Saturday, September 12, 2026
Homeसातारामहिला दिनानिमित्त  सातारा येथे तनिष्का बौद्ध वधू वर परिचय मेळावा संपन्न*

महिला दिनानिमित्त  सातारा येथे तनिष्का बौद्ध वधू वर परिचय मेळावा संपन्न*


सातारा :- सातारा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या व रिपाईच्या जावली तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी महिला दिनानिमित्त मोफत बौद्ध वधू वर मेळावा भरवून सामाजिक बांधिलकी जपत शेकडो मुला मुलींच्या विवाह जुळवण्यासाठी तनिष्का वधू वर संस्था जावली यांच्या वतीने परिचय मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केले.
बौद्ध वधू वर मेळाव्याचे उदघाटन आदरणीय हेमलता अशोकराव गायकवाड आईसाहेब यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पँथर रिपाईचे सातारा जिल्हा अध्यक्ष आदरणीय अशोकराव गायकवाड, प्रोपेसर अरुणजी गाडे साहेब, रिपाईचे जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे साहेब,संगीताताई परिहार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील अनेक विवाह इच्छुक बौद्ध मुला मुलींनी, घटस्फोटीतांनी व पालकांनी उत्सपूर्त प्रतिसाद देत सातारा येथे मेळावा संपन्न केला.
तनिष्का वधू वर चे दशरथ कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष संतोष खरात (फौजी ),बौद्धाचार्य दत्तात्रय जाधव गुरुजी,बौद्धाचार्य कुमार सुर्वे, बौद्धाचार्य अनिल शिंदे यांनी मेळाव्याचे अतिशय नियोजनबद्ध संयोजन केले.
प्रमोद मोतलिंग,विकास तोडकर,करण कांबळे, शर्मिला कांबळे, तनिष्का कांबळे, इत्यादीनीं मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
याप्रसंगी रिपाईचे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांनी सांगितले की वधू वर मेळाव्याच्या माध्यमातून लग्न जुळवणे ही खुप मोठी सामाजिक चळवळ निर्माण झाली असून विवाहइच्छुक मुलांनी व मुलींनी योग्यवयातत लग्न केली पाहिजेत नोकरींचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुला-मुलींनीही शासकीय नोकरी,डॉक्टर, इंजिनियरच पाहिजे अशी अट न धरता निर्व्यसनी व चांगला कमवणारा किंवा व्यवसायिक,शेतकरी मुलगा असेल तर तडजोड केली पाहिजे. तसेच मेळाव्याच्या माध्यमातून दोन कुटुंबाला एकत्र आणण्याचा खूप चांगला उपक्रम रिपाई जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महासचिव दशरथ कांबळे व जावली तालुक्याचे सर्व पदाधिकारी करीत असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
तनिष्का वधू वर संस्थेचे मार्गदर्शक एकनाथ रोकडे साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील हा सातवा बौद्ध वधू वर परिचय मेळावा आमच्या सर्व टीमने यशस्वी केला असून इतरही जिल्ह्यातील डॉक्टर, शासकीय कर्मचारी, इंजिनियर, तलाठी, आयटी क्षेत्रातील मुला मुलींनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला बौद्ध वधुवर मेळाव्यामुळे अनेक मुलामुलींचे, घटस्फोटीतांचे संसार नव्याने उभे राहायला मदत मिळेल त्यामुळे इथून पुढे आमची सर्व टीम सामाजिक बांधिलकी जपत आजून जोमाने काम करनार आहे.
दशरथ कांबळे यांनी सांगितले की तनिष्का वधू वर मेळाव्याच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त लग्न जुळवले असून ह्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या संस्थेला मिळालेला आहे लवकरच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बौद्ध वधू वर महामेळाव्याची तयारी आमची टीम करणार आहे.
भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालूका अध्यक्ष संतोष खरात यांनी सर्वांचे आभार मानले व बौद्धाचार्य कुमार सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments