
मुस्लिमही बांधव करतायेत तिची खाण्यापिण्याची व्यवस्था
शबनम म्हणाली की या प्रवासात सर्व हिंदू आणि मुस्लिम तिला साथ देत आहेत. शबनम म्हणाली, ‘काही दिवसांपूर्वी मी मुंबईहून अयोध्येला रामजींच्या दर्शनासाठी जात असताना पोलिस आणि प्रशासनाने चांगले सहकार्य केले. महाराष्ट्र पोलीस असो वा मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश. तिन्ही ठिकाणी भाजप सरकार असून प्रशासनाने देखील तिचे कौतुक केले आहे. त्यामुळे मोदी पुन्हा सरकारमध्ये यावे आणि पंतप्रधान व्हावे, अशी माझी इच्छा आहे. यात्रेदरम्यान सर्व हिंदू-मुस्लिम एकमेकांना भेटून एकमेकांना साथ देत आहेत. अनेक मुस्लिमही त्यांचे स्वागत करतात आणि अन्नपाण्याची व्यवस्था करतात, असे देखील शबनम म्हणाली.








