Tuesday, September 15, 2026
Homeसाताराकामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थिती  राज्यातील सर्वात मोठा मेळाव्या संपन्न झाला...

कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थिती  राज्यातील सर्वात मोठा मेळाव्या संपन्न झाला ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : फलटण – पंढरपूर रोड वरील “श्री दत्त गार्डन”मंगल कार्यालयात कामगार मेळाव्याचे आयोजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

राज्यामध्ये सर्वात मोठा कामगार मेळावा हा फलटण येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केला आहे. मी कामगार मंत्री झाल्यापासून अनेक मेळावे बघितले आहेत. परंतु आज फलटणमध्ये जो मेळावा पार पडत आहे; हा अतिशय शिस्तबद्धरित्या संपन्न होत आहे. इथे आल्यावर प्रथम नोंदणी त्यानंतर आमच्या कामगार माता बंधू बघिणींना पाण्याची व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. हा फलटणचा मेळावा अतिशय शिस्तबद्ध आहे. या सर्व बाबींचा विचार करता राज्यातील सर्वात मोठा बांधकाम कामगार मेळावा हा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने फलटण येथे संपन्न होत आहे; असे कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना ना. खाडे म्हणाले कि; माझी पूर्वीची परिस्थिती ही अतिशय हलाखीची होती. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण ते अगदी माझगाव डॉक मध्ये मी कामगार म्हणून काम करीत होतो. देवेंद्र फडणवीस व अमित शहा साहेबानी हेच ओळखून मला मंत्री करताना कामगार मंत्री पद दिले. मी पूर्वी तब्ब्ल १० ते १२ वर्षे माझगाव डॉक मध्ये काम केल्याने कामगारांची प्रश्न व व्यथा नक्की काय आहेत हे मला माहिती होती. ज्या दिवशी मी कामगार मंत्री झालो त्या दिवशी मी शपथ खाल्ली कि मी कामगार मंत्री झाल्यावर मी कामगारासांठी नक्की काही ना काही करणार. मी मंत्री झाल्यानंतर कामगारांना प्रथम सेफ्टी किट सुरु केले; त्याचे कारण सुद्धा तसेच होते कामगार हा कायम कोणत्याही ठिकाणा कोट्याही परिस्थिती मध्ये कामकाज करीत असतो त्यामुळे त्याची सेफ्टी हि प्र

झाल्यानंतर कामगारांना प्रथम सेफ्टी किट सुरु केले; त्याचे कारण सुद्धा तसेच होते कि कामगार हा कायम कोणत्याही ठिकाणी कोट्याही परिस्थिती मध्ये कामकाज करीत असतो त्यामुळे त्याची सेफ्टी हि प्रथम आवश्यक आहे. त्यानंतर कामगार महिलांना भांडी देण्याचा निर्णय केला आहे. घरेलू कामगारांना सुद्धा आम्ही किट देण्याचे काम केले आहे. आता घरेलू कामगारांना सुद्धा किट उपलब्ध करून देणार आहे. कामगारांसाठी एक पुस्तक छापले आहे; त्यामध्ये सर्व प्रोसेस आम्ही त्यामध्ये स्पष्ट केले आहे.

आताच्या प्रमाणे फलटण तालुक्यातील सर्वांना आम्ही किट्स देणार आहे. सातारा येथे आम्ही कामगार भवन उभारणार आहोत. त्या ठिकाणी कामगारांना एका छताखाली आम्ही सर्व गोष्टी उपलब्ध करून देणार आहे. कामगारांसाठीआम्ही जिल्हा निहाय ऍम्ब्युलन्स आणली आहे;त्यामध्ये जिल्ह्यातील ३ मल्टीस्पेस्थालिस्ट हॉस्पिटल आम्ही नोंदणी केली आहे. त्यामध्येआम्ही त्यांना सर्व सोयी पुरवणार आहोत.लोकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन पावले पुढे सारले पाहिजे आम्ही चार पावले पुढे यायला तयार आहे. ह्या कामगार बंधू बहिणीचे टाळू वरील लोणी खाण्याचा कुणीही प्रयत्न कामगार केला तर मी तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कोणतीही योजना बंद करण्याची नीती आमची नाही. उद्या विधानसभेला जर दुसरे आले तर ते हि आमची स्कीम म्हणून बंद सुद्धा करू शकतात; असेही मंत्री ना. खाडे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments