Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशBihar Politics | काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या आमदारकीवर येणार गदा; बिहार विधानसभा अध्यक्षांना...

Bihar Politics | काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या आमदारकीवर येणार गदा; बिहार विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या आमदारकीवर येणार गदा; बिहार विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून मागणी

बिहार काँग्रेसने विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून मुरारी प्रसाद गौतम (Murari Prasad Gautam) आणि सिद्धार्थ सौरभ (Siddharth Saurabh) यांना आमदारपदावरून अपात्र करण्याची मागणी केली आहे.

पाटणा : बिहार काँग्रेसने विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून मुरारी प्रसाद गौतम (Murari Prasad Gautam) आणि सिद्धार्थ सौरभ (Siddharth Saurabh) यांना आमदारपदावरून अपात्र करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही आमदारांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बिहार काँग्रेस आपल्या दोन बंडखोर आमदार मुरारी प्रसाद गौतम आणि सिद्धार्थ सौरभ यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या कामी लागले आहे.

बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव यांची भेट घेऊन यासंदर्भात अर्ज सादर केला. विशेष म्हणजे मंगळवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे आमदार मुरारी प्रसाद गौतम आणि सिद्धार्थ सौरभ आणि आरजेडीच्या आमदार संगीता देवी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने बसले. यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यांचे टेबल थाटून स्वागत केले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments