Tuesday, September 15, 2026
Homeसातारानिंबाळकर घराण्यातील थेट मुकाबला : फलटण नगराध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंची उमेदवारी दाखल

निंबाळकर घराण्यातील थेट मुकाबला : फलटण नगराध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंची उमेदवारी दाखल

निंबाळकर घराण्यातील थेट मुकाबला : फलटण नगराध्यक्षपदासाठी दोन्ही बाजूंची उमेदवारी दाखल

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये आज अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला. याचदरम्यान निंबाळकर घराण्यातील दोन तरुण नेत्यांनी थेट रिंगणात उतरत वातावरण तापवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्रीमंत . ४रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी दाखल केली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या मोठ्या भावाला, समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना ऐनवेळी रिंगणात उतरवून मोठा राजकीय उलटफेर केला.

शिवसेनेतून अनिकेतराजे यांच्या  उमेदवारीमुळे या निवडणुकीत युवा नेतृत्वाला चालना मिळाल्याचे बोलले जात आहे. रामराजे राष्ट्रवादीत असतानाही त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेच्या चिन्हावरून निवडणूक लढवत असल्याने फलटणच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. भाजपकडून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच शहरातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली. दिलीपसिंह भोसले यांची जागा कापून समशेरसिंह यांना उमेदवारी दिल्याने भाजपमध्येही नवी समीकरणे तयार झाली आहेत.

फलटणमध्ये अनेक वर्षांपासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळत आला आहे.  आज ही दोन्ही घराण्यातील पुढच्या पिढीचे प्रतिनिधी थेट आमनेसामने आले आहेत. अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने फलटणमध्ये ‘निंबाळकर विरुद्ध निंबाळकर’ अशी थरारक लढत रंगणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments