Saturday, September 12, 2026
Homeसातारा"अजित पवारांचा रामराजे नाईक निंबाळकर यांना जोरदार टोला, 'धमक असेल तर आमदारकीला...

“अजित पवारांचा रामराजे नाईक निंबाळकर यांना जोरदार टोला, ‘धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा”

रामराजे नाईक निंबाळकर यांना अजित पवार यांचे जोरदार प्रत्युत्तर

फलटण – आज साखरवाडी (ता. फलटण) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. पवार यांनी रामराजे यांना आव्हान करत म्हटले, “तुमच्यात धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि खुलेपणाने काम करा.”

पवार यांनी पुढे सांगितले की, “भाजपाच्या मदतीने आपण रामराजेंना विधानपरिषदेचे सभापती केले होते, त्यानंतर पालकमंत्री व इतर महत्वाची पदे दिली होती. परंतु आता ते पक्षाच्या विरोधात काम करत आहेत आणि महायुती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नराहता घरात दार लावून बसले आहेत.”

अजित पवार यांनी रामराजे यांना टोला मारताना म्हटले की, “फलटणमध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जमीन विकली, सहकारी दुध संघाची जमीन विकली आणि सहकारी संस्थांचे वाटोळे केले आहेत. श्रीराम कारखाना आव्हाडे यांना चालवायला दिला आणि मालोजीराजे यांचे नाव असणारी बँक सुद्धा चालवायला दिली आहे.”

त्यांनी आणखी एका मुद्द्यावर जोर दिला, “संजीवराजेंना विधानपरिषदेवर उभं करण्याचा विचार केला होता, परंतु रामराजेंनी नकार दिला आणि शेखर गोरेंना उभं केलं.”

पवार यांनी या सभेत शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजनांची माहिती दिली. येणाऱ्या सहा महिन्यात शेतकऱ्यांना दिवसा शेती पंपासाठी विज पुरवठा करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले. तसेच, कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय उठवला असल्याचेही सांगितले.

सातारा जिल्हा बँकेच्या 300 जागांसाठीच्या भरतीसंदर्भात देखील पवार यांनी बोलताना, “काही लोक या भरती प्रक्रियेत चुकीचा प्रचार करत आहेत. त्यांना फसवू नका,” असे आवाहन केले.

पवार यांनी शेवटी सभा संपवताना उपस्थितांना आवाहन केले, “फलटणमधून सचिन पाटलांना विजयी करा, आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधकांच्या बनवलेल्या फेक नरेटिव्हला नकार द्या.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments