Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण तालुका तलाठी संघटनेच्या 2024-2029 कार्यकारिणीची निवड; लक्ष्मण अहिवळे अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा...

फलटण तालुका तलाठी संघटनेच्या 2024-2029 कार्यकारिणीची निवड; लक्ष्मण अहिवळे अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

फलटण प्रतिनिधी :– फलटण तालुका तलाठी संघटनेची सन 2024-2029 पर्यंत कार्यकारिणी निवड बैठकीत श्री. लक्ष्मण सुभाष अहिवळे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच, श्री. योगेश अशोक धेंडे यांची देखील सलग दुसऱ्यांदा सरचिटणीस पदी निवड झाली.

नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे आहे:

  1. लक्ष्मण सुभाष अहिवळे – अध्यक्ष
  2. श्री गणेश दत्तात्रय मोरे – उपाध्यक्ष
  3. रावसाहेब काळे – कार्याध्यक्ष
  4. महावीर अहिवळे – कोषाध्यक्ष
  5. योगेश अशोक धेंडे – सरचिटणीस
  6. निलेश गवंड – खजिनदार
  7. मनिषा सावळकर – हिशोब तपासनीस
  8. शिलवंत चव्हाण – संघटक
  9. संदीप कुंभार – सल्लागार
  10. दिपाली शिंदे – महिला प्रतिनिधी
  11. दिपक नलगे – सहसरचिटणीस

नवीन कार्यकारिणीची निवड निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. विठ्ठलराव सोडमिसे आणि सातारा जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत पारवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी माजी सरचिटणीस भालचंद्र भादुले, फलटण तालुका तलाठी संघाचे माजी सरचिटणीस बाळासाहेब चोरमले, चंद्रकांत सरगर, सचिन क्षीरसागर, हनुमंत नागरवाड, आणि फलटण तालुका तलाठी संघाचे सर्व आजी-माजी सभासद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments