Saturday, September 12, 2026
Homeसातारासडावाघापूरचा उलटा धबधबा पर्यटकांना लागला खुणावू

सडावाघापूरचा उलटा धबधबा पर्यटकांना लागला खुणावू

.फलटण : सातारा जिल्ह्यातील तारळे पाटण रोडवर १४ किमी व बसलेले सडावाघापूर गाव आहे याठिकाणी सडावाघापूरच्या पठारावर उलटा धबधबा आहे येथे दरवर्षी पावसाला सुरुवात झाली की पर्यटकांना या उलटया धबधब्याचे वेध लागतात . जुलै ऑगस्टमध्ये उलटा धबधबा पाहण्यासाठी सडावाघापूर पठारावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते . सुट्टीच्या दिवशी शेकडो गाडया व हजारो पर्यटक याठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जमतात . सडावाघापूर आणि परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिक पयर्टकानाबरोबर जिल्ह्याच्या बाहेरील पर्यटक दाखल होत आहेत .

सडावाघापुरने हिरवा शालू पांघरूला आहे. विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारु घरे, थंडगार हवा, सोबत थुईथुई पाऊस, पठारावरुन दिसणारे निसर्गाचे नयनरम्य दृश्य, व कोयनामाई, हिरवाईने नटलेले डोंगर, खोल दरी, डोंगराच्या कडे कपारीतुन फेसाळत येणारे लहान मोठे धबधबे, कैकवेळा पठारावर ढगच उतरल्याचा आभास निर्माण करणारे चित्र असे चित्त प्रसन्न करणारे वातावरण मोहात पाडत आहे.

यात उलटा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला आहे. दरवर्षी पावसाळा सुरु झाला कि पर्यटक येथील उलटधबधबा पाहण्यास दाखल होतात. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने नुकताच उलटा धबधबा सुरु झाला असुन पाहण्यासाठी तरुणाई बरोबरच अनेक कुटुंबे गर्दी करु लागली आहेत.

येथील उलटया धबधब्याचा अविष्कार वाऱ्याच्या दाबावर अवलंबुन आहे. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळयाचे पारणे फेडणारा नजारा दृष्टीस पडतो, मात्र अनेकदा वाऱ्याअभावी पाणी उलटे फेकले जात नाही. अशावेळी प्रथमच आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता असते. मात्र धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर छोटेमोठे धबधबे याचा मनसोक्त आनंद ते घेउ शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments