Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटणचे आमदार शिक्षक हवेत की ? खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा लोकांना...

फलटणचे आमदार शिक्षक हवेत की ? खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा लोकांना सवाल!

फलटण: राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना फलटणकरांमध्ये त्यांचा आमदार शिक्षक असावा की वाईनशॉपवाला, असा थेट सवाल उपस्थित करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकांच्या भावना चेतवल्या आहेत. फलटणची तुलना बारामतीशी करताना त्यांनी बारामतीकरांकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पद किती काळ आहे हे पाहावे, असा टोलाही दिला. “रामराजे महायुतीत आहेत, त्यांना मुख्यमंत्री पद द्या आणि मग पाहू, फलटणचा विकास कसा होतो ते!” असे आव्हानही त्यांनी दिले.

खासदार मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले की, “विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली होती. परंतु पवार साहेबांनी अजित पवार यांना नेतृत्व दिल्यानंतर उलटी गिनती सुरू झाली.”

श्रीराम कारखान्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना मोहिते पाटील म्हणाले, “रामराजे यांनी श्रीराम चालवायला दिला आहे, विकला नाही. अजूनही श्रीराम शेतकऱ्यांच्याच मालकीचा आहे.” साखरवाडीच्या सभेत अजित पवार यांनी केलेल्या टीकेवरही प्रत्युत्तर देताना त्यांनी लोकसभा निवडणुकीतील अनुभवाच्या आधारे फलटणकरांना विचारले, “तुम्हाला तुमचा आमदार शिक्षक हवा की वाईनशॉपवाला?”

मोहिते पाटील यांची आश्वासने:

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी फलटण येथे ‘किसान रेल्वे’ सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असणार.

‘खेलो इंडिया’ अंतर्गत फलटणमध्ये उच्च दर्जाचे क्रीडा केंद्र उभारणार.

फलटणमध्ये हॉकीसाठी सिंथेटिक कोर्ट बनवणार.

फलटण तालुक्यातील रेल्वेचे प्रश्न लोकांशी संवाद साधून सोडवणार.

संसदेत मिळालेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार.

मोहिते पाटील यांनी फलटणकरांना आवाहन करताना सांगितले की, लोकसभेप्रमाणे याही निवडणुकीत पैशांचा पाऊस पडेल, मात्र जनतेने बरोबर निर्णय घ्यावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments