Monday, September 14, 2026
Homeसाताराफलटण नगराध्यक्षपदाच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी; पालकमंत्री शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती

फलटण नगराध्यक्षपदाच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी; पालकमंत्री शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचार मोहिमेचा अधिकृत शुभारंभ रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामचरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.

श्रीराम मंदिरात भव्य सभा

कोळकी गावचे राजे गटाचे नेते व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अक्षय (भैय्या) गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत फलटणच्या ग्रामदैवत श्रीराम मंदिर परिसरात हा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे.
या वेळी अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व कृष्णा–भीमा–कोरेगाव आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीने उत्साह दुणावला

महायुती आणि राजे गटाच्या उमेदवारासाठी स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई मैदानात उतरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीराम यात्रेच्या पवित्र मुहूर्तावर होत असलेल्या या शुभारंभामुळे प्रचार मोहिमेत दमदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

“फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी प्रत्येक नागरिक, तरुण व कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित रहावे,” असे आवाहन अक्षय (भैय्या) गायकवाड यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments