Friday, September 11, 2026
Homeसाताराकेशर सुनील माने यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

केशर सुनील माने यांना सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव

माण : कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कोल्हापूर विभागीय महिला आघाडीच्या अध्यक्ष केशर सुनील माने यांना सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने प्रदान करण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याने त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

केशर सुनील माने यांनी अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वाढ, विस्तार, प्रचार व प्रसारामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संघटनेच्या माध्यमातून महिला शिक्षकांना संघटित करण्यासाठी तसेच शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकांसाठीही त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

केशर सुनील माने यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे आणि गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी अभिनंदन केले आहे.

तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूर विभागीय कार्याध्यक्ष संजय दिनकर खरात, संघटक प्रमुख उमेश गायकवाड, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हा. चेअरमन महेंद्र अवघडे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा नेते दीपक माने, कोरेगावचे नेते दादासाहेब जगताप, धनसिंग सोनावणे, माण तालुकाध्यक्ष शैलेश बोराटे, कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, खजिनदार संतोष पवार, प्राथमिक शिक्षक संघ माणचे अध्यक्ष सूरज तुपे, प्राथमिक शिक्षक समिती माणचे अध्यक्ष सूर्यकांत दडस, शिक्षक भारती माणचे अध्यक्ष रमेश शिंदे, निलेश घोरपडे आणि बळीराम विरकर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक बांधवांनी केशर सुनील माने यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासोबतच शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सातत्याने योगदान देणाऱ्या केशर सुनील माने यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव मानला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments