करतो, आपला इतका मोठा चाहता आहे, तर याच्या घरी जायलाच हवं. एक दिवस मी त्यांना म्हणाले, ‘जनाब, मी रविवारी तुमच्या घरी येईन आणि गाईन.’ मी त्यांच्या घरी गेले. ते खूप खुश झाले, खूप आदरातिथ्य केले. मी बसले होते तिथे अगदी माझ्यासमोर बसले आणि म्हणाले ‘आता गा..’ मी गाणं सुरू केलं. गाता-गाता माझ्या लक्षात आलं की, हे महाशय समोर बसून डुलक्या घेत होते. मी त्यांना जाग केलं आणि म्हणाले, ‘जनाब, मी गातेय आणि तुम्ही चक्क झोपताय!’ त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, ‘माझा तुमच्यावर विश्वास आहे की, तुम्ही गात राहाल..’ आणि पुन्हा झोपून गेले!’

तर अशी होती रेशमाजींची विनोदबुद्धी. नंतर महेशजींनी त्यांना विचारले की, तुम्हाला ‘हीरो’ चित्रपटातले गाणे कसे मिळाले? त्या म्हणाल्या, ‘मी भारतात आले होते. राज कपूर साहेबांकडे माझा कार्यक्रम होता. तेथे सुभाष घईंनी माझे गाणे ऐकले. त्यावेळेपर्यंत मी त्यांना ओळखतही नव्हते. ते हॉटेलवर आले आणि म्हणाले, ‘माझे नाव सुभाष घई. मला तुम्हाला भेटायचंय.’ मी म्हणाले, ‘मी तर तुम्हाला ओळखतही नाही..’ मग तिथल्या लोकांनी मला ते खूप मोठे दिग्दर्शक आहेत, असे सांगितले. मग ते मला म्हणाले, ‘तुम्हाला माझ्या चित्रपटात गाणं गायचंय.’ मी म्हणाले, ‘चित्रपटात गाणं माझ्यासाठी कठीण आहे.’ पण, त्यांनी खूप आग्रह केला. मला त्यांच्या त्या आग्रहाला नकार देता आला नाही आणि मी तयार झाले. त्यानंतर संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांतजी, प्यारेलालजी आणि ज्यांनी गाणं लिहिलं होतं ते आनंद बक्षी या सर्वांशी माझी भेट झाली. मी रेकॉर्डिंगला पोहोचले, तो माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. मी खूप अवघडले होते. प्यारेलालजी खूप हुशार, समजदार आणि कलाकारांच्या गुणांची कदर करणारे होते. ते म्हणाले, ‘अगदी आरामात गा, माझे म्युझिशियन सगळे सांभाळून घेतील.’ आणि त्यांनी त्यांच्या वादकांना सांगितले, ‘हे बघा, आपल्या हिशेबाने वाजवू नका, रेशमाजी जे गातील, तुम्हाला त्याच हिशेबाने त्यांची साथ द्यायची आहे.’ अशा प्रकारे त्यांनी मला कम्फर्टेबल केले आणि नंतर मी जे गाणे गायले त्याचे सारे श्रेय त्यांनाच जाते. ज्या प्रकारे त्यांनी माझ्याकडून हे गाणे गाऊन घेतले आणि ज्या पद्धतीने रेकॉर्ड केले त्यात फक्त आवाज माझा आहे, जी ईश्वराची देणगी आहे, परंतु लक्ष्मीकांतजी, प्यारेलालजी, बक्षी साहेब आणि सुभाष घईजींनी त्या गाण्याला अशी उंची दिली की काय बोलू? हे गाणे अजरामर झाले. आता तेच गाणे माझी ओळख बनले आहे.’

त्यानंतर सर्वांनी जेवण केले आणि रात्री कार्यक्रमाला यायचे म्हणून निघून गेले. परंतु, मी तेथेच थांबलो. थोड्या वेळाने मला आतून गाण्याचा आवाज आला. मी डोकावून पाहिले, तर रेशमाजी रियाज करत होत्या. मला पाहून त्यांनी आत यायला सांगितले. मी गेल्यावर म्हणाल्या, ‘लपून काय ऐकतोयस? बस..’ आणि मी त्या नशीबवान लोकांपैकी एक ठरलो, ज्यांना रेशमाजींना सराव करताना एकटेच बसून ऐकायला मिळालं. आज हे लिहीत असताना मला मजाज़ यांचा एक शेर आठतोय…

छुप गए वो साज़-ए-हस्ती छेड़कर,

अब तो बस आवाज़ ही आवाज़ है।

रेशमाजींचा तो कार्यक्रम भोपाळच्या इतिहासात कायम नोंदवला जाईल. रेशमाजींनी गायलेले ‘हीरो’ चित्रपटातील ‘लंबी जुदाई..’ हे तेच अजरामर गाणे ऐका आणि रेशमाजींना आठवा. चार दिना दा प्यार ओ रब्बा, बड़ी लंबी जुदाई। होठों पे आई तेरी याद, दुहाई।

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

गोष्ट सांगतो ऐका…: सावित्री

0
गोष्ट सांगतो ऐका…: सावित्री




गोष्ट सांगतो ऐका…:सावित्री



Source link

Sangli Murder Case : कॉलेजमधील वादातून तरुणांची एसटी स्टँडवर निर्घृण हत्या; सांगलीतील धक्कादायक घटना

0
Sangli Murder Case : कॉलेजमधील वादातून तरुणांची एसटी स्टँडवर निर्घृण हत्या; सांगलीतील धक्कादायक घटना


मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरातील एका महाविद्यालयात धुळा कोळेकर या तरुणाचा काही लोकांशी वाद झाला होता. त्यामुळं सूडाच्या भावनेने पेटलेल्या आरोपींनी शनिवारी दुपारच्या सुमारास एसटी स्टँडवर उभा असलेल्या धुळा कोळेकर याच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी चाकू, कोयता आणि अन्य धारदार शस्त्रांनी वार करत धुळाला जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.



Source link

लोक-संचित: पर्जन्यें पडावे आपुल्या स्वभावें…

0
लोक-संचित: पर्जन्यें पडावे आपुल्या स्वभावें…




लोक-संचित:पर्जन्यें पडावे आपुल्या स्वभावें…



Source link

रसिक स्पेशल: चांद्रयानाचा संदेश डिकोड करताना…

0
रसिक स्पेशल: चांद्रयानाचा संदेश डिकोड करताना…


डॉ. रोहन चौधरी17 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

इतिहासाचे विज्ञाननिष्ठ आकलन आणि विज्ञानाचा संघर्षशील इतिहास यांची कास धरल्यास काय घडू शकते, हे भारतीय संशोधकांनी चांद्रयानाच्या यशातून दाखवून दिले आहे. आता जबाबदारी भारतीय राज्यकर्त्यांची आणि नागरिकांची आहे. असाध्य ते साध्य करायचे असेल, तर एकात्म आणि विज्ञाननिष्ठ राहावे लागेल, हा ‘प्रज्ञान’ रोव्हरने देशवासीयांना पाठवलेला पहिला अदृश्य संदेश आहे. आपण तो डिकोड करून आचरणात आणू शकलो, तर या देशाची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही.

‘चांद्रयान-३’च्या यशस्वी मोहिमेने गेली काही वर्षे उदासीन असणाऱ्या भारतीय समाजात चैतन्य निर्माण केले आहे. धार्मिक असहिष्णुतेमुळे दुभंगत चाललेल्या राजकीय, सामाजिक वातावरणात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या देदीप्यमान कामगिरीने भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. भारतीयत्वाचा हा उत्सव साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचे (इस्रो) सर्वप्रथम अभिनंदन! ज्या पद्धतीने आणि ज्या काळात ही मोहीम यशस्वी झाली आहे, ते पाहता या घटनेचे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्व तर आहेच, पण त्यापेक्षा त्याचे जागतिक राजकारणातील महत्त्व अधिक आहे.

भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने १९५० ते १९७० हा कालावधी अत्यंत आव्हानात्मक होता. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सुरक्षेचे प्रश्न आ वासून उभे होते. आधी विकास की सुरक्षा या विवंचनेत भारत सापडला होता. १९६२ च्या युद्धातील मानहानिकारक पराभवानंतर या आव्हानांमध्ये आणखीच भर पडली होती. दुसरीकडे, जागतिक राजकारण हे अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्यात विभागले होते. वरकरणी हा संघर्ष लोकशाही आणि साम्यवादी या विचाराधारांमध्ये असला, तरी मुळात मुख्य स्पर्धा ही तंत्रज्ञानातील वर्चस्वाची होती. १९४५ मधील अमेरिकेच्या जपानवरील अणुबॉम्ब हल्ल्याने जागतिक राजकारणात तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि गरज अधोरेखित झाली होती. त्यामुळे पुढच्या काळात बलाढ्य देशांमध्ये आण्विक तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन हे कार्यक्रम हातात हात घालून चालत होते. १९४९ मध्ये सोव्हिएत युनियनने आण्विक शस्त्रांची चाचणी घेतली आणि विचारधारेच्या संघर्षाने तंत्रज्ञानाची जागा घेतली. त्यानंतर अवघ्या १५ वर्षात ब्रिटन (१९५२), फ्रान्स (१९६०), चीन (१९६४) हे देश अण्वस्त्रसज्ज झाले. चीनने १९५० मध्ये अंतराळ कार्यक्रमाची घोषणा केली होती. सोव्हिएत युनियनने १९५६ मध्ये अंतराळ संशोधन केंद्राची स्थापना केली होती आणि ४ ऑक्टोबर १९५७ ला रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘स्पुटनिक-१’ अवकाशात सोडला होता. अमेरिकेनेही त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘एक्स्प्लोरर’ हा उपग्रह १९५७ मध्ये अंतराळात पाठवला आणि पुढच्याच वर्षी ‘नासा’ची स्थापना केली. या देशांची थाळी तंत्रज्ञान, अवकाश, अण्वस्त्र, सुरक्षा आणि विकास या पंचपक्वानांनी भरल्यानंतर भारतासारख्या देशांची विकासाची आणि सुरक्षेची भूक लक्षात न घेता ते तंत्रज्ञानात उपाशी कसे राहतील, याचे पुरेपूर प्रयत्न त्या काळात झाले. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, अण्वस्त्रयुक्त राष्ट्रांकडून १९६८ मध्ये केलेला ‘अण्वस्त्र प्रसार बंदी करार’. या कराराद्वारे इतर देशांच्या अण्वस्त्र चाचणीवर बंदी घालण्यात आली. बड्या राष्ट्रांच्या हेतूविषयी भारताची शंका या करारामुळे खरी ठरली. अण्वस्त्र प्रसारबंदी करार अन्यायकारक असल्याचा आरोप करत तो स्वीकारण्यास भारताने ठाम नकार दिला. तथापि, आण्विक तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाचे महत्त्व आणि बड्या राष्ट्रांचा अंतस्थ हेतू भारताने सुरुवातीपासूनच ओळखला होता. स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन वर्षांत भारताने होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. विशेष म्हणजे, १९६० मध्येच भारताने अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र, श्रीहरिकोटा येथील प्रायोगिक उपग्रह दळणवळण केंद्र आणि भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी केली होती. १९६२ मध्ये होमी भाभा यांच्याच मार्गदर्शनाखाली विक्रम साराभाई यांनी अवकाश कार्यक्रमाबद्दल मसुदा तयार केला. याद्वारे भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची स्थापना करण्यात आली. परंतु, या समितीच्या स्थापनेनंतर भारतासमोर न भूतो न भविष्यति असे आव्हान उभे राहिले. युद्धात चीनकडून झालेला पराभव, भारतीय परराष्ट्र धोरणाला तंत्रज्ञानाचे स्वप्न दाखवणाऱ्या पं. नेहरूंचे १९६४ मध्ये झालेले निधन, या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी १९६५ मध्ये पाकिस्तानकडून युद्धाचा पुन्हा एकदा पुरस्कार, नेहरूंचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेले भारतीय अण्वस्त्र कार्यक्रमाचे शिल्पकार होमी भाभा यांचा १९६६ मध्ये विमान अपघातात झालेला गूढ मृत्यू, १९६७ मध्ये पुन्हा एकदा चीनने भारतीय सीमेवर केलेली आगळीक या आव्हानांच्या वादळात १९६९ मध्ये ‘इस्रो’ची स्थापना केली गेली. चांद्रयानाच्या आजच्या यशानंतर ब्रिटिश माध्यमांमध्ये उठलेले पोटशूळ, जगाला अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेल्या रशियाला ‘लुना-२५’ चांद्रयान मोहिमेत आलेले अपयश आणि ‘ब्रिक्स’च्या माध्यमातून चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ने अंतराळ क्षेत्रात केलेली सहकार्याची भाषा भारताच्या तंत्रज्ञानातील प्रगतीबाबत बरेच काही सांगून जाते. चांद्रयान मोहिमेच्या यशामुळे अभिमानाचे क्षण अनुभवणाऱ्या भारताने गाठलेल्या पल्ल्याचा हा इतिहास आणि वर्तमान विलक्षण आहे. तो केवळ तंत्रज्ञान आणि अंतरिक्षातीलच नव्हे, तर या दोन्हींच्या बळावर जागतिक राजकारणात वाढत असलेल्या भारताच्या दबदब्याचे प्रतीकही आहे. इतिहासाचे विज्ञाननिष्ठ आकलन आणि विज्ञानाचा संघर्षशील इतिहास यांची कास धरल्यास काय घडू शकते, हे भारतीय संशोधकांनी चांद्रयानाच्या यशातून दाखवून दिले आहे. आता जबाबदारी भारतीय राज्यकर्त्यांची आणि नागरिकांची आहे. ‘इस्रो’सारख्या संस्था याच भारताच्या विकासाच्या शिल्पकार आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी अशा महत्त्वाच्या संस्थांना क्षणिक फायद्यासाठी वेठीस धरण्याची चूक करू नये. त्याच वेळी, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन देशात रुजवण्याची जबाबदारी समाज माध्यमांतून अशा घटनांचा अभिमान दाखवणाऱ्या नागरिकांचीही आहे. असाध्य ते साध्य करायचे असेल, तर एकात्म आणि विज्ञाननिष्ठ राहावे लागेल, हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरमधील ‘प्रज्ञान’ रोव्हरने देशवासीयांना पाठवलेला हा पहिला अदृश्य संदेश आहे. आपण तो डिकोड करून आचरणात आणू शकलो, तर या देशाची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही.

rohanvyankatesh @gmail.com

संपर्क : ९९२२९८९००६



Source link

मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक; रायगड आणि रत्नागिरीत मनसेची पदयात्रा

0
मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक; रायगड आणि रत्नागिरीत मनसेची पदयात्रा


रत्नागिरी: अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी (Mumbai Goa Highway) आता मनसे आक्रमक झाली. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला थोड्याच वेळात सुरूवात होणारय.  अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात होतेय. मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून पदयात्रा असून असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत. 

दरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली आहे. तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.  

मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील 8 वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेचा समारोप कोलड येथे राज ठाकरेंच्या भाषणाने होणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.  

  • अमित ठाकरे – पळस्पे फाटा ते खारपाडा 
  • बाळा नांदगावकर – तरणखोप ते कासू 
  • संदीप देशपांडे – निवळी ते वांद्री
  • राजू पाटील – नागोठणे ते खांब

राज ठाकरे यांनी दिला होता इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच पनवेलमध्ये मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका टीप्पणी केली होती. तसेच या मुद्द्यावरुन विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश देखील राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर मनसे खड्ड्यांच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेकडून वांरवार मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्याला हात घातला जात आहे. पण तरीही या महामार्गाची अवस्था जैसे थेच आहे. त्यामुळे मनसेचे हे आंदोलन तरी यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



Source link