Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशCrime News : मेहुणीचा होण्याऱ्या दाजीवर जडला जीव, इन्स्टावर रात्रभर चॅट अन्......

Crime News : मेहुणीचा होण्याऱ्या दाजीवर जडला जीव, इन्स्टावर रात्रभर चॅट अन्… शेवट भयंकर वाईट

[ad_1]

Sister in law Crime News : बहिणी बहिणींचं नात खूप खास असतं. कधी काहीही गरज पडली तर बहिणीच्या मदतीला बहिण काहीही न पाहता धावून जाते. पण आपल्याकडे कधी कोण काय करेल याचा काही नियम नाही. स्वत:वर वेळ आली तर हीच बहिण विद्रोपी रुप देखील धारण करू शकते. याचा प्रत्यय राजस्थानमध्ये पहायला मिळाला. प्रकरण वाचून तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल. गुरं चारायला गेलेल्या एका प्रिया नावाच्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर लोकांनी जोरदार आंदोलन केलं अन् खऱ्या आरोपीचा चेहरा उघड झाला. 

नेमकं काय झालं? 

केकरी जिल्ह्यातील मेवदा खुर्द गावात परिसरात खळबळ उडाली जेव्हा दुर्गालाल धाकड यांची मुलगी 20 वर्षीय पूजा हिचा मृतदेह शेतात पडलेला आढळून आला. लोकांनी तात्काळ पूजाला रुग्णालयात दाखल केलं परंतू तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. संतप्त लोकांनी मारेकऱ्याला अटक करावी, यासाठी राडा घातला. गावकऱ्यांनी राज्य महामार्ग रोखून हत्येचा खुलासा करण्याची मागणी केली. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला अन् तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात जे काही आढळलं, ते पाहून तुम्हाला कानावर विश्वास बसणार नाही. 

पोलिस तपासात काय उघड झालं?

महावीर जाट आणि दुर्गालाल जाट हे खरे भाऊ असून दोघेही एकत्र राहतात. वर्षापूर्वी महावीर यांच्या पत्नी कमलेशी यांचे निधन झाले, तेव्हापासून दोन्ही भावांच्या मुलीचं संगोपन दुर्गालाल जाट यांच्या पत्नी प्रेमी देवी करत होते. मृत तरुणी प्रिया आपलं बीएडचं शिक्षण पूर्ण करून  मेवडा खुर्द या गावात राहू लागली. प्रिया ही रोज गावातून केकरी बीएड कॉलेजला जायची. त्यावेळी तिचं एका मुलावर प्रेम जडलं. त्याचवेळी तिची बहिण पूजा तिच्यावर लक्ष ठेऊन होती. प्रियाने गुपचूप एक मोबाईलही विकत घेतला होता. जेव्हा पुजाला याविषयी माहिती मिळाली तेव्हा दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

दोन्ही बहिणींचं नातं दुरावत चाललं होतं. त्यावेळी पूजा ज्या मुलावर प्रेम करायची, त्या मुलासोबत प्रियाचा दररोज फोनवरून बोलणं होत होतं, अशी माहिती पूजाला कळाली. मग काय… याच मुद्द्यावरून दोघींमध्ये जोरदार भांडण झाली. प्रिया दररोज पूजाला आवडणाऱ्या मुलासोबत बोलत होती. पूजा आणि तिचा प्रियकर लग्न करण्याच्या तयारी होते. मात्र, प्रियाचं असं वागणं पूजाला पटलं नाही. त्यामुळे पूजाला संताप अनावर झाला अन् तिने बहिणीला धडा शिकवण्याचं ठरवलं.

घटनेच्या दिवशी, दोन्ही बहिणींमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यानंतर पूजा एका बाजूला जाऊन बसली. यादरम्यान प्रियाला राग आला आणि तिने पूजाच्या डोक्यावर काठीने वार केले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत असलेली प्रिया पाण्यात पडल्याने पूजाला घाम फुटला. तिने काहीही विचार न करता घरी धूम ठोकली. पोलिसांनी ज्यावेळी घटनेचा तपास केला, तेव्हा त्यांना याची सविस्तर माहिती मिळाली अन् पूजाने गुन्हा मान्य देखील केला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments