Tuesday, August 11, 2026
Homeसाताराप्रमोशन प्रक्रियेसंदर्भात शिक्षक संघाची उद्या जिल्हाध्यक्ष प्रियाताई शिंदे यांच्याशी भेट; सर्व पदाधिकाऱ्यांना...

प्रमोशन प्रक्रियेसंदर्भात शिक्षक संघाची उद्या जिल्हाध्यक्ष प्रियाताई शिंदे यांच्याशी भेट; सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

प्रमोशन प्रक्रियेसंदर्भात शिक्षक संघाची उद्या जिल्हाध्यक्ष प्रियाताई शिंदे यांच्याशी भेट; सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थितीचे आवाहन

सातारा | प्रतिनिधी. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, आजी-माजी पदाधिकारी तसेच शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या होऊ घातलेल्या पदोन्नती (प्रमोशन) प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवार, दि. २५ जून रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष सौ. प्रियाताई शिंदे यांची भेट घेण्यात येणार आहे.

ही बैठक खटाव-पुसेगाव रस्त्यावर आयोजित करण्यात आली असून, पदोन्नती प्रक्रियेत शिक्षकांच्या विविध मागण्या, अडचणी आणि अपेक्षा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघासोबत सर्व संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे आणि सरचिटणीस समीर बागवान यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे.

शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी, तसेच संबंधित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments