Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रभाजपाला धक्का: हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणुकीत...

भाजपाला धक्का: हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणुकीत लढणार

इंदापूर :-हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.

शरद पवार यांच्याशी चर्चा

हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले, “जनतेचा आवाज आहे की मी निवडणूक लढवावी. मी शरद पवारांना भेटलो आणि त्यांनीही मला विधानसभेची निवडणूक लढवावी असे सुचवले. त्यांनी विचारले, ‘तुम्ही काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात.’ त्यावर पवार साहेब म्हणाले की, जनतेचा आग्रह असल्यास तुम्ही निर्णय घ्या, बाकीची काळजी मी घेईन.”

देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद

पाटील पुढे म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. आमची दीड ते दोन तास चर्चा झाली. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि मी माझी. मी सांगितले की तालुक्यातील लोकांच्या आग्रहाविरुद्ध मी जाऊ शकत नाही. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘माझ्या अडचणी समजून घ्या आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या.'”

कार्यकर्त्यांचा आग्रह आणि निर्णय

हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सांगितले, “मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या विरोधात जाणार नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. १९९५ मध्ये तुमच्या आग्रहामुळे मी बंडखोरी केली आणि निवडून आलो. २०१९ मध्ये तुम्ही आग्रह केला म्हणून भाजपात गेलो, पण दुर्दैवाने निवडणूक हरलो. आता इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मला राष्ट्रवादीत जावंच लागेल.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments