Friday, July 17, 2026
Home Blog Page 2802

तलाठीनंतर आता वनविभागाची परीक्षा वादात? संशयित गुसिंगेकडे वनविभागाच्याही प्रश्नपत्रिका सापडल्या

0
तलाठीनंतर आता वनविभागाची परीक्षा वादात? संशयित गुसिंगेकडे वनविभागाच्याही प्रश्नपत्रिका सापडल्या


नाशिक : तलाठी परीक्षेत (Talathi Exam) हायटेक कॉपीच्या प्रकारानंतर (Hightech Copy) अनेक अपडेट समोर येत आहेत. अशातच नुकतीच पार पडलेली वनविभागाची परीक्षा देखील वादात सापडल्याची चिन्हे आहेत. याबाबत खुद्द नाशिक पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली असून तलाठी परीक्षेतील मुख्य आरोपी असलेल्या गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये चक्क वनविभागाच्या प्रश्नप्रत्रिका आढळून आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.  

नाशिकच्या (Nashik) तलाठी भरती परीक्षेत काही दिवसांपूर्वी हायटेक कॉपीचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर संशयित आरोपी गणेश गुसिंगे यास ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकार समोर आले. पिंपरी चिंचवड परीक्षेतही हा पाहिजे आरोपी आहे. तसेच इतर परीक्षांत त्याने घोळ केल्याचे समोर आले होते. अशातच काल गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याचं आले. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला 138 गुण प्राप्त झाल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर आज नाशिक पोलिसांकडून (Nashik) धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका गुसिंगेच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या आहेत. 

दरम्यान नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी भरती परीक्षा (Talathi Exam 2023) घोटाळ्यातील मुख्य संशयित गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये वनविभागाच्या प्रश्नपत्रिका देखील सापडल्या. इतर परीक्षेत देखील गैरव्यवहार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेच्या (Talathi Exam) जाहीर झालेल्या यादीत 138 गुण मिळाल्याचं दिसून आलं. गणेश गुसिंगे हाच पिंपरी चिंचवड पोलिस भरती आणि म्हाडाच्या पेपरफुटीमध्येही आरोपी आहे. त्यामुळे नुकत्याच मेरिट लिस्ट जाहीर झालेल्या DMER परीक्षेची देखील चौकशी होणार असून नाशिक पोलीस खोलवर तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचं दिसून येतंय. या सर्व प्रकारानंतर आता या परीक्षांच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 

संशयित गणेश नुसिंगे कोण? 

तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नाशकात अटक करण्यात आलेला आरोपी गणेश नुसिंगे (Ganesh Nusinge) हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरतीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय समितीला असून यामध्ये गणेश गुसिंगे आणि त्याचे साथीदार असल्याचा आरोप संघटनेकडून केला जातो आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Talathi Exam: तलाठी परीक्षेचा ज्याने पेपर फोडला तो मुख्य आरोपीच होणार परीक्षा पास; गणेश गुसिंगेला 138 गुण, परीक्षा आयोजनावर प्रश्नचिन्ह 



Source link

Sushmita Sen: अक्षय कुमारच्या सिनेमाचे शुटिंग अर्धवट सोडून पळाली होती सुष्मिता सेन

0
Sushmita Sen: अक्षय कुमारच्या सिनेमाचे शुटिंग अर्धवट सोडून पळाली होती सुष्मिता सेन


अक्षय कुमार आणि करीना कपूरसोबत सुष्मिता सेन एका हिट चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. दरम्यान, सुष्मिताची मुलगी रेने गंभीर आजारी झाली होती. तिला रुग्णालयात दाखव करावे लागले होते. त्यामुळे सुष्मिता सेटवरुन पळून आली होती.



Source link

अजित पवार गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी; प्रत्येक जिल्ह्यात शपथपत्र घेण्याची मोहीम सुरु

0
अजित पवार गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी; प्रत्येक जिल्ह्यात शपथपत्र घेण्याची मोहीम सुरु


उस्मानाबाद : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून आपापल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र घेण्यात आले होते. दरम्यान, पुढे निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल करण्यात आले होते. तर, आता राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून देखील राज्यभरात आपापल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी मोहीम राबवली जात आहे. यासाठी स्थानिक महत्वाच्या नेत्यांकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात 5 हजार शपथपत्र देण्यात आली असून,  त्यातली 3 हजार शपथपत्र भरुन घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये शपथपत्र भरण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. 

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे राजकीय मैदानात असलेली ही लढाई आता कायदेशीर लढाईपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षातील कार्यकर्ते आपल्याच ताब्यात असल्याचे कायदेशीररित्या स्पष्ट करण्यासाठी अजित पवार गटाकडून तयारी करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी कायदेशीर लढाईची तयारीसाठी अजित पवार गट तयारी करत असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेच्या बंडखोरीचा ‘अभ्यास’

ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडखोरी केली, त्याचप्रमाणे अजित पवारांनी देखील आपल्या सहकारी आमदारांना सोबत घेऊन बंडाचा झेंडा फडकवला. दरम्यान, शिवसेनेमधील बंडखोरीचा मुद्दा न्यायालय आणि निवडणुका आयोगापर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षातील बंडखोरी देखील निवडणुका आयोगापर्यंत पोहोचली आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आलेले कागदपत्रे आणि त्यांच्याकडून झालेल्या चुका या सर्वांचा ‘अभ्यास’ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून केला जात आहे. त्या चुका टाळण्याचे प्रयत्न देखील करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांचे शपथपत्र भरुन घेण्यात येत आहे. 

शरद पवारांच्या सभेला अजित पवारांच्या सभेतून उत्तर? 

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार हे अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेत आहेत. यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाशिक आणि धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सभा घेतल्या होत्या. त्यामुळे आता अजित पवारांकडून देखील शरद पवारांनी सभा घेतलेल्या जिल्ह्यात सभा घेण्यात येत आहे. आज बीड जिल्ह्यात अजित पवारांची सभा होत असून, लवकरच कोल्हापूरमध्ये देखील अजित पवारांची सभा होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ajit Pawar : मी सत्तेसाठी हापापलेला कार्यकर्ता नाही, पदाचा वापर बारामतीकरांसाठी करणार; अजित पवारांचे बारामतीत जोरदार शक्तिप्रदर्शन



Source link

Jawan: शाहरुखच्या जवानची कमाल! १ मिनिटात विकले गेले ११०० तिकिट

0
Jawan: शाहरुखच्या जवानची कमाल! १ मिनिटात विकले गेले ११०० तिकिट



Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या जवान चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या या चित्रपटाचे अडवान्स बुकींग सुरु आहे.



Source link

Sushant Singh Rajput: ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केला सुशांत सिंह राजूपतचा तो फ्लॅट?

0
Sushant Singh Rajput: ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केला सुशांत सिंह राजूपतचा तो फ्लॅट?



Sushant Singh Rajput House: एका अभिनेत्रीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे घर विकत घेतल्याचे समोर आले आहे.



Source link

पुण्यातील नव्याकोऱ्या चांदणी चौकातील पुलावर PMPML बसचा अपघात; उतारावर बस घसरली अन्….

0
पुण्यातील नव्याकोऱ्या चांदणी चौकातील पुलावर PMPML बसचा अपघात; उतारावर बस घसरली अन्….



<p style="text-align: justify;"><strong><a title="पुणे" href="https://marathi.abplive.com/news/pune" data-type="interlinkingkeywords">पुणे</a></strong> : पुण्यातील नव्या कोऱ्या चांदणी चौकातील पुलावर PMPML बसचा अपघात झाला आहे. कोथरुडकडे येणाऱ्या रस्त्यावर PMPML बस चिखल असल्याने घसरली आणि जेसीबीवर आदळली आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. नवीन पुलापासून अगदी 200 मीटरवर हा अपघात झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.&nbsp;</p>



Source link

Alia Bhatt: रणबीर नाही तर ‘या’ अभिनेत्याची फॅन आहे आलिया भट्ट

0
Alia Bhatt: रणबीर नाही तर ‘या’ अभिनेत्याची फॅन आहे आलिया भट्ट


आलिया भट्टने अल्लू अर्जुनने ट्वीट रिट्वीट करत उत्तर दिले आहे. ‘प्रिय पुष्पा, तुला देखील खुप साऱ्या शुभेच्छा. तुला अभिनय कमाल होता. तुझी सर्वात मोठी चाहती’ या आशयाचे ट्वीट आलियाने केले आहे. यावरुन आलियाला अभिनेता अल्लू अर्जुन आवडत असल्याचे समोर आले आहे.



Source link

Jan Sanvad Yatra : काँग्रेसची तीन सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा; लोकसभेपूर्वी महाराष्ट्र पिंजून काढणार

0
Jan Sanvad Yatra : काँग्रेसची तीन सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा; लोकसभेपूर्वी महाराष्ट्र पिंजून काढणार


Maharashtra Congress Jan Sanvad Yatra : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशातील २६ प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. शिमला, बंगळुरू या शहरांनंतर मुंबईत इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभरात जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत जनसंवाद यात्रेची घोषणा केली आहे.



Source link

Malaika-Arjun: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची प्रतिक्रिया, म्हणाला…

0
Malaika-Arjun: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची प्रतिक्रिया, म्हणाला…



Arjun Kapoor Comment On Malaika Video: अर्जुन कपूरने मलायका अरोराच्या एका पोस्टवर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.



Source link

Shibani Dandekar: फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरकडे एकूण किती संपत्ती आहे?

0
Shibani Dandekar: फरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरकडे एकूण किती संपत्ती आहे?


शिबानीने तिच्या करिअरमध्ये सूत्रसंचान, होस्टिंग, अभिनय आणि मॉडेलिंग असे सर्व काही केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, २०१९ पर्यंत शिबानीकडे २० मिलियन इतकी प्रॉपर्टी होती. भारतीय चलानानुसार, १ अब्ज ६५ कोटी ९ लाख ६५ हजार रुपये इतकी संपत्ती शिबानीकडे आहे.



Source link