
हेमंत सोरेन म्हणाले, ‘मी पाच महिने जेलमध्ये होतो. हा पाच महिन्यांचा कालावधी झारखंडच्या जनतेसाठी, मूल निवासी आदिवासी बांधवांसाठी चिंतनीय काळ होता. मी कोणत्या कारणामुळे जेलमध्ये गेलो, हे पूर्ण देश जाणतो. मला एका खोट्या प्रकरणात ५ महिने जेलमध्ये काढावे लागले आहेे. अखेर न्यायालयाकडून मला न्याय मिळाला आहे. मी न्यायालयाचा सन्मान करतो. माझ्या जामीनामुळे केवळ झारखंड नव्हे तर देशातील नागरिकांना माझ्या अटकेमागचं कारण कळलं आहे. देशात राजकीय नेते, समाजसेवक, लेखक, पत्रकारांना होणारी अटक चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया हेमंत सोरेन यांनी दिली.








