Sunday, September 13, 2026
Homeसातारातालुक्यातील भूमिपुत्रांना विना शिफारस कंपनी मध्ये कामावर घ्या ; खा . रणजितसिंह...

तालुक्यातील भूमिपुत्रांना विना शिफारस कंपनी मध्ये कामावर घ्या ; खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण – खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल जॅक्सन येथे महिंद्रा लॉजिस्टिक यांच्या वतीने नोकरी संदर्भामध्ये इंटरव्यू सुरू असून फलटण तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी फलटण तालुक्यातील युवकांना कमिंस कंपनी मार्फत युवकांचे अर्थिक शोषण करीत असून या विरोधात मुलांच्या पाठीशी उभे आपण खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

ते जॅक्सन इन हॉटेल येथे महेंद्रा कंपनीच्या मुलाखती सुरू असून त्या ठिकाणी ते बोलत होते,

कंपनी मुलांना २४ हजार पगार देते. व एजंट मुलांना १२ हजार देतात व कामगारांचे अर्थिक शोषण करतात. त्यामुळे आज रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी महेन्द्र कंपनीच्या या मॅनेजमेंट बरोबर चर्चा केली व तालुक्यातील मुलांना कंपनीच्या माध्यमातून कामांवर घेण्यात यावे. व मुलांना कंपनीचा पगार व इतर सुविधा नियमानुसार मिळाल्या दिल्या गेल्या पाहिजेत व जास्तीत जास्त मुल व मुली भूमिपुत्र म्हनून घेतली पाहिजे तालुक्यातील कोणत्याही नेत्याची शिफारस न घेता मेरिट प्रमाणे नोकरी उपलब्ध करून दयावी अशा सुचना कंपनी चे प्रशासन दिल्या आहेत. यावेळी कंपनी चे वतीने तालुक्यातील भूमिपुत्रांना व कंपनी मध्ये व सर्व

सुविधा दिल्या जातील असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील मुलांनी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तालुक्यातील हजारो युवक उपस्थित होते..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments