Friday, July 17, 2026
Home Blog Page 2800

Gadar 2: ‘गदर २’ने तोडला ‘या’ १० ब्लॉकबस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड, जाणून घ्या टॉप ४ सिनेमे

0
Gadar 2: ‘गदर २’ने तोडला ‘या’ १० ब्लॉकबस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड, जाणून घ्या टॉप ४ सिनेमे


पाकिस्तानी तरुणी आणि भारतीय तरुणाच्या प्रेमकथेवर आधारित अभिनेता सनी देओल व अभिनेत्री अमिषा पटेलचा ‘गदर २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून कमाईचे अनेक विक्रम या सिनेमाने नोंदवले आहेत. आता या चित्रपटाने १० ब्लॉकबस्टर सिनेमांचे रेकॉर्ड मोडल्याचे समोर आले आहे. ‘बाहुबली’, ‘पिके’, ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’ या सारख्या सुपरहिट चित्रपटांना मागे टाकले आहे. तर काही चित्रपट असे आहेत ज्यांना गदर २ मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे.



Source link

अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, प्रफुल्ल पटेल यांनी ‘तारीख’ही सांगितली

0
अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, प्रफुल्ल पटेल यांनी ‘तारीख’ही सांगितली


बीड : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर आता अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला जात आहे. दरम्यान, प्रकरण आता निवडणूक आयोगात जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. मात्र, असे असतानाच अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार असल्याचा दावा त्यांच्याच गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केला आहे. एवढंच नाही तर, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार असल्याचं पटेल म्हणाले. बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. 

शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवार गटाची देखील बीडमध्ये रविवारी (27 ऑगस्ट) जाहीर सभा झाली. यावेळी सभेत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. तर, आपल्या भाषणातून काही नेत्यांनी राष्ट्रवादीमधील बंडखोरीवर थेट भाष्य केले. दम्यान याचवेळी प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपले मत मांडले. “लोकांच्या मनात शंका आहे की, राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. त्यामुळे सर्वाना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबरपर्यंत निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. तसेच पक्षाच चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार आहे. अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेकजण आपापल्या भूमिका मांडत आहे. पण आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे.”

सर्वांनी मिळून सामूहिक निर्णय घेतला

“राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही आणि अजित पवार यांनी निर्णय घेतला आहे. काही लोक म्हणतात की, पक्षात फूट नाही. हेच आम्ही देखील म्हणतो की पक्षात फूट नाहीच. उलट अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयाचे समर्थन आपण सर्वांनी करावे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. अनेक अशा घडामोडी होत असतात. त्यामुळे आयुष्यात कधी महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. दरम्यान, असाच आम्ही सर्वांनी मिळून हा सामूहिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा लोकशाही पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला आहे,” असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम….

दरम्यान राष्ट्रवादी पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून सुरु असून, आता कायदेशीर लढाई देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात अजित पवार गटाकडून कार्यकर्त्याचे शपथपत्र भरुन घेण्यात येत आहेत. तसेच निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल केले जाणार असल्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhagan Bhujbal Beed Speech : कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे भुजबळांवर भाषण आटोपतं घेण्याची वेळ, बीडमधील सभेत नेमकं काय घडलं?



Source link

Aai Kuthe kay Kartey: विशाखाने केदारला घातली मोठी अट, आता ती मान्य करणार का?

0
Aai Kuthe kay Kartey: विशाखाने केदारला घातली मोठी अट, आता ती मान्य करणार का?



Aai Kuthe kay Karte Serial Update: ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील विशाखाची अट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.



Source link

OTT Binge Watch: प्राईम व्हिडीओवर ट्रेंड करतायत ‘हे’ ५ चित्रपट! घर बसल्या तुम्हीही घेऊ शकता मनोरंजनाचा आनंद

0
OTT Binge Watch: प्राईम व्हिडीओवर ट्रेंड करतायत ‘हे’ ५ चित्रपट! घर बसल्या तुम्हीही घेऊ शकता मनोरंजनाचा आनंद


आदिपुरुष

‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे. प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खानचा हा चित्रपट आता जवळपास गेल्या आठवडाभरापासून टॉप ५मध्ये राहिला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाला बर्‍याच टिकेचा सामना करावा लागला होता. परंतु, ओटीटीवर या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळत आहेत.



Source link

Hrithik Roshan: कुणी धक्काबुक्की केली, तर कुणी कारमध्ये शिरलं! डेटला निघालेल्या हृतिक-सबा लोकांनी घेरलं!

0
Hrithik Roshan: कुणी धक्काबुक्की केली, तर कुणी कारमध्ये शिरलं! डेटला निघालेल्या हृतिक-सबा लोकांनी घेरलं!


आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक दोघांना ट्रोल देखील करत आहेत. अनेकांनी या जोडीला ट्रोल करत ‘डिझास्टर कपल’ म्हटले आहे. तर, एका व्यक्तीने या या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ‘हृतिक सर इतकं देखणं असण्याचा काय उपयोग, जेव्हा लोक तुमच्या गर्लफ्रेंडला पाहून तुम्हाला शिव्याच देणार आहेत…’. तर, आणखी एकाने लिहिले की, ‘वडील आणि मुलीचे प्रेम…’. तर काहींनी हृतिकला सबापेक्षा सुझान चांगली होती, असे देखील म्हटले आहे.



Source link

Mumbai News : मुंबईतील हॉटेलांमध्ये मेलेल्या कोंबड्यांची विक्री?, मनसेकडून एजंटचा भांडाफोड

0
Mumbai News : मुंबईतील हॉटेलांमध्ये मेलेल्या कोंबड्यांची विक्री?, मनसेकडून एजंटचा भांडाफोड


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काशिमीरा येथे मेलेल्या कोंबड्यांना विक्रीसाठी नेणाऱ्या व्यक्तीला पकडलं. त्यावेळी आरोपीने कोंबड्यांना नाल्यात फेकण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. परंतु मनसैनिकांनी कडक भाषेत जाब विचारला असता आरोपीने मुंबईतील वांद्रे परिसरातील हॉटेलमध्ये ३० रुपयांत मेलेल्या कोंबड्यांची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीची माहिती घेत त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळं मेलेल्या कोंबड्यांची विक्री करणारं एक मोठं रॅकेट मुंबईत कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

Subhedar: बॉक्स ऑफिसवरही दिसतेय ‘सुभेदार’ची जरब; अवघ्या तीन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई!

0
Subhedar: बॉक्स ऑफिसवरही दिसतेय ‘सुभेदार’ची जरब; अवघ्या तीन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई!


Subhedar Box Office Collection: ‘सुभेदार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत आहे. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.



Source link

Jailer Collection: भारतातच नव्हे तर जगभरात वाजला रजनीकांत यांचा डंका! ‘जेलर’च्या कलेक्शनने गाठला मोठा टप्पा!

0
Jailer Collection: भारतातच नव्हे तर जगभरात वाजला रजनीकांत यांचा डंका! ‘जेलर’च्या कलेक्शनने गाठला मोठा टप्पा!


‘थलायवर १७०’ हा रजनीकांत यांचा आगामी चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. रजनीकांत यांनी नुकतीच या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. टीजे ज्ञानवेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या या चित्रपटाचे नाव ठरवण्यात आलेले नाही. म्हणूनच या चित्रपटाला सध्या ‘थलायवर १७०’ असे म्हटले जात आहे. ‘जेलर’ या चित्रपटाने कलेक्शनच्या बाबतीतही बाजी मारली आहे. या चित्रपटाने अवघ्या १७ दिवसांत देशभरात ३०२.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर, जगभरात हा चित्रपट ६०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटात मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांचा कॅमिओ आहे. ‘जेलर’मध्ये रजनीकांत यांच्यासोबत राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.



Source link

KBC 15: अमिताभ बच्चन अंधश्रद्धाळू आहेत? ‘केबीसी १५’च्या मंचावर बिग बींनी केला मोठा खुलासा! म्हणाले…

0
KBC 15: अमिताभ बच्चन अंधश्रद्धाळू आहेत? ‘केबीसी १५’च्या मंचावर बिग बींनी केला मोठा खुलासा! म्हणाले…


आपल्या ड्रायव्हरचा किस्सा सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘मी नाही, पण माझा ड्रायव्हर या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. तो कधीकधी विनाकारण गाडी उलटी फिरवतो आणि विचारलं की सांगतो, काळी मांजर गाडीला आडवी गेली आहे.’ आपल्या ड्रायव्हरचा हा किस्सा सांगितल्यानंतर ‘बिग बी’ दिलखुलास हसले. नंतर त्यांनी स्पर्धकांसह चाहत्यांनाही सांगितले की, या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवू नये, यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.



Source link

Deepak Tijori Birthday: ‘आशिकी’तून प्रसिद्धी मिळवणाऱ्या दीपक तिजोरीला पत्नीनेच दिलेला मोठा धोका! वाचा…

0
Deepak Tijori Birthday: ‘आशिकी’तून प्रसिद्धी मिळवणाऱ्या दीपक तिजोरीला पत्नीनेच दिलेला मोठा धोका! वाचा…


अभिनेता दीपक तिजोरी याचा जन्म २८ ऑगस्ट १९६१ रोजी मुंबईत झाला. सुरुवातीपासूनच त्याला अभिनयाची गोडी लागली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीपक ‘अभिनेता’ बनण्याच्या इच्छेने एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाला होता. या ग्रुपमध्ये आमिर खान, आशुतोष गोवारीकर, परेश रावल आणि विपुल दोशी देखील होते. त्याने अभिनयाचा निर्णय तर घेतला होता. पण, या दरम्यान त्याला काम मिळत नव्हते. तब्बल ३ वर्षे तो निर्मात्यांची दारं फिरत होता. पण, तरीही काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान, त्याने एका मासिकामध्ये एक्झिक्युटिव्ह आणि मुंबईतील ‘सी रॉक’ हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम देखील केले.



Source link