Friday, July 17, 2026
Home Blog Page 2801

Resham Tipnis Birthday: अवघ्या २०व्या वर्षी रेशीम टिपणीसने बांधली होती लग्नगाठ! पदरी दोन मुलं पडली अन्…

0
Resham Tipnis Birthday: अवघ्या २०व्या वर्षी रेशीम टिपणीसने बांधली होती लग्नगाठ! पदरी दोन मुलं पडली अन्…


Happy Birthday Resham Tipnis: रेशम टिपणीस हिने वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी लग्नगाठ बांधली होती. हिंदी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता संजीव सेठ यांच्याशी तिने विवाह केला होता.



Source link

Jejuri Khandoba Temple : जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा आजपासून दीड महिना दर्शनासाठी बंद

0
Jejuri Khandoba Temple : जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा आजपासून दीड महिना दर्शनासाठी बंद


पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा आज सोमवारपासून (दि २८) दुरुस्तीच्या कामासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत तब्बल दीड महिना बंद राहणार आहे. यामुळे भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत जाता येणार नाही अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.



Source link

महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक, दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल; आज दिवसभरात

0
महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक, दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल; आज दिवसभरात


28th August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पुण्यातील गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. विरोधकांची आघाडी इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकालही आज लागणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार असून या अंतर्गत विविध घोषणा होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील गणेश मंडळांची बैठक

पुण्यातील गणेश मंडळांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री जरी चंद्रकांत पाटील असले तरी अजित पवार सतत बैठका घेत आहेत, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त अशा अनेक बैठका त्यांनी घेतल्या आहेत.

महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक

विरोधकांची आघाडी इंडियाच्या मुंबईतील बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. अंतिम तयारीसंदर्भात आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत अंतिम तयारीचं नियोजन केलं जाईल. त्याचसोबत राहुल गांधी यांचं मुंबईत जंगी स्वागत केलं जाणार आहे, यासाठी राहुल गांधीच्या स्वागताच्या तयारीचा ही आढावा काँग्रेस नेते घेणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजची आज वार्षिक सर्वसाधारण सभा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज दुपारी 2 वाजता होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आयपीओ शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर प्रथमच एजीएम आयोजित केली जात आहे.

पंतप्रधान नवनियुक्त व्यक्तींना देणार नियुक्ती पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजगार मेळाव्याअंतर्गत सकाळी 10.15 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51 हजारांहून अधिक नवनियुक्त व्यक्तींना नियुक्ती पत्रांचं वाटप करणार आहेत, यावेळी पंतप्रधान संबोधित करणार आहेत. नागपुरात सीआरपीएफ कॅम्पमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर लागणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

मुंबई कोर्टाने फटकारल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे हनुमान चालीसा प्रकरण आणि राजद्रोह प्रकरणी मुंबईच्या सेशन कोर्टात उपस्थित राहणार आहेत.

रांची – आज 29 वर्षांनंतर चारा घोटाळ्यातील 124 आरोपींविरोधात सीबीआय न्यायालयाचा निर्णय येणार आहे. आरोपींपैकी 8 कोषागार अधिकारी, 29 पशुवैद्यक, 86 पुरवठादारांविरुद्ध निकाल येणार आहे. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव या चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत आहेत, ते सध्या प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर बाहेर आहेत.
 
जपान आज चंद्रावर आपली मोहीम ‘मून स्निपर’ प्रक्षेपित करणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 5.56 वाजता प्रक्षेपण होणार आहे.



Source link

अजितदादांनी पांढऱ्या दाढीवाल्या ‘शकुनी मामा’ पासून सावध राहावं, वाचा काय म्हणाले निलेश भोसले

0
अजितदादांनी पांढऱ्या दाढीवाल्या ‘शकुनी मामा’ पासून सावध राहावं, वाचा काय म्हणाले निलेश भोसले


Maharashtra Politicis : अजितदादांनी पांढऱ्या दाढीवाल्या ‘शकुनी मामा’ पासून सावध राहणं गरजेच आहे. हा शकुनी मामा तुमचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नसल्याचे वक्तव्य मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. निलेश भोसले (Nilesh Bhosale) यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचा स्वभाव महाभारतामधील कर्णासारखा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचे भोसले म्हणाले. पण त्यांनी पांढऱ्या दाढीच्या शकुनी मामा पासून सावध राहवे असे भोसले म्हणाले. 

दरम्यान, मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांनी पांढऱ्या दाढीचा ‘शकुनी मामा’ नेमकं कोणाला म्हटलं ते सांगतिलं नाही. त्यांनी कोणाचही नाव घेतलं नाही. त्यामुळ निलेश भोसलेंचा नेमका रोख कोणाकडं याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अजितदादा पवार यांचा स्वभाव महाभारतामधील कर्णासारखा आहे, पण त्यांनी पांढऱ्या दाढीवाल्या ‘शकुनी मामा’ पासून सावध राहावे असे भोसले म्हणालेत. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

 

अजित पवारांची बीडमध्ये जाहीर सभा

आज (27 ऑगस्ट) अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांचे बीड जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते उपस्थीत होते. यामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे यासह बीड जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांन जोरदार भाषण केल्याचं पाहायला मिळालं. तर राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असेअजित पवार म्हणाले. राजकीय जीवनात चढउतार येतात, त्याना सामोरे जायचं असतं. आम्ही जरी युतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जनतेला हे सरकार आपलं आहे हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ असे अजित पवार म्हणाले. 

साहेब उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांना मान्यता द्या : छगन भुजबळ

राष्ट्रवादी पक्ष कुणाकडे आहे आणि अध्यक्ष कोण हे आजची सभा पाहिली तर लक्षात येईल. पक्षाचे अध्यक्ष  हे अजित पवार (Ajit Pawar) असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. शरद पवार (Sharad Pawar) यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात, दुसरी धनंजय मुंडे, तिसरी हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात झाली. पण ज्यावेळी बारामतीचा विषय आला त्यावेळी शरद पवार म्हणाले की, अजित पवार आमचे नेते आहेत. अजित पवार नेते आहेत म्हणता तर मग उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता द्या आणि भांडण मिटवून टाका असेही छगन भुजबळ म्हणाले. काँग्रेस फुटली त्यावेळी मी शरद पवार यांच्यासोबत जायचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेसचे नेते मला मुख्यमंत्री करतो असे म्हणाले होते. फक्त तुम्ही शरद पवार यांच्यासोबत जाऊ नका. परंतु मी शरद पवार यांच्यासोबत राहील्याचे छगन भुजबळ म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Ajit Pawar : एक लाख कोटी रुपये लागले तरी चालतील पण मराठवाड्याला पाणी देणार : अजित पवार 





Source link

Mushrif Vs Awhad : “…त्यावेळी जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या पाया पडले”; मुश्रीफांचा बीडमधील सभेत गौप्यस्फोट

0
Mushrif Vs Awhad : “…त्यावेळी जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या पाया पडले”; मुश्रीफांचा बीडमधील सभेत गौप्यस्फोट


काहींच्या रक्तातच गद्दारी असते असा घणाघात आव्हाडांनी नाव न घेता अजित पवार गटावर केला होता. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोलाही आव्हाडांनी लगावला होता. कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणतआव्हाडांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. यानंतर हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांवर पलटवार करताना कोल्हापूरच्या कपाशीचं पायताना बसल्यावर त्याला कळेल, असे म्हटले. त्यावर आव्हाड यांनी ट्विट केलं होतं की, कोल्हापुरातील गर्दी बघून तुमचे संतुलन बिघडले असेल, असा टोला लगावला होता.



Source link

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 27 ऑगस्ट 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 27 ऑगस्ट 2023 : ABP Majha



<p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 27 ऑगस्ट 2023 : ABP Majha</p>



Source link

Lok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे Vs तृप्ती देसाई सामना! भाजप-काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर आल्याचा देसाईंचा दावा

0
Lok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे Vs तृप्ती देसाई सामना! भाजप-काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर आल्याचा देसाईंचा दावा


राज्यातील राजकारणावर बोलताना तृप्ती देसाईंनी म्हटलं की, अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात राष्ट्रवादीत फुट पडली नाही. मात्र जनतेचा रोष मतांद्वारे व्यक्त झाल्यास तुम्हाला कळेल लोकांना फसवता येणार नाही. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट बोला,तुमचे भाऊ आहेत तर तुम्ही त्याच्या बरोबर भाजपमध्ये जा असा घणाघात तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केला आहे.



Source link

Konkan railway : कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना आता आधुनिक प्रणालीचे LHB डबे, काय आहेत वैशिष्ट्ये?

0
Konkan railway : कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना आता आधुनिक प्रणालीचे LHB डबे, काय आहेत वैशिष्ट्ये?


एक्सप्रेस गाड्यांना एलएचबी डबे जोडल्याने रेल्वे गाड्यांच्या डब्याच्या रचनेत थोडा बदल  झाला  आहे. या संरचनेमुळे एक स्लीपर कोच कमी झाला आहे. तृतीय श्रेणीतील डब्यांमध्ये ९ प्रवाशांची आसनाची संख्या वाढली आहे. सुधारित डब्यांच्या संचनेनुसार वातानुकूलित द्वितीय श्रेणी २ डबे,  वातानुकूलित इकॉनॉमी तृतीय श्रेणीचे ६ डबे, ८ शयनयान डबे, सामान्य ३ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर डबा एक, पॅन्ट्री कार एक असे एकूण २२ डबे असणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.



Source link

जबरदस्तीने पार्टीत दारु पाजली अन् हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार; पुण्यातील घटना

0
जबरदस्तीने पार्टीत दारु पाजली अन् हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार; पुण्यातील घटना


पुणे : पुण्यात गुन्हेगारीत (Crime) वाढ होत (Pune crime) आहे. त्यात अत्याचारांच्या घटनांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शिक्षणाचं माहेरघर समल्या जाणाऱ्या पुण्याची नाईट लाईफ बदलली आहे. पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक तरुणांचा कल दिसत आहे. यातच पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन तरुणीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच समोर आलं आहे. आधी तरुणीला दारु पाजली त्यानंतर त्रास होत असल्याने तिला हॉटेलमध्ये नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे विश्वास नेमका कोणावर ठेवावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या सगळ्यानंतर या मुलाने तरुणीचे न्युड व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकीदेखील या तरुणाने दिली. त्यानंतर हिच धमकी आणि फोटो दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. या प्रकरणी तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिषेक सत्तुजी टिक्कल या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जुलै 2022 मध्ये तरुणीला पार्टीसाठी विमाननगर येथील ईफिनगट क्लबमध्ये बोलावून घेतलं होतं. याच पार्टीत तिला दारु पिण्यासाठी आग्रह केला होता. त्यानंतर तरुणीने  दारु प्यायला नकार दिला. मात्र जबरदस्तीने आग्रह करुन दारु पिण्यास लावली. त्यानंतर नशेत या तरुणीला  लेमन ट्री हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि व्हिडीओ, फोटोदेखील काढले.

पुण्यात मागील काही दिवसांपासून अत्याचारात चांगलीच वाढ झाल्याचं दिसत आहे. काल अशीच एक घटना समोर आली होती.  लहानपणीच्या मित्रानेत एका तरुणीसोबतच्या मैत्रीचा गैरफायदा घेतल्याचं समोर आलं होतं. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. हा प्रकार चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला सून पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन बीड जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चंदननगर परिसरात राहणाऱ्या 26 वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली आहे. चंदननगर पोलिसांनी आसिफ रहीम शेख  (वय-26 रा. मुपो. पाडळी, ता. शिरुर, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार एक दोन दिवस नाही तर जुलै 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत वाघोली येथील हॉटेलमध्ये घडला होता आणि सोबतच आरोपीच्या भावाच्या घरी घडला देखील होता. 

इतर महत्वाची बातमी-



Source link

Uddhav Thackeray : “नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल

0
Uddhav Thackeray : “नाग समजून पूजा केली,  पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल


उद्धव म्हणाले की, आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण, त्या बेंडकुळ्यांमध्ये हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे.नुकतीचनागपंचमी झाली. या गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. पुंगी वाजवली, दूध पाजलं,सगळं वाया गेलं,” असं टीकास्र उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर सोडलं.



Source link