Saturday, September 12, 2026
Homeसाताराफलटणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; समता घरेलू महिला कामगारांना अंनिस समाज...

फलटणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा; समता घरेलू महिला कामगारांना अंनिस समाज प्रबोधिनी पुरस्कार प्रदान

फलटण, 12 मार्च – साथी फलटण शाखा आणि समविचारी समता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समता घरेलू महिला कामगार आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या महिलांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) फलटण शाखेतर्फे अंनिस समाज प्रबोधिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या वेळी अॅड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात, कल्पनाताई मोहिते, नकुसा फरतडे आणि साजिया यांना या सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कल्पना मोहिते यांनी केले, तर अंनिस फलटण शाखेचे कार्यकर्ते वसिम शेख, अयाज आतार, आरती काकडे आणि मोहिनी भोंगळे यांनी संपूर्ण जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आनंद देशमुख होते. प्रमुख उपस्थिती दादासाहेब चोरमले, सुपर्णाताई अहिवळे आणि मंदाकिनी गायकवाड यांची होती. यावेळी महिलांच्या अंधश्रद्धांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात गिरीश बनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव यांनी उपस्थित महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा वाटून क्रांतीज्योतीचा संदेश दिला.

यावेळी अॅड. कांचनकन्होजाताई यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाने जागतिक महिला दिनाला खऱ्या अर्थाने सामाजिक भान प्राप्त करून दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments