Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण मधून भाजपचा आमदार निवडून येण्यासाठी मी स्वतः प्रचारात सक्रिय होणार –...

फलटण मधून भाजपचा आमदार निवडून येण्यासाठी मी स्वतः प्रचारात सक्रिय होणार – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

फलटणः लोकसभा निवडणुकीत भाजपला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून आणखी मताधिक्य वाढले गेले पाहिजेत याबाबतीत पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे विधानसभा निवडणुकीचे तिकीट वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून फलटण मधून भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी मी स्वतः प्रचारात सक्रिय होणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी संपूर्ण भाजपाची ताकद असून त्यांच्या नेतृत्वाखालीच येथील विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. भाजपला चांगले वातावरण असून राज्यात चांगले निर्णय घेतल्याने पुन्हा आपले सरकार येणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे चंद्रकांतदादा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments