Saturday, September 12, 2026
Homeसाताराबारामतीचा पराभव दिसताच अजितदादा गमावले संतुलन, फलटणवासीयांना सावधतेचा इशारा - संग्राम अहिवळे

बारामतीचा पराभव दिसताच अजितदादा गमावले संतुलन, फलटणवासीयांना सावधतेचा इशारा – संग्राम अहिवळे

फलटण :- सध्याची राजकीय स्थिती आणि संभाव्य पराभवामुळे अजितदादा पवारांचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्यातून त्यांनी महाराष्ट्रभर कोणावरही मनमानी टीका करणे सुरू केले आहे, असा आरोप संग्राम अहिवळे यांनी केला.

२०१९ मध्ये मुलगा पार्थ आणि या लोकसभेत पत्नीचा पराभव झाल्यानंतर बारामती विधानसभेतही पराभव समोर असल्याने अजितदादा गोंधळलेले आहेत. छगन भुजबळांच्या पुस्तकातील खुलास्यानुसार अजितदादांनी पवार कुटुंब फोडले आणि स्वकीयांपासून दूर गेले. पवारसाहेबांच्या पाठीशी असताना नारळ फोडत बारामतीत विजय सभा घेतलेले अजितदादा, आता मात्र गल्ली बोळात फिरायला लागले आहेत, असे अहिवळे म्हणाले.

अजितदादांनी आधी बारामतीतून निवडून यावे आणि मग फलटणचा आमदार आमच्या विचारांचा हवा, असे वक्तव्ये करावीत, असे आव्हान त्यांनी दिले. अजितदादांचे श्रीमंत महाराज साहेब रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करणं, हे त्यांच्या मागील स्तुतीवचनांना विसरल्याचे संकेत आहे.

फलटणकरांना आता अजितदादांच्या खोट्या गप्पांना आणि खोट्या आश्वासनांना भुलणार नाही, असं सांगत अहिवळे यांनी अजितदादांच्या पायघड्या अंथरण्यावर टीका केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments